मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'पत्नीसोबत सेक्स करताना तिच्या मैत्रिणीबाबत विचार; Sexual Fantasy चा आमच्यावर परिणाम होईल?'

'पत्नीसोबत सेक्स करताना तिच्या मैत्रिणीबाबत विचार; Sexual Fantasy चा आमच्यावर परिणाम होईल?'

या गोष्टींचा माझ्या आणि माझ्या पत्नीच्या मानसिकतेवर कोणता परिणाम होणार नाही ना? याबाबत sexual wellness तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर.

या गोष्टींचा माझ्या आणि माझ्या पत्नीच्या मानसिकतेवर कोणता परिणाम होणार नाही ना? याबाबत sexual wellness तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर.

या गोष्टींचा माझ्या आणि माझ्या पत्नीच्या मानसिकतेवर कोणता परिणाम होणार नाही ना? याबाबत sexual wellness तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर.

प्रश्न - माझ्या पत्नीबरोबर शरीरसंबंध ठेवताना मी तिच्या मैत्रिणींचा किंवा जवळच्या नातेवाईकांचा विचार करतो. माझ्या या सेक्शुअल फॅंटसीविषयी (Sexual Fantasy) मी तिला कल्पना दिली आहे. शरीरसंबंधाच्या वेळी ती या गोष्टी खूप खेळकरपणानं घेते. पण यानंतर ती मला त्यावरून चिडवते आणि मला अपराधी असल्यासारखं वाटतं. पण मी त्या सगळ्या गोष्टी एँजॉय करतो. या गोष्टींचा माझ्या आणि माझ्या पत्नीच्या मानसिकतेवर कोणता परिणाम होणार नाही ना?

उत्तर : खरंतर ही गोष्ट खूप सामान्य आहे. अनेकजण आपल्या पार्टनरबरोबर शरीरसंबंधाच्या वेळी इतर व्यक्तींचा विचार करत असतात. तुमच्या आणि तुमच्या पत्नीमध्ये अशा पद्धतीने प्रामाणिक, खुले आणि नॉन जजमेंटल संभाषण होतं. यामुळे तुम्हाला याची कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी या सर्व गोष्टींची गरज असते. त्यामुळे तुमचे आणि तुमच्या पत्नीचे नाते खूपच मोकळे असल्याने तुम्हाला याची चिंता करण्याची गरज नाही.

मानवी मेंदू ही एक विचित्र गोष्ट आहे. सेक्शुअल फँटसी (Sexual Fantasy) या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. वास्तविक जीवनात आपण सामाजिक नियम, व्यावहारिक बंधनं आणि आपल्या जबाबदाऱ्यांनी बांधले गेलेलो आहोत. पण आपल्या कल्पनेच्या दुनियेत आपण स्वतंत्र आणि स्वच्छंदी असून कोणताही विचार करू शकतो. त्याचबरोबर आपल्या सेक्शुअल फॅंटसीविषयी (Sexual Fantasy) विचार करून त्याचा आनंद घेऊ शकतो. या गोष्टींमधून एखाद्यास लैंगिक आनंद मिळू शकतो तर एखाद्यास ते घृणास्पद वाटू शकतं. पण ही गोष्ट नाकारणं घातक ठरू शकतं. त्यामुळे तुमची पत्नी या गोष्टींमध्ये तुमच्याबरोबर असून यामधून तुम्हा दोघांना देखील लैंगिक आनंद आणि तुमचं नाते आणखी घट्ट होऊ शकतं.

हे वाचा - 'जोडीदारासोबत भावनिक नातं पण सेक्ससाठी मनात दुसरीच स्त्री; हे योग्य आहे का?'

खरंतर सेक्शुअल फँटसी (Sexual Fantasy) हा आपला लैंगिक आनंद वाढवण्यासाठी आणि तुम्हाला यामध्ये अधिक आनंद देण्यासाठी आहे. फक्त आपल्याकडेच अशा कल्पनांचा अर्थ असा लावला जातो की, अशा कल्पना तुमच्या मनात येतात म्हणजे तुम्ही तसं वागाल. पण तसं होत नाही. कल्पनेतच त्याचा आनंद असतो माणूस लगेच तशी कृती करत नाही.त्यामुळे कल्पना आणि प्रत्यक्षात कृती करणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या पत्नीमध्ये आणि तुमच्यात याविषयी खुलेपणानं आणि प्रामाणिकपणानं चर्चा होत असल्यानं याविषयी तुमच्या दोघांच्याही मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही कल्पना करणं तुमच्या आणि पत्नीमधील शरीरसंबंधांवेळी मजेशीर गोष्ट आहे. पण सतत यासंबंधी पत्नीशी बोलून तिला याविषयी काही अडचण आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहा. यामुळे तुमच्या नात्यातील प्रामाणिकता टिकून राहिल. त्याचबरोबर तिच्या विचारांचा आदर करून तिनं ठरवून दिलेली रेषा ओलांडू नका.

हे वाचा - 'माझं सेक्शुअल लाइफ समाधानी आहे तरी मी हस्तमैथुन करतो, हे चुकीचं आहे का?'

दरम्यान तुम्हाला तरीदेखील याविषयी वाईट भावना वाटत असेल तर पत्नीबरोबर याविषयावर दीर्घ चर्चा करा. तिचं याविषयीचे मत ऐकून घ्या. तुमची मतंदेखील तिच्यासमोर मांडा आणि तिच्या मतांचा आदर करून निर्णय घ्या.

First published:

Tags: Sexual wellness