प्रश्न : मी व्हर्जिन आहे. मला सेक्सविषयी नेमकी माहिती नाही, त्यामुळे सेक्स करण्याची भीती वाटते.
उत्तर : सर्वात आधी एक दीर्घ श्वास घ्या. सेक्सविषयी भीती वाटणारे तुम्ही पहिली व्यक्ती नाही. आपण अशा स्त्री आणि पुरुषापैकी आहोत की ज्यांना पहिल्यांदा सेक्स करण्याविषयी भीती आणि चिंता सतावत असते. त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगते की सेक्स करण्याचा कोणताही योग्य किंवा चुकीचा मार्ग नसतो. आपण जर दोन जणांना लहान मुलं म्हणून जंगलात सोडलं तरी त्यांची वाढ होते आणि ते लैंगिक परिपक्वतेपर्यंत पोहोचतात. अखेरीस ते एकमेकांना आनंद देण्याचा मार्ग शोधतातच. आपल्यासाठी काय योग्य आहे, आनंद कसा मिळावायचा हे अन्य जीवशास्त्रीय कार्याप्रमाणेच आपलं शरीर जाणतं. त्यामुळे सेक्ससाठी कोणतीही स्क्रिप्ट, नियम, अधिकृत मार्गदर्शन उपलब्ध नसतं. पण काही गोष्टी जाणून घेतल्यामुळे आपली भीती आणि असुरक्षितता नक्कीच दूर होते.
1) पॉर्न व्हिडिओ हे खोटे किंवा अतिरंजित असतात. बहुतांश जणांची सेक्स या क्रियेशी ओळख पॉर्नच्या माध्यमातून होते. सर्वप्रथम हे सर्व बाजूला ठेवा. पॉर्न व्हिडीओ हे प्रशिक्षित, कौशल्य असणाऱ्या आणि अनुभवी कलाकारांनी बनवलेले असतात. यातील कलाकार हे स्क्रिप्टनुसार कृती करतात. अगदी एखाद्या नेहमीच्या फिल्मच्या चित्रीकरणाप्रमाणं यात दृश्यं कट्स, ब्रेक्स आणि रिशूट केलेली असतात. तसंच यात स्पेशल इफेक्ट आणि एडिटिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो. त्यामुळे ते खऱ्या सेक्ससारखी नसतात. तुम्हाला 50 विविध पोझिशन्सदेखील माहिती नसतात किंवा सेक्स करताना तुमचे पाय डोक्यावरून वाकवण्यासारख्या पोझिशन्ससाठी तुमचे शरीर लवचिक असतेच असं नाही. तसंच अशा पोझिशन्सची अपेक्षा तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून ठेवत नाही. ते काही व्यावसायिक पॉर्नस्टार नसतात तर ते तुमच्यासारखेच असतात. त्यामुळे अशा पॉर्न व्हिडीओमधील कसरती बाजूला ठेवा आणि सर्वप्रथम स्वतःला चांगलं आणि सुरक्षित कसं ठेवता येईल, याकडे लक्ष द्या.
हे वाचा - Sexual Wellness : 'ओरल सेक्स किळसवाणं वाटतं; ते खरंच सुरक्षित असतं का?'
2) तुमची पहिलीच वेळ वेदनादायी असेलच असे नाही. हायमेन किंवा त्वचेचा भाग हे व्हर्जिनिटीचे विश्वसनीय सूचक नाही. धावणं किंवा सायकल चालवण्यासारख्या शारीरिक क्रियांमुळे स्त्रियांमध्ये वेळेपूर्वीच हाइमन निघतो किंवा फाटतो. त्यामुळे बहुतेक वेळा पहिल्यांदा सेक्स करताना स्त्रियांमध्ये रक्तस्त्राव होत नाही. जरी हाइमन हा अखंड असला तरी तो एक गुळगुळीत पडद्यासारखा असतो आणि तेथे सर्वाधिक किरकोळ स्वरुपाचे डाग आढळतात. वेदनेचा विचार करता, सेक्स करताना सुरुवातीची काही सेकंद थोडीशी अस्वस्थता आणि थोडीशी वेदना होऊ शकते. पण ही बाब दुर्लक्षित करून तुम्ही सेक्सचा आनंद घ्यावा. चांगल्या उत्तेजनेनंतर योनीमार्ग अधिक रिलॅक्स आणि आकाराने मोठा होतो. त्याचप्रमाणे अॅनल सेक्ससाठी चांगल्या दर्जाचे ल्युब्रिकंट वापरू शकता. हे ल्युब्स तुम्हाला ऑनलाईन देखील उपलब्ध होतात. सेक्सपूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदारास तुम्हाला पूर्णपणे उत्तेजित करण्यास सांगा. पेनिट्रेशन अत्यंत संथपणे करून त्यानंतर क्रियेचा वेग वाढवा. यावेळी सेक्समधील आनंद अधिक वाढावा यासाठी किसिंगसारख्या क्रिया करण्यावर भर द्या. यामुळे किरकोळ वेदना जाणवल्या तरी तुमचं लक्ष विचलित होणार नाही.
