Home /News /lifestyle /

5 मिनिटांत वीर्यपतन होणं म्हणजे Premature ejaculation असतं का?

5 मिनिटांत वीर्यपतन होणं म्हणजे Premature ejaculation असतं का?

किती वेळानं होणारं वीर्यपर्तन म्हणजे Premature ejaculation आहे? याबाबत sexual wellness तज्ज्ञांनी दिलेलं हे उत्तर

प्रश्न : 5 मिनिटांमध्ये वीर्यपतन होणे अकाली वीर्यपतन आहे का? उत्तर : कोणत्याही लैंगिक संबंधांमध्ये 3 ते 5 मिनिटांमध्ये वीर्यपतन होणं सामान्य आहे. वैज्ञानिक अभ्यासानुसार 2 मिनिटांमध्ये वीर्यपतन होणं हे शीघ्र वीर्यपतन ( premature ejaculation ) लक्षण असल्याचं समोर आलं आहे. माझ्या मते, लैंगिक संबंधांच्या वेळी जोडीदाराचं समाधान झालं नसेल आणि  3 मिनिटांनच्या आत वीर्यपतन झालं तर ते शीघ्र वीर्यपतन आहे. अनेकवेळा  पुरुष पॉर्न पाहून किंवा लैंगिक संबंध ठेवताना आपल्या लैंगिक क्षमतेबाबत चिंता करत असतात. यामुळे काहीवेळा शीघ्र वीर्यपतन ( premature ejaculation) होतं. याचबरोबर जलद हस्तमैथुनामुळे पुरुषाच्या लिंगामध्ये अतिसंवेदनशीलता येऊन वीर्यपतन होतं. यावर एकच उपाय. ज्यावेळी वीर्यपतन होणार आहे असं वाटतं त्यावेळी तुम्ही थांबून पुन्हा लैंगिक संबंध ठेवू शकता. यामुळे लैंगिक संबंधांचा कालावधी वाढून वीर्यपतनाच्या कालावधीमध्येदेखील वाढ होते. पॉईंट-ऑफ-नो-रिटर्न (PNR) म्हणजेच उत्तेजनाची पातळी ही अत्यंत उच्च शिखरावर असते. यावेळी तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रतिक्रियां होतात. तुमच्या ओटीपोटाच्या वरील भागात एक दबाव तयार करून तुमचं वीर्य बाहेर येतं. अनेकजण याच पद्धतीने लैंगिक सुखाचा आनंद घेतात. याचवेळी तुम्ही काहीक्षण विश्रांती घेऊन पुन्हा याचा आनंद घेऊ शकता. हे वाचा - sexual wellness : पॉर्न किंवा  Adult films मधून लैंगिक शिक्षण मिळू शकतं का? संबंध ठेवत असताना अशी परिस्थिती निर्माण झाल्यास वीर्यपतन होऊ न देता तुम्ही विश्रांती घ्या. यामुळे तुम्हाला आणखी ताकद आणि जास्त वेळ लैंगिक संबंध ठेवण्यास उत्तेजना मिळेल.लैंगिक संबंध ठेवत असताना प्रत्येक 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही विश्रांती घेत ही क्रिया करू शकता. यामधील विश्रांतीच्या काळात दीर्घश्वास घेत तुमच्या पार्टनर्सशी बोलत, डोळ्यातून संवाद साधत ही क्रिया पुन्हा सुरू करू शकता. यामुळे तुमचा लैंगिक सुखाचा कालावधी वाढण्यास मदत होणार असून तुमच्या पार्टनरलादेखील यामधून आनंद मिळणार आहे. लैंगिक संबंध ठेवताना केवळ वीर्यपतनाकडे लक्ष न देता तुमच्या पार्टनरच्या शरीराचे आणि तुमच्या शरीराचं निरीक्षण करा. या कालावधीत फोरप्लेवर लक्ष केंद्रीत करताना लिंग आतमध्ये टाकण्याची घाई करू नका. यामुळे तुम्हाला लैंगिक सुखाचा खरा आनंद मिळणार असून वीर्यपतन देखील उशिरा होईल. हे वाचा - Sexual Wellness : 'मला Sex addiction आहे, त्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी काय करू?' आजच्या पिढीच्या व्यक्तींमध्ये वीर्यपतन म्हणजेच लैंगिक सुख आहे हा चुकीचा समज आहे. याला पॉर्न आणि इतर अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. सेक्स ही खूप वेगळी गोष्ट आहे. केवळ वीर्यपतन म्हणजेच लैंगिक संबंध नसून शरीराच्या कामुक भागांवर लक्ष दिल्यानं तुमचं जीवन आणि लैंगिक जीवनदेखील समाधानकारक होईल.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या