मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Sexual Wellness : 'समलिंगी मित्रासोबत राहिल्याने मीसुद्धा तसाच होईन का?'

Sexual Wellness : 'समलिंगी मित्रासोबत राहिल्याने मीसुद्धा तसाच होईन का?'

'माझ्या आजूबाजूच्या वातावरणाचा माझ्या लैंगिकतेवर काही परिणाम होईल का?'

'माझ्या आजूबाजूच्या वातावरणाचा माझ्या लैंगिकतेवर काही परिणाम होईल का?'

'माझ्या आजूबाजूच्या वातावरणाचा माझ्या लैंगिकतेवर काही परिणाम होईल का?'

प्रश्न : माझा मित्र समलिंगी आहे. परंतु मला समलिंगी व्हायचं नाही. माझ्या लैंगिकतेवर (sexuality) या वातावरणाचा प्रभाव पडेल का?

उत्तर : लैंगिक प्रवृतीपेक्षा लैंगिकता ही काहीशी वेगळी आहे. जेव्हा आपण म्हणतो की मी या किंवा त्या लिंगाकडे आकर्षित होतो किंवा होते, तेव्हा आपण आपल्या लैंगिक प्रवृत्तीबाबत बोलत असतो. जसं की पुरुष, स्त्री किंवा ट्रान्सजेंडर आदींसोबत लैंगिक संबंध ठेवण्याची होणारी इच्छा ही साधी वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे लैंगिकता त्यापेक्षा खूप मोठी आणि विस्तारीत आहे. तुम्ही लैंगिकदृष्ट्या कोण आहात (biological sex) आणि तुम्ही कशापद्धतीनं व्यक्त (gender expression) होता आणि संपूर्ण लैंगिक अस्तित्व जेव्हा एका छताखाली येतात तेव्हा त्याला लैंगिकता म्हणतात.

जर तुम्ही समलिंगी लोकांभोवती असाल तर तुमची लैंगिक प्रवृत्ती बदलू शकेल का असं आपण विचारत आहात. तर याचं उत्तर नाही असं आहे. तुमची लैंगिक प्रवृत्ती तुमच्या इच्छांमध्ये रुजलेली असते. तुमच्या आसपासच्या लोकांना जे पाहिजे तेच ती निर्धारित करत नाही.

हे वाचा - Sexual wellness : Rimming हे विचित्र आहे की सामान्य?

तुमच्या समलिंगी मित्राचे पालक सरळ आहेत आणि आपला समाज मुख्यत्वे भिन्नलिंगी आहे. आपण पाहात असलेले सिनेमे, वाचत असलेली पुस्तकं ही सरळ लोकांच्या प्रेमकथांबद्दल आहेत तर जाहिराती या भिन्नलिंगी प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट आपल्याला सरळ बनवण्यासाठी डिझाईन केलेली असताना, आपल्या आजूबाजूला व्यापक विषमता असताना तुमचा मित्र समलिंगी कसा बनला?

मला आशा आहे की तुम्ही माझा मुद्दा समजून घ्याल. अगदी सोपा मुद्दा आहे, ज्याप्रमाणे तुमचा मित्र कायम तुमच्या सोबत राहिला तरी तो सरळ होणार नाही, त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्याबरोबर राहिल्यास समलैंगिक बनणार नाही. बऱ्याचदा queer लोकांना रोजच भेदभावाचा सामना करावा लागतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की ते सरळ आहेत. परंतु आपल्या येथील वातावरणाद्वारे लैंगिक प्रवृत्ती बदलणं इतकं सोपं झालं असतं तर सर्व समलिंगी पुरुषांना सरळ बनवण्यासाठी आम्ही अनेक शिबिरं घेतली असती. पण तुम्हाला माहिती आहे हे होऊ शकत नाही.

हे वाचा - 'मुलांच्या लैंगिकतेबाबत सांगण्याचा अधिकार आम्हाला आहे, असं पालकांना का वाटतं?'

त्यामुळे तुमच्या सभोवती समलिंगी व्यक्ती असेल तर तुम्हीही समलिंगी व्यक्ती व्हाल अशी भिती बाळगू नका.

First published:

Tags: Sexual wellness