Home /News /lifestyle /

Sexual Wellness : हस्तमैथुन करताना पॉर्न पाहवं की नाही?

Sexual Wellness : हस्तमैथुन करताना पॉर्न पाहवं की नाही?

पॉर्नमुळे (Porn) हस्तमैथुन (Masturbation) करताना एक वेगळाच आनंद मिळतो, पण त्याची किंमतही मोजावी लागू शकते.

प्रश्न : सर्वसाधारणपणे मी हस्तमैथुन (Masturbation) करताना पॉर्न (Porn) पाहत नाही, पण काही वेळा मी ते पाहतोही. ते ठीक आहे, की खासकरून हस्तमैथुन करताना पॉर्न पाहणं पूर्णतः थांबवायला हवं? उत्तर : लैंगिक सुखाचा आनंद मिळण्यासाठी आपल्या समाजातले लाखो पुरुष आणि स्त्रिया दुसऱ्याला कळणार नाही अशा पद्धतीने, पण मोठ्या प्रमाणात पॉर्न पाहतात. हस्तमैथुनामुळे मोकळं झाल्याची भावना मिळत असेल, तर पॉर्न (Porn) हे त्यासाठीचं उत्प्रेरक (Catalyst) आहे. पॉर्नमुळे हस्तमैथुनाला चालनाही मिळते. पॉर्नमधले कलाकार एकमेकांना वारंवार कुरवाळत असतात आणि त्याबद्दल त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना दोष देत नाहीत. त्यामुळे पॉर्न आणि हस्तमैथुन यांचं नातं पहिल्यापासूनच अतूट आहे. पॉर्नमुळे पुरुषांना ते स्वतःच स्वतःच्या लिंगाला उद्दीपित करत आहेत या वस्तुस्थितीवरून त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवता येतं, तसंच स्त्रीची उपस्थिती असल्याचा 'फील' येतो. म्हणजे ती क्रिया स्वतःच करण्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी करत आहात, असं तुम्हाला पॉर्नमुळे वाटू शकतं, प्रत्यक्षात तो जरी कागदाचा तुकडा किंवा स्क्रीन असला तरीही... हे वाचा - Sexual Wellness : तो कंडोमशिवाय सेक्स करण्यासाठी आग्रह करतोय, काय करू? जेव्हा हस्तमैथुन करताना पॉर्नचा वापर केला जातो, तेव्हा त्यातून अंतिमतः ऑरगॅझम (Orgasm) मिळतो. ऑरगॅझममुळे मिळणारा आनंद आणि प्रचंड रिलॅक्सेशनची भावना यांची शक्ती आपल्याला माहिती आहे. पॉर्नमुळे आपल्या मेंदूत चांगल्या भावनेसाठी आवश्यक असलेली अॅड्रिनालिन (Adrenaline), एंडॉर्फिन्स (Endorphins), सेरोटोनिन (Serotonin) अशी रसायनंही स्रवतात. पॉर्नमध्ये पुरुषांच्या सेक्शुअल फँटसीज (Sexual Fantacies) चित्रित केलेल्या असतात. त्यामुळे हस्तमैथुनासाठी आणि लैंगिक इच्छेचा निचरा करण्यासाठी त्याचा पुरुषांना उपयोग होतो; पण पॉर्न नियमितपणे पाहिलं, तर त्याची किंमतही मोजावी लागते. पॉर्नमुळे आनंद देणारी रसायनं सातत्याने मेंदूत स्रवू लागतात. त्यामुळे आयुष्यात सर्वसाधारण परिस्थितीत नैसर्गिकरीत्या प्रभावीपणे स्रवण्याची शरीराची क्षमता कमी होते. तसंच, पॉर्नची सवय असलेल्या व्यक्तीला उद्दीपित व्हायला आणि आनंद मिळायला कदाचित मोठ्या प्रमाणावर सेक्शुअल स्टिम्युलेशन मिळावं लागतं, याचं हे एक कारण आहे. पॉर्नमुळे मिळणारी एक्साइटमेंट, रिलॅक्सेशन आणि वेदनेतून मोकळं झाल्याची भावना यामुळे त्याचं व्यसन लागतं. काही कालावधीनंतर तुम्हाला चांगलं वाटण्याच्या भावनेसाठी पॉर्नवर अवलंबून राहावं लागतं आणि ते जास्त प्रमाणात पाहावं लागतं. हे वाचा - Sexual Wellness : अंधाराऐवजी प्रकाशात सेक्स करण्यासाठी बायकोला कसं तयार करू? हे लक्षात घेण्याची गरज आहे, की पॉर्न ही करमणूक आहे. त्याला दिग्दर्शक, कलाकार, कॅमेरा वगैरे सगळ्या गोष्टी असतात. असे अनुभव प्रत्यक्ष आयुष्यात असणं शक्य नाही. हा अनुभव मग पुरुषांच्या अंगवळणी पडत जातो. प्रत्यक्षातलं जग त्यापेक्षा सामान्य असतं. त्या खऱ्या जगातल्या जोडीदाराबरोबर मग पुरुषांना पॉर्नमधल्या अमर्यादित परफॉर्मर स्त्रियांप्रमाणे आनंद मिळत नाही. त्यामुळे सेक्स परफॉर्मन्स प्रॉब्लेम्सही उद्भवतात. कारण पॉर्नमुळे जी प्रचंड उद्दीपनाची (Stimulation) आवश्यकता निर्माण झालेली असते, ती खऱ्या आयुष्यातला जोडीदार पूर्ण करू शकत नाही. माझ्याकडे अनेक महिलांची पत्रं येत असतात, की त्यांच्या पतींनी त्यांच्यामध्ये लैंगिक आनंद घेणं बंद केलं असून, ते सगळा वेळ पॉर्न पाहण्यातच घालवत असतात. तुमच्या जवळिकीचा तुम्ही आदर करत असाल, त्याचं मूल्य तुम्हाला माहिती असेल, तुमच्या खऱ्या आयुष्यातल्या जोडीदाराबरोबर तुम्ही परिपूर्ण लैंगिक आनंद घेऊ इच्छित असाल, तर तुम्ही पॉर्न पाहणं थांबवण्याचा विचार केला पाहिजे.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या