मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अंतराळातही लैंगिक संबंध? NASA चं सिक्रेट एक्सपेरिमेन्ट आलं समोर

अंतराळातही लैंगिक संबंध? NASA चं सिक्रेट एक्सपेरिमेन्ट आलं समोर

स्पेसमधील लैंगिक संबंधाच्या गुप्त प्रकल्पाला नासाने STS-XX असं नाव दिलं होतं.

स्पेसमधील लैंगिक संबंधाच्या गुप्त प्रकल्पाला नासाने STS-XX असं नाव दिलं होतं.

स्पेसमधील लैंगिक संबंधाच्या गुप्त प्रकल्पाला नासाने STS-XX असं नाव दिलं होतं.

    वॉशिंग्टन, 14 डिसेंबर : विज्ञानातल्या प्रगतीमुळे केव्हाच चंद्रावर (Moon) पोहोचलेल्या माणसाने आता मंगळावरही (Mars) स्वारी केली आहे. आता अवकाशातल्या वेगवेगळ्या ग्रहांवर मानवी वस्ती वसवता येईल का याची तयारी सुरू झाली आहे. मंगळापासून चंद्रापर्यंत जीवसृष्टी आहे का किंवा जीवसृष्टी तग धरू शकते का याची चाचपणी केली जात आहे. यासाठी जगभरातल्या अनेक देशांच्या अंतराळ संशोधन संस्था (Space Research Institutes) अंतराळ मोहिमांचं आयोजन करत आहेत. अंतराळयानातून शास्त्रज्ञांना, तज्ज्ञांना काही महिन्यांसाठी अंतराळात पाठवलं जात असून, ते विविध प्रयोग करत आहेत. अंतराळ सफरी घडवण्याचंही नियोजन सुरू आहे. संशोधनासाठी अनेक महिने अंतराळयानात राहणारे शास्त्रज्ञ, संशोधक यांचं यानातलं जगणं अधिकाधिक सुसह्य व्हावे यासाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना पृथ्वीवर (Earth) जसं जीवन जगता येतं, तसंच आयुष्य अंतराळयानात (Spaceship) जगता यावं, यासाठी अनेक प्रयोग केले जातात. यामध्ये जेवण, फळं, कपडे अशा अनेक बाबींचा विचार केला जातो. अनेक वर्षांच्या संशोधनामुळे यातल्या अनेक समस्या दूर करणं शक्य झालं आहे. सध्या एका वेगळ्याच विषयावर 'नासा' या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने (NASA) गुप्तपणे प्रयोग (Experiment) केल्याची चर्चा आहे. हा प्रयोग आहे अंतराळात सेक्स (SEX) करता येईल का याबाबतचा.  अर्थात 'नासा'ने मात्र अशा प्रकारचा कोणताही प्रयोग केल्याचं नाकारलं आहे.

    अंतराळयानात राहणाऱ्या व्यक्ती तरंगतच असतात. कारण अंतराळात गुरुत्वाकर्षण बल (Gravitational Force) नाही. तिथे कोणत्याही पृष्ठभागावर स्थिर राहणं शक्य नाही. त्यामुळे अंतराळात सेक्स करणं अशक्यच आहे. तज्ज्ञांच्या मते हे करणं खूप कठीण आहे. यामध्ये अनेक अडचणी येतील. तसंच ते खूप आव्हानात्मक आहे. काही दिवस नव्हे, तर काही महिने अंतराळात राहणाऱ्या व्यक्ती सेक्सशिवाय कशा जगतात? एखादं जोडपं अंतराळात गेलं, तर ते अवकाशयानात सेक्स करू शकेल का, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी 'नासा'ने हा प्रयोग केल्याची चर्चा आहे. आतापर्यंत पाचशेहून अधिक व्यक्ती अंतराळात गेल्या आहेत. आगामी काळात ही संख्या झपाट्याने वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण आता अनेकांना सुट्टी घालवण्यासाठीही अवकाशात जाण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानवाच्या या नैसर्गिक गरजेबाबत प्रयोग केले जात असल्याचं म्हटलं जात आहे.

    हे वाचा - सेक्सविषयी महिलांपेक्षा पुरुषांनाच वाटतं 'NO means NO' - कौटुंबिक सर्वेक्षण

    फ्रेंच वैज्ञानिक लेखक पिएर कोहलर (Pier Koehler) यांनी या विषयावर 'द फायनल मिशन : मीर, दी ह्युमन अ‍ॅडव्हेंचर' नावाचं एक पुस्तक लिहिलं असून, यात त्यांनी 'नासा'च्या या प्रयोगाचा उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 1996 मध्ये अंतराळात गेलेल्या एका जोडप्याने सेक्स केला होता; पण यात अनेक समस्या आहेत. 'नासा'ने या गुप्त प्रकल्पाला STS-XX असे नाव दिले होते, असंही पिएर यांनी लिहिलं आहे. या गुप्त प्रकल्पाच्या माध्यमातून शास्त्रज्ञांनी अंतराळयानात सेक्स केला तर तो कोणत्या स्थितीत केला जाऊ शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयोगात शास्त्रज्ञांनी अवकाशात सेक्स कसा करता येईल, हे संगणकीय मॉडेलद्वारे (Computer Graphics) शोधून काढलं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या शारीरिक स्थितीचा विचार करण्यात आला. इतकंच नाही, तर या प्रयोगाकरिता दोन डुकरांचाही वापर करण्यात आला. शून्य गुरुत्वाकर्षणात या डुकरांनी (Pigs) शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची नोंद करण्यात आली असून, त्याचा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे लेखक पिएर कोहलर यांनी म्हटलं आहे. ही व्हिडिओ टेप संवेदनशील असल्यानं 'नासा'नं फक्त त्या टेपचा सेन्सॉरने मान्यता दिलेला भागच उपलब्ध केला आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

    हे वाचा - बायकोचे पाय पाहताच वेडापिसा होतो नवरा; जे करतो ते वाचूनच थक्क व्हाल

    'नासा'ने (NASA) मात्र असा कोणताही प्रयोग केल्याचं नाकारलं आहे. रशियन स्पेस एजन्सीनेदेखील (Russian Space Agency) असा कोणताही प्रयोग झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'नासा'ने जोडप्याला अंतराळात पाठवण्याबाबत कठोर नियम केले आहेत. भविष्यात यामध्ये काय बदल होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    First published:

    Tags: Lifestyle, अंतराळ