मुंबई, 24 जानेवारी: लैंगिक सुख प्रत्येक जोडीदाराच्या आयुष्यातील नाजुक आणि अनमोल क्षण असतो. या क्षणाचा आनंद महिलेच्या गर्भावस्थेत कमी होतो असं काहींचं म्हणणं असतं. मात्र गर्भावस्थेत महिलांना अतिदक्षता घेण्याची गरज असते. पहिल्या तीन महिन्यांनंतर सेक्स केला तर गर्भपाताचा धोका किंवा गर्भाशयाला त्रास होण्याचा धोका होऊ शकतो या भीतीपोटी सेक्स करणं बंद केलं जातं. गर्भधारणेत सेक्स करणं चुकीचं आहे किंवा घातक आहे असा एक समज आपल्याकडे आहे. मात्र एका अभ्यासातून हा समज चुकीचा असल्याचं सिद्ध झालं आहे. गर्भधारणेनंतर महिलांना सेक्स करण्याची तीव्र इच्छा होते. सेक्स दरम्यान महिलांच्या अंगातील रक्तस्राव वेगानं होत असतो. त्यामुळे सेक्सचा आनंद त्या पुरेपुर घेत असतात. गर्भावस्थेत महिलांच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. अशावेळी जर आपल्या पत्नीसोबत डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानं सेक्स केला तर दोघांनाही आनंद मिळू शकतो. सेक्स हा फक्त आनंद देण्यासाठीच नाही तर आपल्या पार्टनरसोबत बॉन्डिंग अधिक घट्ट होतं. त्यामुळे गर्भावस्थेत सेक्स करू नये अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यापेक्षा डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन त्याची कारणमीमांसा करणं दोघांच्याही हिताचं ठरेल. गर्भावस्थेत सेक्स केल्यामुळे महिला किंवा अर्भकाला कोणताही धोका नाही. गर्भावस्थेत जोपर्यंत कॉप्लिकेशन्स येत नाहीत तोपर्यंत घाबरण्यासारखं कोणतंही कारण नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मिसकॅरेज म्हणजे गर्भ पडणं किंवा जास्त रक्त जाणं अशा अवस्थेत डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं हिताचं ठरेल. गर्भधारणेनंतर तुम्हाला जर तुमच्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवायचे असतील तर काही गोष्टी मात्र कटाक्षानं पाळायला हव्या. हेही वाचा- नथेचा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल, घातल्यावर तुम्हीही दिसाल सौंदर्यवती सेक्स आधी आणि नंतर गुप्तांगाची स्वच्छता राखणं सर्वात महत्त्वाचं आहे. सेक्स करताना कॉन्डमचा वापर अवश्य करावा. त्याच बरोबर कॉन्डममुळे जर त्वचेला त्रास होत असेल किंवा जळजळत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामध्ये सेक्सुअल ट्रांसमिटेड डिसिजचा धोका अधिक असतो. यामध्ये पत्नीच्या कन्फर्टचा आणि पोझिशनचा विचार करणं अधिक महत्त्वाचं असतं. अशावेळी शक्यतो ऑन द टॉप’ पोझिशन सेफ मानली जाते. गर्भावस्थेत कधी करू नये सेक्स: गर्भावस्थेत रक्तस्राव जास्त जात असेल तर सेक्स करणं टाळावं. त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. अॅमनॉयटिक फ्लूड (हे गर्भ पिशवीमध्ये असतं) गर्भाशयातून येत असेल तर अर्भकाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पेल्विक फ़्लोर गर्भाशयातील एक भाग आहे. हा कमजोर असेल तर सेक्स आणि गर्भ अशा दोन्ही अवस्था एकाचवेळी सहन करू शकत नाही. त्यामुळे अशावेळी सेक्स न करणं हिताचं ठरेल. यासंदर्भातील अधिक माहिती डॉक्टरांकडून घेणं हिताचं ठरेल. गर्भपात झाल्यानंतर सेक्स करण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गर्भाशयात जुळे किंवा तीळे म्हणजे दोन किंवा तीन अर्भक असतील तर गर्भ राहिल्यानंतर सेक्स करू नये. त्यामुळे बाळंतपणात समस्या निर्माण होऊ शकतात. गर्भधारणेनंतर सेक्स करावा की नाही हे काही वेळा महिलेच्या प्रकृतीवरही अवलंबून असू शकतं. त्यामुळे गर्भधारणेनंतर कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यामुळे बाळ आणि महिला दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होणार नाही. हेही वाचा- तुमच्या उजव्या छातीत दुखतंय…असू शकतात ‘ही’ कारणं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.