Home /News /lifestyle /

'Casual sex नकोय तरी मन तिकडेच वळतंय; मनाला कसा आवर घालू'

'Casual sex नकोय तरी मन तिकडेच वळतंय; मनाला कसा आवर घालू'

अशा भावना योग्य आहेत की नाहीत आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावं याबाबत Sexual Wellness तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन.

प्रश्न :  मी अशा वयात प्रवेश करत आहे जिथं मला जोडीदार हवा आहे, कॅज्युअल सेक्स नको. पण मी फक्त कॅज्युअल सेक्सकडेच वळतो, मी माझ्या भावनांवर कसे नियंत्रण ठेवू. उत्तर : अगदी सुरुवातीस मला हे स्पष्ट करावेसं वाटतं की कॅज्युअल सेक्समध्ये मुळात काहीही चुकीचं नाही. जर तुम्हाला यातून आनंद आणि समाधान मिळत असेल तर तुमचं वय यासाठी आडकाठी ठरू शकत नाही किंवा यामुळे तुम्हाला अपराधीपणा वाटण्याचं काहीच कारण नाही. जर आपल्याला वाटतं की, आपल्यासाठी कॅज्युअल सेक्स योग्य आहे आणि तुम्ही जर तुमच्या रिलेशनशीपमध्ये अधिक भावनिकदृष्ट्या गुंतला असला तर त्यातून तुम्हाला अधिकच आनंद मिळणार आहे. त्यामुळे हा पॅटर्न मोडून काढणं आपल्यासाठी फारसं कठीण काम नाही. भावनिकदृष्ट्या गुंतलेल्या रिलेशनशिपमध्ये राहणं तुमच्या हिताचं आहे हे पटवून दिलं तरीही तुमच्या मनात भीती किंवा चिंता उद्भवल्यामुळे तुम्ही अनाहूतपणे कॅज्युअल सेक्सचा शोध घेता. ही भीती वचनबद्धता, भावनिक असुरक्षितता किंवा भूतकाळातील काही आघात झाल्यामुळे असू शकतं. प्रेम आणि नातेसंबंधाबद्दलच्या आपल्या दृष्टीकोनावर याचा परिणाम होत नाही ना, हे ओळखणं ही एक चांगली पायरी असू शकते. जरा आत्मनिरीक्षण करा. कदाचित स्पष्ट काही जाणवत नसलं तरी ते आतूनच असू शकतं. तुमच्या प्रवासात स्वतःचं मूल्यांकन करण्यासाठी प्रशिक्षित मानसिक विकार तज्ज्ञाची मदत घ्या. एखादा सायकोथेरेपिस्ट किंवा काऊन्सिलर तुम्हाला या गोष्टींमध्ये काही मुलभूत समस्या असल्यास त्या समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी मदत करेल. तसंच तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना तुमच्यावर बारीक लक्ष ठेवण्यास सांगू शकता. हे वाचा - Sexual Wellness : 'मी गेल्या वर्षभरापासून कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये आहे, पण...' कोणत्याही सवयीचा पॅटर्न ओळखणं ही बाब तुम्हाला ती सवय मोडायला सहाय्यक ठरू शकते. कोणत्या गोष्टी तुम्हाला कॅज्युअल सेक्सची निवड करण्यास प्रवृत्त करतात त्या ओळखा आणि त्यात लहानसा आणि साध्य करण्याजोगा बदल करा. जर तुम्ही अशाच वर्तणुकीत आणि कॅज्युअल सेक्समध्ये गुंतला तर स्वतः कठोर होऊ नका, स्वतःला शिक्षा देऊ नका. स्वतःसाठी नियम तयार करा आणि स्वतःला शिक्षा देण्याऐवजी नियम तोडल्यास दोषी वाटून घेण्याऐवजी जेव्हा तुम्ही नियमांचं पालन कराल तेव्हा स्वतःलाच दाद द्या. आपण बनवलेल्या नियमांमुळे आपल्यालाच त्रास होत आहे, असं वाटू देऊ नये. यामुळे तुम्ही बंडखोरी करू शकता, नियम मोडू शकता, पुन्हा जुन्या वर्तनाकडे वळू शकता, त्यामुळे स्वतःवर दया दाखवा. हे वाचा - Sexual Wellness : "मला Casual Sex हवंय; पण तिच्या मनातलं कसं ओळखू?" जेव्हा प्रेम शोधण्याचा विचार कराल तेव्हा लोकांकडे लक्ष देऊ नका, प्रेमाला तुम्ही शोधू द्या. लोकांना मनमोकळे भेटा. त्यांच्याशी कनेक्ट व्हा. पण लक्षात ठेवा की भावनिक आणि शारिरीक गुंतण्यात फार फरक आहे. थोडा वेळ द्या. जेव्हा एखादी व्यक्ती तुमची क्षमता पाहून तुमच्यामध्ये स्वारस्य दाखवेल आणि तुम्ही त्या व्यक्तीस प्रत्यक्ष भेटाल त्यावेळी थोडा वेळ घ्या, आणि दोघांमधील विचार, भावना अधिक सखोल, घट्ट करण्याचा प्रयत्न करा.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या