मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Sexual Wellness : अंधाराऐवजी प्रकाशात सेक्स करण्यासाठी बायकोला कसं तयार करू?

Sexual Wellness : अंधाराऐवजी प्रकाशात सेक्स करण्यासाठी बायकोला कसं तयार करू?

सेक्सदरम्यान नवऱ्याचा हत्येचा प्लॅन

सेक्सदरम्यान नवऱ्याचा हत्येचा प्लॅन

तिला अंधारात सेक्स (Sex in dark) हवा असतो आणि मला प्रकाशात (Sex in light), या दोन्हीतून मार्ग कसा काढायचा यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

  प्रश्न : आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले असून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दोघांसाठीही हे वर्ष चांगलं गेलं आहे. फक्त एक गोष्ट मला खटकते ती म्हणजे माझी पत्नी नेहमीच अंधारात सेक्स करू इच्छिते. मला प्रकाशात तिचं शरीर पाहण्याची, उजेडात सेक्स करण्याची इच्छा आहे. पण यासाठी अद्याप मी तिला तयार करू शकलेलो नाही. यासाठी मी काय करावं?

  उत्तर : दु:खातही सुख बघता येते मात्र तशी दृष्टी हवी. तसंच काहीसं हे आहे. तुमच्या पत्नीला उजेडात सेक्स करणं आवडत नसण्यामागे एक किंवा अनेक कारणं असू शकतात. यामध्ये स्वतःच्या शरीराविषयी गैरसमज, न्यूनगंड, असुरक्षिततेची भावना, सेक्सबाबत पारंपरिक मतं, बेडरूममधील वातावरण आणि लैंगिक सुख अशा काही कारणांचा समावेश असू शकतो.

  बर्‍याच स्त्रियांना आपलं शरीर जसं आहे तसं स्वीकारण्यात अडचणी येतात. आपल्या शरीराबद्दल त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना असते. आदर्श शरीरयष्टीबाबत समाजात जे काही गैरसमज आहेत, त्याचा परिणाम त्यांच्या मनावर झालेला असतो. आपली पत्नी उजेडात सेक्स करण्यास तयार नसते यामागे अशीच कारणं असण्याची शक्यता आहे. कदाचित तिला आपल्या पोटावरील चरबी किंवा गुळगुळीत स्तन किंवा तिच्या शरीराबाबतच्या अशा काही अन्य गोष्टीमुळे अवघडल्यासारखे वाटत असेल. कदाचित तिला प्रकाशात अनसेक्सी वाटत असेल. दुर्दैवाने बहुतेक स्त्रियांना याची माहिती नसते की पुरुष अशा लहानसहान बिन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचंही कष्ट घेत नाहीत.

  हे वाचा - Sexual Wellness : 'आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पण सेक्स लाइफ हवी तशी नाही'

  तुम्ही तुमच्या पत्नीचे, तिच्या शरीराचे कौतुक करू शकता. तुम्ही तिचं संपूर्ण शरीर बघता तेव्हा तुम्हाला किती उत्तेजना मिळते हे तिला सांगा. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल. तुमचं समजूतदार वागणं, प्रेमळ बोलणं तिला दिलासा देईल. तुम्ही तिच्या शरीरावर अधिक लक्ष देत असल्याची तिची चिंता कमी करण्यासाठी सेक्स करताना तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहा. यामुळे तुमची अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यानं तिला जाणवणारी खंत कमी होईल आणि ती अधिक खुलेल.

  आणखी एक समस्या अशी असू शकते की, तुमच्या बेडरूममधील एलईडी बल्बमुळे निर्माण झालेली प्रकाशयोजना सेक्ससाठी उत्तेजना देणारी नसेल. तेव्हा बाजारात जा आणि मेणबत्त्या किंवा हिमालयीन सॉल्ट लॅम्प खरेदी करा. काही लाल बल्ब लावून तुम्ही तुमच्या बेडरूममधील प्रकाशयोजना बदला. या उजेडात शरीर सेक्सी दिसतं. असे काही साधे सोपे उपाय बदल घडवू शकतील. तरीदेखील तुमच्या पत्नीला अंधारातच सेक्स करताना अधिक आनंद मिळत असण्याचीही शक्यता आहे. अनेक लोकांना उजेडात अवघडल्यासारखं वाटतं. काही वेळा आपल्यातील एखादं इंद्रिय काम करत नाही तेव्हा दुसरं एखादं इंद्रिय अधिक सक्रीय होतं. त्यामुळे जेव्हा अंधारात ती काही पाहू शकत नसते तेव्हा तिला स्पर्शातून अधिक आनंद मिळत असण्याची शक्यता आहे. असं असेल तर तिचे डोळे बांधून पाहा. काही मेणबत्त्या लावा आणि तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधा म्हणजे तुम्ही तिचं शरीर बघू शकाल आणि तिला ते दिसणार नाही. दोघांसाठीही ही एक समाधानाची स्थिती असू शकेल.

  हे वाचा - Sexual Wellness : Anal sex करताना काय काळजी घ्यायला हवी?

  या माहितीच्या आधारे, तुम्ही तुमच्या पत्नीची तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची तयारी नसण्यामागे कोणती कारणं आहेत हे जाणून घेता येईल आणि त्यानुसार तुम्ही त्यावर उपाय शोधू शकाल.

  First published:

  Tags: Sexual wellness