तुमच्या उजव्या छातीत दुखतंय...असू शकतात 'ही' कारणं

तुमच्या उजव्या छातीत दुखतंय...असू शकतात 'ही' कारणं

छातीत दुखायला लागलं की हार्ट अटॅकच आला अशी भीती प्रत्येकाला वाटतं. मात्र उजव्या छातीत दुखण्याची अनेक कारणे आहेत.

  • Share this:

आई गंsssss... छातीत कळ आली... छातीत दुखायला लागलं की मला हार्ट अटॅक आलाय असंच प्रत्येकाला वाटतं. मात्र प्रत्येक वेळी छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅकच असेल असं नाही. त्यातही जर तुमच्या छातीच्या उजव्या बाजूला दुखत असेल. तर तो हार्ट अटॅक नसून,  त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात.

अँझायटी किंवा पॅनिक अटॅक

छातीत दुखणं हे अँझायटी किंवा पॅनिक अटॅकचं लक्षण असू शकतं. छातीच्या स्नायूंवर ताण आल्याने असं होतं. एकदा का पॅनिक अटॅक येणं बंद झासलं की छातीतील वेदना आपोआप बंद होतात.

स्नायूंवर ताण

तुम्ही नेहमी जीमला जाता का किंवा मेहनतीचं असं काम करता का, तर तुमच्या छातीतील दुखण्यामागे स्नायूंवर आलेला ताण कारणीभूत असू शकतो. तुम्ही उजव्या हाताचा सर्वात जास्त वापर करता त्यामुळे छातीच्या उजव्या बाजूवर ताण येतो.

अशावेळी पेनकिलर, कोल्ड कम्प्रेसर किंवा पुरेशा आरामाने स्नायूंवरील ताण कमी करता येईल.

अॅसिड रिफ्लेक्स

गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लेक्स डिसीज (GERD) आणि अॅसिड रिफ्लेक्स असल्यास हार्टबर्न म्हणजे छातीत जळजळ होते. अँटासाईड (antacids) घेतल्यानंतर जर तुमच्या उजव्या छातीतील वेदना दूर झाल्या, तर GERD किंवा अॅसिड रिफ्लेक्समुळे तुमच्या छातीत दुखत असावं.

पित्ताशयाला सूज

पित्ताशयाला काही कारणामुळे सूज आली असल्यास शरीराच्या उजव्या बाजूची छाती, पोट, खांदा आणि पाठीत दुखतं. याशिवाय मळमळ, उलटी, घाम, भूक मंदावणं, ताप अशी लक्षणंही दिसून येतात.

स्वादुपिंडाला सूज

पॅनक्रिएटायटिस (Pancreatitis)म्हणजे स्वादुपिंडाला सूज आल्यासही उजव्या छातीत आणि पाठीत दुखतं.

छातीत दुखत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याला गांभीर्याने घ्या. विशेषत जर छातीत वेदना होण्यासह चक्कर, मळमळ, उलटी, घाम, छातीतील वेदना डावा हात, खांदा किंवा जबड्यापर्यंत जात असल्यास तात्काळ ड

डॉक्टरांकडे जा. त्यामुळे छातीत दुखण्याची कारणं माहिती झाली असली, तरी घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

सोर्स - हेल्दी बिल्डर्झ

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

अन्य बातम्या

Health Tips: अर्धशिशीचा त्रास वाढण्याची ही आहेत कारणं; वेळीच द्या लक्ष

दात दुखीने त्रस्त असाल तर घरगुती उपायांनी होईल वेदनेतून सुटका!

First published: January 24, 2020, 10:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading