Home /News /lifestyle /

Sexual Wellness : तो कंडोमशिवाय सेक्स करण्यासाठी आग्रह करतोय, काय करू?

Sexual Wellness : तो कंडोमशिवाय सेक्स करण्यासाठी आग्रह करतोय, काय करू?

'2 आठवड्यांपूर्वी त्याने चाचण्याही करून घेतल्या आणि त्याला कोणताही आजार नाही हे स्पष्ट झालं आहे तरी...'

प्रश्न : मी एका व्यक्तीसोबत नात्यात आहे. आम्ही जवळजवळ 6 महिन्यांपासून एकत्र आहोत आणि आम्ही या नात्याबाबत गंभीर आहोत. आता तो मला कंडोमशिवाय सेक्स (Sex without condom) करण्याचा आग्रह करत आहे. मला माहित आहे कंडोम आवश्यक आहेत. दोन आठवड्यांपूर्वी त्याची तपासणी झाली आणि त्याची टेस्ट ओके असल्याचं त्यानं सांगितलं. त्याची विनंती मी मान्य करावी का? उत्तर : सुरक्षित लैंगिक संबंधाबद्दल काळजी घेण्याची तुमची सतर्क वृत्ती खरोखर कौतुकास्पद आहे. आपण एक जबाबदार प्रौढ व्यक्ती आहात. मी कंडोम न वापरता सेक्स करण्याची इच्छा समजू शकते; पण सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोम अत्यावश्यक आहे. कंडोममुळे सेक्सद्वारे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून तुमचं रक्षण होतं. अशा आजाराची चाचणी नकारात्मक आली म्हणून तुमच्या मित्राला एसटीडी नाही याची हमी मिळत नाही. कंडोम एसटीडी आणि गरोदरपण अशा दोन धोक्यांपासून संरक्षण देतं. कंडोम न वापरता सेक्स केल्यास आणि लिंग योनीतून वीर्यस्खलन होण्यापूर्वीच बाहेर काढण्याच्या पद्धतीमध्ये गर्भधारणेची उच्च शक्यता असते. तुम्हाला आता गर्भवती होण्याची इच्छा नसल्यास गर्भनिरोधनाच्या अन्य पद्धतींचा वापर करण्याचा विचार केला पाहिजे. यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या, इम्प्लांट, पॅच, इंजेक्टेबल गर्भ निरोधक असे काही पर्याय उपलब्ध आहेत. आपण आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तुम्हालाही योग्य वाटेल असा गर्भनिरोधनाचा पर्याय वैद्यकीय देखरेखीखाली निवडू शकता. हे वाचा - Sexual Wellness : Anal sex करताना काय काळजी घ्यायला हवी? सेक्सद्वारे संक्रमित होणारे आजार दिसून येण्यासाठी काही आठवडे ते महिन्याचाही कालावधी लागतो. बऱ्याच आजारांची लक्षणंही दिसत नाहीत. मस, जखम किंवा स्त्राव दिसत नाही याचा अर्थ असा नाही की सर्व काही चांगले आहे. जोखीम मुक्त राहण्यासाठी लैंगिक शिस्त आणि संरक्षण आवश्यक आहे. तुमच्या नवीन जोडीदाराने एखाद्याशी काही आठवड्यांपूर्वी लैंगिक संबंध ठेवले असतील तर त्याला एखादा संसर्गजन्य आजार झालेला असला तरी तो सध्या प्राथमिक स्वरूपात असल्याने चाचणीत त्याचं निदान होण्याची शक्यता नाही. त्यामुळे चाचणीचा निकाल नकारात्मक येऊ शकतो. त्याने एखाद्या अनोळखी व्यक्तीशी किंवा अविश्वसनीय लैंगिक इतिहास असणाऱ्या किंवा लैंगिक आरोग्याची माहिती नसलेल्या एखाद्या व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवलेले असल्यास एसटीडी किंवा एसटीआय चाचणी घेण्यासाठी 3-6 महिने वाट पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर केलेल्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आला तर तो खात्रीशीररीत्या एसटीडी किंवा एसटीआयपासून पूर्णपणे मुक्त असल्याचं समजू शकता. हे वाचा - Sexual Wellness : 'बॉयफ्रेंड मला वाट्टेल ते बोलतो अशावेळी मी काय करावं?' एचपीव्ही हा महिलांद्वारे पसरणारा सर्वात सामान्य एसटीडी आहे; परंतु पुरुषांच्या नियमित चाचणीत याचं निदान केलं जाऊ शकत नाही. जेव्हा मोठा मस उगवतो तेव्हाच याची लागण झाल्याचं लक्षात येतं. एचपीव्हीच्या अनेक प्रकारांमध्ये तर काहीही लक्षणं दिसत नाहीत. तुम्हाला हा आजार नसेल; पण त्याला असेल. त्याला याची कल्पनाही नसेल की आपल्याला हा आजार आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही हा आजार होऊ शकतो. कंडोम हा अशा आजारांपासून वाचवणारे सर्वात सुरक्षित साधन आहे. तुम्हाला अशा आजारांपासून सुरक्षित रहायचं आहे. सध्याच्या वातावरणात आजार वाढत आहेत, ताण वाढत आहे, अशावेळी तुम्ही तुमचा सुरक्षित मार्ग सोडू नये असा माझा सल्ला आहे.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या