प्रश्न : हा प्रश्न कसा मांडावा, हे मला समजत नाही. पण माझे पत्नीसोबत अनेक महिने शरीरसंबंध (Sex) येत नाहीत. मला तर जवळपास रोजच त्याची गरज असते. यातून मी कसा मार्ग काढू शकतो?
उत्तर : यामागे दोन कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे तिची संभोगाची इच्छा कमी असू शकते. दुसरं म्हणजे सनातन सामाजिक, सांस्कृतिक विचारांच्या सान्निध्यामुळे संभोग ही वाईट गोष्ट आहे, असा विचार असू शकतो. तुमच्या पत्नीच्या बाबतीत दुसरं कारण असेल, तर ती धारणा मनात पक्की बसलेली असते. त्यावर उपाय म्हणून तुम्ही अपर्णा सेन, अलंकृता श्रीवास्तव, लीना यादव यांच्यासारख्या दिग्दर्शकांचे उत्तम सिनेमे त्यांना दाखवू शकता. परोमा (Parama), लिपस्टिक अंडर माय बुरखा (Lipstick under my Burqua) आणि पार्च्ड (Parched) या त्यांच्या सिनेमांमधून त्यांनी मध्यमवर्गीय महिलांच्या दबल्या गेलेल्या लैंगिकतेच्या पूनर्जन्माचं प्रभावी चित्रण केलं गेलं आहे. आरोग्यपूर्ण लैंगिकता (Healthy Sexuality) आणि लैंगिक सुख यांचं नातेसंबंधांसाठी आणि समाधानासाठी असलेलं महत्त्व या विषयावर चर्चा करण्यासाठी तुम्ही या सिनेमांपासून सुरुवात करू शकता.
त्यांची कामेच्छा (Libido) कमी असणं हेही त्यामागचं कारण असू शकतं. व्यक्तीनुसार कामेच्छा कमी किंवा जास्त असू शकते. प्रत्येकाचं शरीर आणि मन सेक्स या विषयाकडे एकाच पद्धतीने पाहतं असं नाही. ही गोष्ट आश्चर्यकारक वाटली, तरी खरी आहे. कामेच्छांचे दोन प्रकार असतात. उत्स्फुर्त कामेच्छा (Spontaneous Libido) आणि प्रतिसादात्मक कामेच्छा (Responsive Libido). हे दोन्ही प्रकार म्हणजे परस्परांच्या नेमके विरुद्ध असतात. जेव्हा जोडीदारांच्या कामेच्छा या वेगवेगळ्या प्रकारांच्या असतात, तेव्हा बरेच गैरसमज निर्माण होऊ शकतात. सर्वसाधारणपणे पुरुषांची कामेच्छा उत्स्फुर्त असते, तर स्त्रियांची कामेच्छा प्रतिसादात्मक प्रकारची असते.
ज्यांची कामेच्छा उत्स्फुर्त असते, त्या व्यक्ती संभोगासाठी पुढाकार घेतात. अशा व्यक्तींना दिवसभरात केव्हाही संभोगाची इच्छा होते. (त्यांच्या शरीराला तसं वाटू लागण्याच्या आधीच.) ज्यांची कामेच्छा प्रतिसादात्मक प्रकारची असते, त्यांच्या मनात संभोगाबद्दलचे विचार फार कमी वेळा येतात. बऱ्याचदा असंही होतं, की संभोगक्रिया अगदी बहरात येईपर्यंतही त्यांना संभोगाच्या इच्छेची जाणीव होत नाही. अशा प्रकारची प्रतिसादात्मक कामेच्छा असलेल्या व्यक्तींना तशी इच्छा निर्माण होण्यासाठी स्थळ, काळ आणि एकंदर परिस्थिती या सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात.
हे वाचा - 'लठ्ठपणामुळे जोडीदारासमोर निर्वस्त्र होताना लाज वाटते; हा न्यूनगंड कसा दूर करू?'
अनेकांना असं वाटतं, की संभोगासाठी उद्दीपित (Arousal) होणं ही उत्स्फुर्त क्रिया आहे. टीव्ही किंवा चित्रपटांत आपण तसं पाहिलेलं असतं हे त्यामागचं कारण आहे; पण वास्तव तसं नाही. जोडीदारांच्या कामेच्छा वेगवेगळ्या असणं याचा अर्थ असा नाही की, तुम्ही एकमेकांना अनुरूप नाही. त्याचा अर्थ एवढाच की, तुम्हा दोघांमधील संभोगक्रिया सुरळीत होण्यासाठी त्या क्रियेसाठीच्या एकमेकांच्या गरजा आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतील आणि थोडा जास्त वेळ द्यावा लागेल.
उद्दीपित होण्याचे दोन पैलू आहेत. एक म्हणजे शारीरिक आणि दुसरा मानसिक. शारीरिक उद्दीपनामुळे (Physical Arousal) पुरुषाचं लिंग ताठर होतं आणि स्त्रियांची योनी ओलसर होते. हृदयाची धडधड वाढते, स्तनाग्रं घट्ट होतात, इत्यादी गोष्टी घडतात. मानसिक उद्दीपन (Mental Arousal) म्हणजे संभोग करण्याची इच्छा तुमच्या मनात येते आणि हवीहवीशी वाटू लागते. ज्यांची कामेच्छा उत्स्फुर्त असते, त्यांचं मानसिक उद्दीपन अनेकदा शारीरिक उद्दीपनाच्या कितीतरी अगोदर होतं; पण ज्यांची कामेच्छा प्रतिसादात्मक प्रकारची आहे, त्यांना शारीरिक उद्दीपनाआधी मानसिकदृष्ट्या उद्दीपित झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळेच अशा व्यक्तींना संभोग करण्याची इच्छाच नाही असं जोडीदाराला वाटू शकतं.
तुम्ही जर उत्स्फुर्त कामेच्छा असलेली व्यक्ती असाल, तर तुमचा जोडीदार शारीरिकदृष्ट्या उद्दीपित होण्यासाठी तुम्ही थोडे प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. तुम्ही जर प्रतिसादात्मक कामेच्छा असलेली व्यक्ती असाल, तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या उद्दीपित वाटण्याआधीच कामक्रीडा करायला सुरुवात करण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे.
हे वाचा - 'जोडीदारासोबत भावनिक नातं पण सेक्ससाठी मनात दुसरीच स्त्री; हे योग्य आहे का?'
तुमच्या पत्नीच्या बाबतीत मी अशी शिफारस करीन, की सुरुवातीला संभोगाची अपेक्षा न ठेवता तुम्ही तिच्याशी हळुवारपणे शारीरिक जवळीक साधायला हवी. मिठी मारणं, कुरवाळणं, पाठीवर थोपटणं, हात हातात घेणं, तिच्या बोटांवरून हात फिरवणं, पायाला मसाज करणं, ती किती सेक्सी (Sexy) दिसते याबद्दल तिचं कौतुक करणं अशा गोष्टींचा त्यात समावेश असू शकतो. तिला शारीरिकदृष्ट्या उद्दीपित होऊ द्या, मग तिची इच्छा आपोआपच निर्माण होईल.