प्रश्न : रिमिंगविषयी तुमचं मत काय आहे? ही बाब विचित्र आहे की सामान्य? एखादया स्त्रीला ही कृती आवडते किंवा नाही? मी एखाद्या स्त्रीला मला रिम करायचं आहे हे कसं सांगू?
उत्तर : माझा विचित्र या शब्दप्रयोगाला आक्षेप आहे. आपण विचित्र किंवा विचलित लैंगिक व्यवहार असा शब्द प्रयोग कसा करू शकतो. भिन्न किंवा विचलन या शब्दाचा प्रयोग ऐतिहासिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या लैंगिक वर्तनाचा चुकीचा अर्थ लावण्यासाठी किंवा ज्यांना नैतिक परवानगी नाही अशा लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो. विवाहापूर्वी लैंगिक संबंधांपासून क्विअर सेक्स, लैंगिक कल्पना, किंक्स कामोत्तेजन गोष्टी या लज्जास्पद असल्याचं सांगत त्यावर टिका करण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातो. कोणतेही सेक्स विचित्र नसते. बालकांचे लैंगिक शोषण, मृतदेहाबरोबर लैंगिक कृती, कोणत्याही जनावरासोबत केलेले लैंगिक कृती आदी कोणतीही कृती विचलित किंवा विचित्र लैंगिक कृती होत नाही. ही सर्व कृत्ये गुन्हेगारी स्वरुपाची आहेत.
कोणत्याही दोन प्रौढ व्यक्तींमधील लैंगिक संबंध हा अपराधीपणा नसून तो एक प्रामाणिकपणा मानत त्यावर कोणतंही मत गृहित धरू नये. ही बाब रिमिंगबाबतही लागू होते. रिमिंग म्हणजे आपल्या जोडीदाराच्या गुद्द्वाराला तोंडाने उत्तेजित करणं होय. मात्र याकडे सहसा घृणास्पद कृत्य म्हणून पाहिलं जातं. तसंच ते अधिक पवित्र आणि नैतिक लैंगिक संभोगाच्या विरुद्ध मानलं जातं. परंतु जर आरोग्य आणि स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली तर ही बाब त्यांच्यासाठी इतर सुरक्षित आणि आनंददायी लैंगिक कार्यासारखीच आहे, ज्यांना यातून उत्तेजना मिळते. त्यामुळे तुम्हाला जर ही कृती करावीशी वाटते, तर ती तुम्ही करावी. ही एक सामान्य बाब असून त्यात लज्जास्पद असं काही नाही.
हे वाचा - 'खचलेल्याला आधार दिल्यास तो आपल्यावर कायमस्वरूपी प्रेम करतो, हे किती खरं आहे?'
अन्य कोणत्याही लैंगिक गोष्टींप्रमाणेच काही लोकांना रिमिंग आवडतं. पण काही लोकांना रिमिंग आवडत नाही. ही आवड – निवड तुमच्या जोडीदारावर अवलंबून असते. जर हे सर्व प्रयोग आवडणारा आणि करू इच्छिणारा जोडीदार तुम्हाला मिळाला असेल तर याचा जरूर आनंद घ्या. परंतु तुमच्या जोडीदाराला असे प्रयोग आवडत नसतील तर करू नका, त्याच्या मताचा आदर करा.
जर तुम्ही रिमिंग केल्यावर उत्तेजित होणाऱ्या जोडीदाराच्या शोधात असाल तर ही अगदी संधीची बाब आहे की, ज्या जोडीदारासोबत तुम्ही सेक्स करता त्यास रिमिंग आवडते किंवा नाही. विशेष करून ही कृती आवडणाऱ्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी तुम्हाला फोरम्स, चॅटरुम्स, आॅनलाईन कम्युनिटीचा किंवा रेड्डीटचा आधार घ्यावा लागेल. तुम्ही आपली लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. जर तुम्ही रिमजॉब सारख्या कृतींची आवड नसलेल्या जोडीदारासमवेत सेक्स करत असाल तर अन्य लैंगिक कृतीतून एकमेकांना आनंद द्यावा आणि घ्यावा.
हे वाचा - 'मला जे नको तेच करण्यासाठी ती फोर्स करते, मी काय करू?'
शेवटच्या प्रश्नाचं उत्तरावर बोलायचं तर तुम्ही याकडे अन्य लैंगिक क्रियांप्रमाणेच पाहिलं पाहिजे. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय करायचं आहे. याबाबत तुम्ही प्रामाणिक आणि स्पष्ट राहिलं पाहिजे. तसंच तुम्ही जोडीदाराला अशी कृती करणं आवडतं की नाही हे विचारलं पाहिजे. जर जोडीदारास ही कृती आवडत असेल तर त्याचा आनंद घ्या. जर कोणी तुम्हाला सेक्समधील आवड – निवडीवरून, उत्तेजनेवरून तुमच्या विषयी मत तयार करत असेल तर ती समोरील व्यक्तीची चूक आहे, तुमची नाही. तुम्ही सेक्सविषयी आपली आवड कायम ठेवावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Relationship, Sex, Sexual wellness, Wellness