Home /News /lifestyle /

Sexual Wellness : लैंगिकतेबाबत सांगण्याच्या अटीवर एखाद्यासोबत डेटवर जाणं योग्य आहे का?

Sexual Wellness : लैंगिकतेबाबत सांगण्याच्या अटीवर एखाद्यासोबत डेटवर जाणं योग्य आहे का?

डेटवर जाण्याआधी अशी अट ठेवणं चुकीचं तर नाही ना?

प्रश्न : जर तुम्ही समलिंगी किंवा उभयलिंगी असाल, तर तुमच्याप्रमाणेच असणाऱ्या एखाद्या व्यक्तीनंही तिचं हे गुपित सर्वांसमोर उलगडावं या अटीवर त्या व्यक्तीसोबत डेटवर जाणं योग्य आहे का? कारण असं झाल्यास या मुद्यावर ती व्यक्ती तुमचे भावनिक शोषण करण्याची शक्यता असते. तसंच तुम्हाला ज्या गोष्टी करण्यास तुम्ही असमर्थ आहात, अशा गोष्टी करण्यास ती व्यक्ती तुम्हाला भाग पाडू शकते. उत्तर : आपला संभाव्य जोडीदार निवडण्यासंबंधी अनेक मुद्दे असतात. या विशेष प्रश्नाच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर यात उतरण्यापूर्वी स्वतःला काही प्रश्न विचारणं आवश्यक आहे. जसं की माझ्या जोडीदारास सार्वजनिक स्वरूपात बाहेर येणं महत्त्वाचं आहे का? माझ्या संभाव्य जोडीदारास गोपनीयता संपवायची आहे की ती माझ्यामुळे संपवावी लागत आहे? डेटिंगसाठी अशी अट ठेवून मी काही गैरव्यवहार तर करत नाही ना? मी अशा काही घटकांचा विचार केला का ज्यामुळे तो सार्वजनिकपणे त्याची स्थिती स्पष्ट करू शकणार नाही? लैंगिकतेसारखे संवेदनशील मुद्याचा गैरवापर होणार नाही, तसंच कोणालाही या आधारवर ब्लॅकमेल करणार नाही, याची खात्री देण्यासाठी अशा प्रकारचा विश्वास तुमच्यामध्ये आहे का? हे वाचा - Sexual wellness : समलिंगी व्यक्तीवरच प्रेम जडलं आहे हे पालकांना कसं सांगावं? मला माहिती आहे की हे फार अवघड प्रश्न आहेत. परंतु, ज्या व्यक्तीने आपली लैंगिक प्रवृत्ती सार्वजनिक केलेली नाही, अशा व्यक्तीबरोबर डेटला जाण्यापूर्वी या मुद्दयावर विचार करणं आवश्यक आहे. तसं पाहिलं तर याचं कोणतीही चूक किंवा बरोबर अशा स्वरुपाचं उत्तर नाही. परंतु, रिलेशनशिपमध्ये ताकदीची गतीशीलता समजून घेण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. जप एखादया व्यक्तीस त्याची लैंगिक प्रवृत्ती जाहीर करण्यास भाग पाडलं तर रिलेशनशिपमध्ये ताटातूट होऊ शकते. त्यानंतर मात्र परिस्थिती हाताळणं कठीण होऊन बसतं. जर तुम्हाला असं वाटतं आहे की ती व्यक्ती जे मुद्द तुमच्यासाठी अडचणीचे आहेत, त्यावर तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते कारण तुम्ही त्याच्यासोबत तसंच केलं आहे तर यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण यात तुम्ही एकमेकांच्या सीमा आणि खाजगीपणाचा विचार करत नसता. हे वाचा - पार्टनर चिट करतोय; एखादं डिव्हाइस वापरून पाळत ठेवणं योग्य आहे का? जी व्यक्ती आपल्या लैंगिक प्रवृत्तीविषयी स्पष्ट आहे, विशेषतः हा खुलेपणा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. अशावेळी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला तुम्ही दोघं कोठे आहात, तुम्हाला कोठे जायचं आहे याविषयी तुम्ही दोघांनी प्रामाणिकपणे चर्चा करणं आवश्यक आहे. सहसा आपण असुरक्षितेमुळे निर्णय घेतो किंवा घेत नाही. असुरक्षेची कारणं समजून घेतल्यावरच आपल्याला समजेल कोणी असं करत आहे किंवा करत नाही. कोणत्याही चांगल्या रिलेशनशिपसाठी चांगला संवाद हा महत्त्वाचा असतो.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या