Home /News /lifestyle /

Sexual Wellness : बायको Oral Sex साठी नकार देते, तिला कसं तयार करू?

Sexual Wellness : बायको Oral Sex साठी नकार देते, तिला कसं तयार करू?

अनेक महिला ओरल सेक्ससाठी (Oral Sex) तयार नसतात.

प्रश्न : माझ्या लैंगिक जीवनात एक समस्या आहे. मला मुखमैथुनात (Oral Sex) रस आहे. पण माझी जोडीदार मात्र संस्कृती आणि परंपरेनुसार ते योग्य नाही असं मानते. मी काय करू शकतो, ते कृपया सुचवा उत्तर : अनेक महिलांना त्यांच्या लैंगिक अवयवांचं (Genitals) दिसणं आणि वास यांच्याबद्दल लाज/शरमेची भावना असते. तुमची जोडीदार, तिचे लैंगिक अवयव/योनी ही घाणेरडी गोष्ट आहे, असा विचार करते, असं दिसतं आहे. तोंडाला अनेक लोक पवित्र मानतात, त्यामुळे तोंड आणि लैंगिक अवयवांचा संबंध या गोष्टीचा विचारही अनेकांना पटू शकत नाही. पण जर स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतली, तर लैंगिक अवयव घाणेरडे किंवा शरीराच्या अन्य अवयवांपेक्षा थोडेही वेगळे नसतात. तसंच Vulva ला  तिचा नैसर्गिक मस्की गंध असतो, तिला कसलाही वास नसतो. आपल्या समाजात स्त्रीच्या आयुष्यात लहानपणापासूनच लैंगिक अवयवांसंदर्भात लाजेची/तिरस्काराची भावना अनेक कुटुंबांमध्ये असते. मासिक पाळीच्या (Menstual Cycle) वेळी स्रवणारं रक्त घाणेरडं मानलं जातं. त्यामुळे रक्त शोषून घेतलेली पॅडस् महिलांना दिवसभर घालून फिरावं लागतं. हस्तमैथुनाबद्दलही (Masturbation) तीव्र नापसंती असते. आपलं मूल लैंगिक अवयवांना स्पर्श करत असल्याचं पालकांना दिसलं, तर ते त्याला असं काही ओरडतात की त्याने काही पापच केलं आहे. त्यामुळे तुमच्या शरीराच्या सर्वांत intimate अवयवाशी असलेलं नातं तुटतं. तुम्ही हे समजून घेण्याची गरज आहे, की तुमची जोडीदार या सगळ्या सामाजिक व्यवस्थेतून गेली असणार. त्यामुळे तिला तिच्या शरीराविषयी लाज वाटत असावी. हे वाचा - Sexual Wellness : अंधाराऐवजी प्रकाशात सेक्स करण्यासाठी बायकोला कसं तयार करू? तुम्ही तिला असं का सांगत नाही की, तिने तिच्या योनीला मसाज करून तिच्या शरीराशी नातं प्रस्थापित करावं. फक्त तिने व्हजायना (Vagina) आणि त्याभोवतीचा भाग सोडून, केवळ योनीच्या काही भागातच (labia minora, labia majora, mons pubis, and groin area) मसाज करावा. दुसरं म्हणजे तुम्ही तिला लॅबिया गॅलरीला (Labia Gallery) भेट देण्याचा सल्ला देऊ शकता. लॅबिया गॅलरी म्हणजे स्त्रीचा लैंगिक अवयव असलेल्या Vulva च्या चित्रांचं कलेक्शन असतं. (व्हजायना हा स्त्रीचा लैंगिक अवयव नाही. व्हजायना हे असं अंतर्गत छिद्र असतं, की ज्यातून जन्माला येणारं मूल बाहेर येतं, तसंच मासिक पाळीच्या वेळचा रक्तस्रावही त्यातूनच होतो. व्हल्व्हा (Vulva) हा बाह्य भाग असून, त्याला ओठांसारखे दोन भाग असतात.) Vulva च्या प्रतिष्ठेची जाणीव करून देणाऱ्या दोन लोकप्रिय चळवळी म्हणजे Vulva गॅलरी आणि लॅबिया प्रोजेक्ट. आपल्याच भारतात आसाममध्ये (Assam) गुवाहाटी येथे कामाख्या देवीचं (Kamakhya Temple) देऊळ आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, की या मंदिरात देवीची मूर्ती नाही, तर फक्त देवीची योनी आहे. प्राचीन भारतात मासिक पाळी येणं हे प्रजननक्षमतेचं लक्षण मानलं जायचं आणि ते विपुलतेचं लक्षण होतं. आपल्या शरीरातून दुसऱ्या मानवी शरीराला जन्म देण्याच्या तिच्या क्षमतेबद्दल स्त्रीचं पूजन केलं जायचं. त्यामुळे मूल जिथून जन्मतं ती जागा म्हणजे योनी पवित्र मानली जाते. त्या मंदिरात वार्षिक अंबुवासी पूजा साजरी केली जाते. त्या काळात देवीची वार्षिक मासिक पाळी येत असते, असं मानलं जातं. त्या काळात तीन दिवस मंदिर बंद ठेवलं जातं आणि चौथ्या दिवशी मोठा सोहळा साजरा करून ते उघडलं जातं. हे वाचा - Sexual Wellness : तो कंडोमशिवाय सेक्स करण्यासाठी आग्रह करतोय, काय करू? ही उदाहरणं दिलीत तर तुमची जोडीदार तिच्या मेंदूत लैंगिक अवयवांविषयी असलेली लाजेची भावना काढून टाकू शकेल आणि त्यापासून आनंद घेऊ शकेल.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या