Sexual wellness : Adult films मधून लैंगिक शिक्षण मिळू शकतं का?

Sexual wellness : Adult films मधून लैंगिक शिक्षण मिळू शकतं का?

एका विशिष्ट वयात सेक्सबाबत (Sex) जाणून घेण्याची उत्सुकता असते, अशावेळी अशा माध्यमांकडे बहुतेक जण वळतात.

  • Share this:

प्रश्न : पॉर्न किंवा अॅडल्ट चित्रपटांमधून आम्ही सेक्सविषयी माहिती आणि शिक्षण मिळवू शकतो का?

उत्तर : दुर्देवाने आमचे पालक आणि शिक्षक आम्हाला आमच्या वाढत्या वयात सेक्सविषयीचे योग्य शिक्षण देऊ शकले नाहीत. त्यामुळे सेक्सविषयी विविध घटकांचे शिक्षण आम्हाला केवळ पॉर्न, अॅडल्ट चित्रपट किंवा मासिकांमधून घ्यावं लागलं. पण हे काही सक्षम किंवा खात्रीशीर स्त्रोत नक्कीच नव्हते. वास्तविकपणे पॉर्न आणि अॅडल्ट चित्रपटांत सेक्स कसं असतं हे दाखवलं जात नाही. तर त्यात केवळ सेक्स काय असावं याचे रोमॅंटिक, काल्पनिक असं दर्शन घडतं.

अॅडल्ट किंवा पार्न चित्रपटांमध्ये सेक्सविषयी आपल्याला दाखवल्या जात नसलेल्या काही गोष्टी अशा

- संसर्गजन्य रोग, तसंच गर्भधारणा रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कंडोमसारख्या साधनांचा वापर कसा केला जातो.

- स्त्रियांचं ejaculation किंवा orgasms

- सेक्स करताना कोणत्या शारीरिक गोष्टी आणि पोझिशन्स टाळाव्यात याची माहिती.

- प्रत्यक्ष सेक्स करताना येणाऱ्या अडचणी आणि ल्युब्रिकंटसची कमतरता

- अकार्यक्षमता

हे वाचा - Sexual Wellness : 'आजही भारतीय समाजात Premarital sex का स्वीकारलं जात नाही?'

असं असले तरी अनेक प्रौढ व्यक्ती सेक्ससाठी पॉर्न किंवा अॅडल्ट चित्रपटांची मदत घेऊ शकतात. पण हा खात्रीशीर शैक्षणिक पर्याय असू शकत नाही. त्यामुळे यातून मिळणारी माहिती ही तज्ज्ञांकडून तपासून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.

Published by: Priya Lad
First published: January 22, 2021, 11:31 PM IST

ताज्या बातम्या