मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /नियमित तूप खाण्याचे आहेत अनेक फायदे; हृतिक रोशनलादेखील आवडतं तूप

नियमित तूप खाण्याचे आहेत अनेक फायदे; हृतिक रोशनलादेखील आवडतं तूप

तुपाचे असे अनेक फायदे आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही तुमचं आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही चांगलं ठेवू शकता. यासाठी अभिनेता हृतिक रोशनचा आदर्श ठेवण्यास हरकत नाही.

तुपाचे असे अनेक फायदे आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही तुमचं आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही चांगलं ठेवू शकता. यासाठी अभिनेता हृतिक रोशनचा आदर्श ठेवण्यास हरकत नाही.

तुपाचे असे अनेक फायदे आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही तुमचं आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही चांगलं ठेवू शकता. यासाठी अभिनेता हृतिक रोशनचा आदर्श ठेवण्यास हरकत नाही.

  नवी दिल्ली, 1 डिसेंबर : आपण सुंदर आणि निरोगी दिसावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत असतो. काही जण विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात, तर काही जण आरोग्यदायी आहार (Healthy diet) घेण्याला प्राधान्य देतात. साजूक तूप ही अशीच एक गोष्ट आहे, जिचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. थंडीच्या दिवसामध्ये तर आवर्जून तूप (ghee) खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अनेक सेलेब्रिटीसुद्धा आपल्या आहारामध्ये तुपाचा समावेश करतात.

  ग्रीक देवतेच्या सौंदर्याशी तुलना होत असलेला अभिनेता हृतिक रोशनदेखील (Hrithik Roshan) नियमितपणे आपल्या आहारामध्ये तूप समाविष्ट करतो. तूप फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही, तर सौंदर्यासाठीदेखील उपयुक्त (ghee benifits) असतं. 'टाइम्स नाऊ'नं याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

  काही दिवसांपूर्वी एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत हृतिकनं आपल्या डाएटविषयी माहिती दिली होती. दिवसभरात तो काय खातो आणि त्याच्या फिटनेसचं रहस्य काय आहे, याबाबत त्यानं मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. आपण वेळोवेळी आपल्या आहारामध्ये बदल करत असल्याचं तो म्हणाला होता. तो दिवसाला सरासरी 5 किंवा 6 तास झोपतो आणि दर तीन तासांनी थोडं-थोडं जेवतो. हृतिकला तूप खाण्याविषयीही विचारण्यात आलं होतं. आपल्याला तूप प्रचंड आवडत असल्याचं त्यानं 'बॉलिवूड हंगामा'ला सांगितलं होतं.

  वाचा : तुमच्या एका नजरेतच कुणीही पडेल तुमच्या प्रेमात! तरुणीने दाखवला डोळ्यांचा जादुई इशारा

  तुपामुळे केस आणि त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. नियमितपणे तूप खाल्ल्यानं केस चमकदार (shiny Hair) आणि त्वचा नितळ (Smooth skin) होते. फक्त त्याचा कसा आणि कुठे वापर करायचा याची तुम्हाला माहिती पाहिजे.

  खालील पद्धतीने तुम्ही तुपाचा सौंदर्यप्रसाधन म्हणून वापर करू शकता.

  - तुमच्याकडे लिप बाम (lip balm) नसेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता. तुपातले स्निग्ध घटक फाटलेल्या ओठांवर उपायकारक ठरतात.

  - डोळ्यांखाली क्रीम आणि सिरम (serums) वापरण्याऐवजी तूप वापरा. त्यामुळे डार्क सर्कल्स (dark circles) नाहीशी होण्यास मदत होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांवर आणि डोळ्यांखाली हलक्या हातानं तूप लावा.

  - मॉइश्चरायझर (moisturiser) म्हणूनही तुपाचा वापर करता येतो. त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासासाठी बॉडी ऑइलप्रमाणे तुम्ही तूप वापरू शकता.

  वाचा : जन्माच्या किती दिवसानंतर मुलांना समजू लागतं आपलं बोलणं; हाव-भावने देतात प्रतिसाद

  - केस आणि टाळूसाठी डीप कंडिशनर मास्क (conditioner mask) म्हणूनदेखील तूप वापरता येतं. कारण तुपामुळे हायड्रेशन लवकर होतं. रात्री डोक्याला तूप लावा आणि शॉवर कॅप घालून झोपी जा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्यानं केस धुवून टाका.

  - ऑलिव्ह ऑइल आणि खोबरेल तेलामध्येही तूप घालून केसांसाठी खास तेल तयार करू शकता.

  तुपाचे असे अनेक फायदे आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही तुमचं आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही चांगलं ठेवू शकता. यासाठी अभिनेता हृतिक रोशनचा आदर्श ठेवण्यास हरकत नाही.

  First published:
  top videos

   Tags: Ghee, Health, Health Tips