Home /News /lifestyle /

Sexual Wellness : पुरुषांचं नाही पण फक्त त्यांच्या लिंगाचं आकर्षण असणं हे विचित्र आहे का?

Sexual Wellness : पुरुषांचं नाही पण फक्त त्यांच्या लिंगाचं आकर्षण असणं हे विचित्र आहे का?

त्याला फक्त पुरुषी लिंगाचंच आकर्षण वाटतं.

प्रश्न : मी आणि माझा बॉयफ्रेंड जरा विक्षिप्त आहोत. अलिकडेच त्याने मला सांगितलं की मला पुरुषांविषयी कोणतंही आकर्षण नाही. पण त्याला पुरुषाच्या लिंगाचं (Penis) आकर्षण (Fetish) आहे आणि दोघांनी एकाच वेळी लिंग (Suck) चोखायला त्याला आवडेल. अशा वेळी मी काय काळजी घ्यावी? उत्तर : फेटिश (fetish) ही अशी इच्छा असते, जी शरीराच्या विशिष्ट भागाच्या किंवा सामान्यतः लैंगिक अवयव नसलेल्या वस्तूभोवती केंद्रीत असते. उदाहरणार्थ, फूट फेटिश असलेल्या लोकांमध्ये पायाच्या अनुषंगाने तीव्र लैंगिक भावना असते किंवा त्यांना त्याची आवड असते. असे लोक लैंगिक उत्तजेनेकरिता पायाचा वापर करतात. फूट फेटिश असलेल्या व्यक्तीला पायांभोवती विविध क्रिया करणं आवडतं. जसं पायाच्या बोटांना किस करणं, उंच टाचांना कुरवाळणं इत्यादी. लैंगिक आणि मानसिक उत्तेजनेकरिता त्यांना या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. फेटिश असणं हे सामान्य आहे, त्यात काळजी करण्यासारखं काहीही नाही. जोडीदाराचं फेटिश हे अर्थपूर्ण लैंगिक किंवा प्रेमसंबंध ठेवण्यासाठी असेल तर योग्य असतं. परंतु, या मार्गाने एखाद्या व्यक्तीने स्वतःला किंवा जवळच्या व्यक्तीला त्रास दिला तर तो चिंतेचा विषय ठरतो, कारण फेटिश ही एक समस्या देखील आहे. एखाद्या उदाहरणाचा आपण इथं विचार करू या. हे वाचा -  Sexual wellness:केवळ लैंगिक संबंधांसाठी वापर करणाऱ्या पुरुषांमध्ये रस असेल तर? क्रॉसड्रेसिंग हा सरळ पुरुषांमधील कॉमन फेटिश आहे. अशा पुरुषांना स्त्रियांचे कपडे घालणं, ड्रेसिंग स्टाइल करणं, नेलपेंट लावणं, स्त्रियांची अंतर्वस्त्रं घालणं आवडतं. ही फेटिश प्रवृत्ती प्रमाणापेक्षा जास्त बिघडली आणि संबंधित व्यक्ती कुटुंबातील इतर सदस्यांसमोर सातत्यानं आणि जबरदस्तीनं क्रॉसड्रेस घालत असेल तर ही बाब कदाचित काळजी करण्यासारखी आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार फेटिश आणि विकृतीविषयी उघडपणे बोलू शकत असाल तर त्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं जाऊ शकतं. त्याचवेळी जेव्हा एखाद्या फेटिशचा शोध घेण्याची वेळ येते तेव्हा आपण कम्फर्टेबल आहोत ना हे पाहणं आवश्यक आहे. कोणत्याही नातेसंबंधात एका जोडीदाराने फेटिश एक्सप्लोअर करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यात सहभागी असलेल्या इतर जोडीदारांमध्ये त्याबाबत एकमत, खुलेपणा आणि प्रामाणिकपणा असणं आवश्यक आहे. हे वाचा - लैंगिकतेबाबत सांगण्याच्या अटीवर एखाद्यासोबत डेटवर जाणं योग्य आहे का? तुमच्या जोडीदाराची विषम लैंगिक म्हणून ओळख असेल तरी तो अभिव्यक्तीचे नवीन प्रकार शोधून काढू शकतो. आपल्या जोडीदाराच्या लैंगिक प्रवृत्तीपेक्षा शरीर अवयवाच्या रूपात पेनिसचे आकर्षण हे पुष्कळ काही सांगून जाते. कारण त्याचा संपूर्णपणे रोमॅंटिक आणि लैंगिक आकर्षणाशी अधिक संबंध आहे. तुमच्या जोडीदाराशी तो खरंच तुमच्याबरोबर अशा प्रकारचे एक्सप्लोरेशन करण्याचा प्रयत्न करतो की नाही, की याबाबत फक्त संभाषण करतो किंवा ती फक्त एक कल्पनारम्यता आहे, आणि त्याला त्यावर कृती करायची आहे की नाही, तसंच तुमची आवड काय आहे, याविषयी तुम्ही दीर्घ संवाद साधण्यास सुरुवात करावी.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या