Home /News /lifestyle /

Sexual Wellness : अनोळखी व्यक्तीसोबत सेक्स्टिंग करणं चुकीचं आहे का?

Sexual Wellness : अनोळखी व्यक्तीसोबत सेक्स्टिंग करणं चुकीचं आहे का?

सेक्स्टिंग केल्यानंतर मला अपराधी असल्यासारखं वाटतं.

प्रश्न : एका अपरिचित चॅट अॅपवर सेक्स्टिंग केल्यानंतर मला अपराधी वाटतं. मी केलं ते योग्य आहे का? मी काही चूक तर नाही ना केली? उत्तर : अपराधीपणा हा राग, उदासीनता आणि आनंद यासारख्या नैसर्गिकरित्या येणारी भावना नाही. अपराधीपणा हा कोणत्याही सामाजिक नियमाचे उल्लंघन केल्यानंतर येतो. कोणी जर आपल्या जोडीदाराला धोका दिला तर अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते. कारण त्या व्यक्तीने विवाह नावाचा सामाजिक करार दोघांच्या सहमतीने तोडला आहे. तुम्हाला अपराधी का वाटतं आहे याचा स्त्रोत शोधू शकता. आपणास असं वाटतं की आपण एखाद्याला आपल्या अंतरिक इच्छेविषयी गरजेपेक्षा जास्त सांगितलं? ती व्यक्ती तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अन्य व्यक्तींना सांगेल यामुळे तुम्ही घाबरत आहात का? एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत सेक्स्टिंग केल्यानं चांगले आचरण असलेली महिला अशा तुमच्या प्रतिमेला धक्का लागेल, याची तुम्हाला भीती वाटते का? तुमच्यावर दबाव आल्यानं तुम्ही अनोळखी व्यक्तीला सेक्स्ट केलं आहे किंवा यापेक्षा वेगळ्याच कारणासाठी तुम्ही असं केलं आहे? उदाहरणार्थ तुम्हाला मजा, फ्लर्टिंग किंवा मस्त दिसणं आवडतं हे दर्शवण्यासाठी हे आहे? जर सहमतीनं आणि सुरक्षित वातावरणात सेक्स्टिंग केलं तर ते पूर्णतः चांगलं आहे. आजच्या डिजीटल डेटिंगच्या युगात सेक्स्टिंग हा बऱ्याच लोकांचा अविभाज्य भाग बनला आहे. आज जगभरात व्यक्तीवाद मोठ्या प्रमाणावर प्रगतीपथावर आहे, त्यामुळे लोकांमध्ये लैंगिक स्वभाव स्विकारण्याची गरज वाढली आहे. सेक्स्टिंग आपल्याला हे करण्यास मदत करते. हे वाचा - Sexual Wellness : पुरुषांचं नाही पण त्यांच्या लिंगाचं आकर्षण, हे विचित्र आहे का? जेव्हा तुम्ही सेक्स्ट करता तेव्हा तुम्हाला लैंगिक उत्तेजना कोणत्या गोष्टीने येते, तुमची लैंगिक गरज काय आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारचे लैंगिक व्यवहार आवडतात, सेक्स तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे हे समजते. आपली लैंगिक सीमा निश्चित करण्यासाठी आणि उत्कृष्ट लैंगिक समाधानासाठी अशा गोष्टी मदत करतात. आपला जोडीदार किंवा ज्याच्याशी आपले रोमॅंटिक संबंध आहेत त्यांना सेक्स्ट करण्याची परवानगी आपल्याला सामाजिक नियमानुसार आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी सेक्स्ट करण्यात काहीही गैर नाही. तुम्ही त्याबद्दल चिंता करू नये. तुम्ही एकटे असाल किंवा रिलेशनशिपमध्ये लैंगिक गरजा या वैधच आहेत. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा स्थितीत असाल की तुम्हाला सध्या रिलेशन ठेवायचे नाहीत किंवा तुम्हाला हवी असलेली व्यक्ती अद्याप सापडलेली नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही संमतीने ते मिळवू इच्छित असला तरी तुमच्या लैंगिक गरजा भागवण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला नाही. ज्या अपराधीपणाच्या भावनेनं तुम्ही ग्रस्त आहात त्याचा स्त्रोत सामाजिक मान्यता आहे. ज्या समाजात आपण राहतो, ज्या संस्कृतीचा आपण स्वीकार करतो त्यात लैंगिक गरजा, इच्छा याविषयी खुलेपणानं बोलण्यास मनाई आहे. महिलांना देखील लैंगिक गरजा असतात, त्यांच्याही लैंगिक इच्छा असतात ही गोष्ट आजही अनेक लोकांच्या लक्षात येत नाही, किंवा ती त्यांच्या पचनी पडत नाही. या स्थितीत सेक्स्टिंग हे एक साधन बनतं. जर आपल्याला सेक्स किंवा लैंगिक इच्छेच्या दृष्टीकोनातून एक खुला, मुक्त आणि सहिष्णु समाज हवा असेल तर आपल्याला याची आवश्यकता आहे. हे वाचा - Sexual wellness : ब्रेकअपनंतर नवं नातं जोडणं जड जातंय, काय करू? सेक्स्टिंग करताना काही गोष्टींबाबत सावधानता बाळगणं गरजेचं आहे. सर्वसाधारण गप्पा मारणं हे ठिक आहे. परंतु जर अनोळखी व्यक्तीला जर तुम्ही तुमचे नग्न फोटो शेअर केले तर तुम्ही सायबर गुन्हेगार ठरू शकता किंवा ती व्यक्ती तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते. त्यामुळे समोरील व्यक्तीने कितीही दबाव टाकला तरी तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती, छायाचित्रे शेअर करू नयेत. एकटेपणा, कुटुंबापासून विभक्त झाल्याने आपण ज्यांच्याशी बोलू शकू अशा व्यक्ती शोधणं अनेकांसाठी आवश्यक बनलं आहे. अनेकसाठी सेक्स्टिंगची दुनिया हे आनंद राहण्याचं माध्यम बनलं आहे. परंतु तात्पुरतं समाधान आणि दीर्घकालीन आनंद आणि समाधान यात फरक आहे. जर तुम्ही सेक्स्टिंगचा प्रयोग आपली इच्छा व्यक्त करण्यासाठी किंवा त्याठिकाणी मी आहे असा संदेश देण्यासाठी करणार असाल तर त्यासाठी मित्र आणि सोशल ग्रुप्समध्ये सहभागी व्हावं. जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोनासाठी चांगला वैकल्पिक मार्गाचा प्रयोग करावा. अगदीच गरज वाटत असेल तर यासाठी योग्य समुपदेशकाची मदत घ्यावी.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या