3) केवळ पहिल्यांदाच नव्हे तर प्रत्येक लैंगिक संबंधावेळी थोडी अशक्य वाटत असली तरी पुरेशी सुरक्षितता बाळगणं महत्त्वाचं आहे. सुरक्षित लैंगिक संबंधाविषयी उपलब्ध असलेली माहिती व्यवस्थिती अभ्यासा, योग्य गर्भनिरोधक साधनांचा वापर करा. त्यातही कंडोम हे जास्त सुरक्षित आहे. कंडोमच्या वापरामुळे लैंगिक संबंधांदरम्यान होणारे संसर्ग टाळता येऊ शकतात. लैंगिक संबंधावेळी जास्त सावधगिरी बाळगणं आणि एकाचवेळी दोन कंडोम वापरणं अशा सामान्य चुका लोक पहिल्या लैंगिक संबंधावेळी करतात. खरं तर हे खूप धोकादायक आहे. दोन कंडोम वापरल्याने लैंगिक क्रियेवेळी घर्षण होऊन दोन्ही कंडोम फाटू शकतात. त्यामुळे एकच कंडोम वापरणं पुरेसं आणि सुरक्षित आहे. जर तुम्ही ल्युब्रिकंट वापरण्याचा विचार करत असाल तर ते अशा गोष्टींसाठी उपयुक्त ठरणारंच असावं. जर तुम्ही बेबी आईलसारख्या द्रव्यांचा वापर केला तर घर्षण होऊन कंडोम फाटू किंवा खराब होऊ शकतो.
हे वाचा - "तो खूप उत्तेजित असतो पण मी लवकर थकते; SEX करताना त्याला साथ कशी देऊ?"
4) वर्तमानात राहून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. स्वतःसाठी अवास्तव अपेक्षा निश्चित करू नका. आपण कदाचित जास्त काळ कठोर राहण्यास सक्षम नसालही. पण हीच तुमची पहिली वेळ असून ती सिद्ध करण्याची नक्कीच नाही. अतिरिक्त दबाव हा तुमच्यासाठी लैंगिक अनुभव उद्ध्वस्त करणारा असू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सहजतेनं घ्या. जे योग्य वाटेल तेच करा, एकमेकांच्या गरजांकडे लक्ष द्या आणि संवाद साधा. तुमच्यासाठी आवश्यक आहे अशा गोष्टी जोडीदाराला सांगा आणि त्याच करत राहण्याची सूचना द्या. जोडीदाराशी संवाद साधा आणि वर्तमानात रहा. यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यास मदत होईल आणि जर काही चुकीचं असेल तर त्यात सुधारणा करता येईल. याव्यतिरिक्त तुम्ही अनावश्यक अपेक्षा ठेवल्या तर तुम्ही जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा आपल्या पहिल्या वेळी आपण अयशस्वी झालो अशी भावना तुम्हाला सतावेल.
दिवसाच्या शेवटी फक्त हे लक्षात ठेवा की तुम्ही सुरक्षित राहिल्यास क्षणाचा आनंद घेऊ शकाल. कोणतीही अवास्तव अपेक्षा ठेवली नाहीत तर पहिली वेळ म्हणून घाबरण्याचं कारण नाही. लैंगिक संबंधासाठी तुम्हाला अनुभवाची, बिग बुब्ज किंवा मोठ्या पेनिससारख्या गोष्टींची गरज नाही. सेक्स हा एक सांघिक खेळ आहे, एकट्याची मॅरेथॉन नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.