Home /News /lifestyle /

Sexual Wellness : जास्त वेळा हस्तमैथुन करणं वाईट आहे का?

Sexual Wellness : जास्त वेळा हस्तमैथुन करणं वाईट आहे का?

हस्तमैथुन (masturbate) करण्याची काही विशिष्ट मर्यादा असते का?

प्रश्न : मी आठवड्यातून 3 वेळा हस्तमैथुन (masturbate) करतो. यामुळे मला तणावापासून मुक्तता मिळते. ही गोष्ट चांगली आहे की वाईट? मला माझे मन या गोष्टींपासून विचलित करण्याची गरज आहे का? हे इरेक्शन मला झोपेतच होते. उत्तर : एखाद्या व्यक्तीनं एका आठवड्यात कितीवेळा हस्तमैथुन करावं हे व्यक्तीपरत्वे अवलंबून असते. तुमची हस्तमैथुनाची संख्या ही उत्तेजना देणाऱ्या हार्मेन्सची पातळी, तुमच्या लैंगिक सवयी, तुमच्या संगोपनातील धार्मिक, सांस्कृतिक पैलू, तुमच्या लैंगिक आवश्यक आणि हस्तमैथुनाविषयी तुमची असलेली मतं यावर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीने कितीवेळा हस्तमैथुन करावं याची निश्चित आणि आदर्श अशी संख्या नाही. असे अनेक मुद्दे असले तरी हस्तमैथुन करणं हे चांगलं. स्वतःची लैंगिक काळजी घेण्याचा हा उत्तम प्रकार असून तो तुम्ही शरीराला देऊ शकता. प्रामुख्याने पुरुषांसाठी हस्तमैथुनाचे अनेक फायदे (masturbation health benefits) आहेत. हस्तमैथुनामुळे मूड आणि झोप सुधारते. तणावापासून मुक्तता मिळते. प्रोस्टेटचे आरोग्य तसंच रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. हे वाचा - Sexual Wellness : बायको Oral Sex साठी नकार देते, तिला कसं तयार करू? लैंगिक उत्तजेना वाटत असल्यास तुम्ही कितीही वेळा हस्तमैथून करू शकता. जोपर्यंत दैनंदिन जीवनातील कार्यात काही हस्तक्षेप निर्माण होत नाही. अर्थपूर्ण नातेसंबंध तयार होत नाही. तोपर्यंत याची वारंवारता अनिवार्य नाही. तसंच हस्तमैथुन करणं ही हानिकारक सवय (Bad Habit) नाही. मात्र जेव्हा ही बाब अनिवार्य होते तेव्हा आम्ही त्याला हस्तमैथुन सक्ती असं म्हणतो. मात्र असं असताना हे जाणून घ्या की हस्तमैथुन व्यसन झालेलं नाही ना. कधी कधी लोक जागरूक नसतानाही हस्तमैथून करतात. ते करण्याची सक्ती त्यांच्यावर असते. जर एखादी व्यक्ती जबरदस्तीनं हस्तमैथुन करत असेल तर त्याच्या गुप्तांगाला दुखापत होण्याची शक्यता असते. अशावेळी त्याच्या जननेंद्रियाला सूज (Penis) देखील येते. अशा वेळी ही समस्या संबंधित व्यक्ती कंट्रोल करू शकत नाही. जर एखादी व्यक्ती काम करू शकत असेल, मित्र किंवा कुटुंबातील व्यक्तींसोबत वेळ घालवण्यास सक्षम असेल तसंच अन्य कर्तव्ये पार पाडत असेल तर त्या व्यक्तीने दररोज हस्तमैथुन करण्यास हरकत नाही. वस्तुतः असं दिसून आलं आहे की ज्या पुरुषांनी आपल्या तरुण वयात कधीही हस्तमैथुन केलं नाही अशा पुरुषांचं जननेंद्रिय अतिसंवेदनशील असतं आणि त्यामुळे अकाली उत्सर्ग होण्याची समस्या उद्भवते. हस्तमैथुन ही लैंगिक अनुभवासाठीचा एक निव्वळ सराव आहे, त्यामुळे तो करणं यात काही गैर नाही. हे वाचा - Sexual Wellness : हस्तमैथुन करताना पॉर्न पाहवं की नाही? तुम्ही हस्तमैथुन एकदिवसाआड, दररोज किंवा शरीराच्या नैसर्गिक गरजेनुसार करू शकता. जोपर्यंत ते सक्तीनं केलं जात नाही तोपर्यंत आठवड्यातून 3 वेळा किंवा 5 वेळा करणं चांगलं. प्रोस्टेट ग्रंथीच्या आरोग्यासाठी वैद्यकीयदृष्टया आठवड्यातून 5 वेळा इजॅक्युलेट करणं चांगलं. तुम्ही या निकषात चांगले बसत आहात, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. सोलो सेक्सनंतर तुमच्यामध्ये जर अपराधीपणाची भावना तर येत नाही ना याची खात्री करा. आपणच आपल्या हाताने लैंगिक आनंद घेतल्याची भावना निर्माण होईल आणि त्यानंतर हस्तमैथुनाविषयी चर्चा करणंदेखील तुमच्यासाठी आरामदायी असेल. सर्व केल्यानंतर आलेली भावनात्कोटता खूपच छान असेल. पुरुषांची जननेंद्रिय विकृती, शुक्राणूंची संख्या (No. of Sperms) किंवा कोणत्याही मानसिक विकृतींची चिंता न करता तुम्हाला हव्या तितक्या वेळा तुम्ही हस्तमैथुन करू शकता. लक्षात ठेवा की हस्तमैथुन लैंगिक अभिव्यक्तीचा एक नैसर्गिक, निरोगी प्रकार आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या