नवी दिल्ली, 14 डिसेंबर : मधल्या काळात प्रदर्शित झालेल्या पिंक चित्रपटाची कथा तुम्हाला आठवते का? एक किशोरवयीन मुलगी तिच्या मित्रासोबत खूप फ्रेंडली वागत असते. ती त्याच्याशी नेहमी मनमोकळेपणाने वागते-बोलते. ते एकमेकांसोबत पार्ट्यांमध्येही जातात. मात्र, एका दिवशी पार्टीत त्या मित्राने मुलीकडे सेक्सची मागणी केली. तिच्या मनमोकळ्या, फ्रेंडली वागण्याला तो तिची सेक्सची इच्छा आहे, असे समजत होता. त्यावर मुलीने स्पष्ट नकार दिला. ती नकार देऊन कंटाळली, मात्र त्याला तिचा ना म्हणजे हा आहे असे वाटत राहिले. यातून त्या मुलीच्या अत्याचाराची कहाणी सुरू होते. 'महिलांचा नकार हा नकारच मानला पाहिजे' यावर हा चित्रपट जोर देतो. त्यांच्या नकाराला होकार समजण्यात चूक करणे (wife have right to refusing sex) चुकीचे आहे.
पिंक चित्रपटाचा लोकांवर किती परिणाम झाला, याबाबत माहिती नाही. पण, देशात निदान केरळ असं राज्य आहे, जिथं पुरुषांना महिलांचा सेक्सविषयी नकार हा नकारच असल्याचे समजते. भारत सरकारच्या कौटुंबिक सर्वेक्षण अहवालात ही बाब समोर आली आहे.
सेक्सला नकार देण्याचा पूर्ण अधिकार
TOI च्या बातमीनुसार, केरळमधील महिलांपेक्षा अधिक पुरुषांना असे वाटते की, लैंगिक संबंधादरम्यान महिलांची संमती अधिक महत्त्वाची आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे रिपोर्ट 2019-20 नुसार, केरळमधील 75 टक्के पुरुषांचा असा विश्वास आहे की, जर स्त्रीचा मूड नसेल, ती थकली असेल, तिचा नवऱ्यावर विश्वास नसेल किंवा पतीला लैंगिक आजार असतील तर पत्नीला सेक्ससाठी नाही म्हणण्याचा अधिकार आहे. दुसरीकडे, या बाबतीत 72 टक्के महिलांना असे वाटते की पत्नीने सेक्स करण्यास नकार देणे योग्य आहे.
हे वाचा - ‘पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल’ आयोजित करणाऱ्या हॉटेलवर बजरंग दलाचा हल्ला, बॅनरला लावली आग
महिलांचे धक्कादायक मत
चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालण्याचं काम करण्यात महिलाही मागे नसल्याचे अहवालातून दिसून येते. 13.1 टक्के विवाहित महिला आजही पतीने पत्नीला सेक्स करण्यास नकार दिल्याने मारहाण करणे योग्य मानतात. दुसऱ्या बाजूला, फक्त 10.4 टक्के पुरुष याविषयी आपल्या पत्नीला मारहाण करणे न्याय्य मानतात. या विषयी फक्त 8.1 टक्के अविवाहित मुली अशा होत्या ज्यांनी लैंगिक संबंधास नकार दिल्याबद्दल आपल्या पत्नीला मारहाण करण्याचे समर्थन केले.
हे वाचा - Facebook वर जुळलं सूत, लग्नासाठी महाराष्ट्रातल्या मुलानं बदललं लिंग; पण…नंतर घडला भयावह प्रकार
पत्नी लैंगिक संबंधास नकार देत असेल तर तिला मारहाण करणे योग्य नाही असे पुरुषांचे म्हणणे असले तरी अनैतिक बाबींसाठी ते आघाडीवर असतात. कारण, सर्वेक्षणानुसार 31 टक्के पुरुषांनी सांगितले की, जर पत्नीने सेक्सला नकार दिला तर त्याला दुसऱ्या महिलेसोबत सेक्स करण्याचा अधिकार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.