प्रश्न : लग्नाआधी लैंगिक संबंधांबद्दल तुमचं काय मत आहे? त्याचा वैवाहिक आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? अनेक मुलींना याची काळजी वाटत असते, की त्यांचा पती त्यांना स्वीकारेल की नाही? उत्तर : सेक्स (Sex) अर्थात लैंगिक संबंध हा कोणत्याही नातेसंबंधांचा किंबहुना विवाहाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यात तुमचं लैंगिकदृष्ट्या एकमेकांशी किती सूत जमतं, यावर बरंच काही अवलंबून असतं. कारण लैंगिकदृष्ट्या असमाधानी असलेल्या दोन व्यक्ती एकाच छपराखाली एकत्र राहणं ही कल्पनाच विचित्र, ताण आणणारी आहे. तुम्हाला तुमच्या भावी पतीपासून लैंगिक समाधान मिळण्याची तुमची इच्छा, अपेक्षा असावी. कारण सेक्स ही केवळ पाणी पिणं किंवा जेवणं एवढीच शरीराची गरज नाही. त्यातून तुमचं तुमच्या जोडीदारावर असलेलं प्रेम व्यक्त होत असतं. त्यामुळे विवाहापूर्वी सेक्स (Sex Before Marriage) करणं ही काही वाईट गोष्ट नाही. तुम्हाला दीर्घ काळाचं आणि समाधानकारक वैवाहिक जीवन जगायचं असेल, तर त्या गोष्टीची खात्री करून घ्या. लैंगिक अनुरूपतेच्या अभावामुळे अनेक विवाह मोडतात. हे वाचा - ‘मुलांच्या लैंगिकतेबाबत सांगण्याचा अधिकार आम्हाला आहे, असं पालकांना का वाटतं?’ लग्नाच्या वेळी प्युअर व्हर्जिनिटी (Pure Virginity) अर्थात कौमार्यभंग झालेला नसण्याची स्थिती असावी, असे सामाजिक संकेत आहेत आणि ते लादले जातात, याची मला कल्पना आहे. पत्नी अनुभव नसलेली असावी आणि तिने तिच्या पतीच्या लैंगिक गरजांचं (Sexual Needs) समाधान करावं, अशी तिच्याकडून अपेक्षा असते. पण ‘अॅक्टिव्ह पुरुष’ (Active Man) आणि ‘पॅसिव्ह महिला’ (Passive Woman) अशा संकल्पनांच्या समजांवर सध्या प्रश्न उपस्थित केले जातात. सेक्स अधिकाधिक आनंददायी कसा होईल, याचे मार्ग अधिकाधिक स्त्रिया आणि पुरुष शोधत असतात. जर तुमचा बॉयफ्रेंड हे समजून घेण्याइतक्या मोकळ्या मनाचा असेल, तर तुमचं त्याच्याशी लग्न होण्याची शक्यता सेक्स करण्यावर अवलंबून असू नये. असं असेल तर तुमच्यातले संबंध अधिक दृढ होतात. हे वाचा - ‘मी सर्वकाही करते तो काहीच नाही; नवऱ्याचा पुरुषार्थ न दुखावता त्याला कसं सांगू?’ तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, की तुम्ही खरंच त्याच्या प्रेमात आहात का आणि तो खरंच तुमच्या प्रेमात आहे का? आणि जर तो पारंपरिक सामाजिक बंधनं (Conservative) पाळणारा असेल, तर लग्नाआधी लैंगिक संबंधांसाठी स्त्रीने पुढाकार घेतल्यावर तो तुमच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करू शकतो. अशा स्थितीत तुम्ही त्या व्यक्तीशी खरंच विवाह करू इच्छिता का? (त्याला बाय म्हणण्याची हीच वेळ आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.