जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात 2015 मध्ये जवळपास 70 दशलक्ष लोक मधुमेहाच्या आजाराशी लढताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दरवर्षी हा आकडा वाढतच चालला आहे. एवढंच नाही तर 2030 मध्ये फक्त भारतातच मधुमेहाच्या रुग्णांची संख्या 98 दशलक्षापर्यंत जाऊ शकते. बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार होतो. याशिवाय अनेकवेळा हा आजार अनुवांशिकतेमुळेही होतो. जेव्हा स्वादुपिंडात इन्सुलिनचा प्रवाह कमी होतो तेव्हा रक्तात ग्लूकोजचं प्रमाण वाढतं, याच स्थितीला मधुमेह असं म्हटलं जातं. या आजारात अन्नाचं उर्जेत रुपांतर करणं कठीण होऊन जातं. यामुळे डोळे, मूत्रपिंड, यकृत, हृदय असे शरीराचे महत्त्वपूर्ण भाग कमकूवत होत जातात. एकदा का मधुमेह झाला की तो कधीच पूर्ण बरा होत नाही. मात्र संतूलित आहार आणि लाइफस्टाइलमुळे त्या नियंत्रण मिळवता येऊ शकतं. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळचा नाश्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. बेसनाचं थालीपीठ हा एक उत्तम नाश्ता आहे. बेसन आणि भाज्यांपासून तयार केलेलं हे थालीपीठ आरोग्यासाठी पौष्टिक असतं. मल्टीग्रेन इडली- यात तेलाची फार गरज लागत नाही. मधुमेहाला फायदेशीर असे ज्वारी, बाजरी, ओट्स, मेथीचे दाणे आणि गव्हाचं पीठ एकत्र केलं जाऊ शकतं. हा नाश्ता अधिक पौष्टिक करण्यासाठी त्यात काही भाज्याही घातल्या जाऊ शकतात. मेथी पराठा- थंडीत मेथीची भाजी किंवा इतर ऋतूतील उपलब्ध मेथीपासून हे पराठे तयार करता येऊ शकतात. यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होतं. पनीर पराठा- अमेरिकन डायबेटिज एसोसिएशननुसार, मधुमेहासाठी पनीर हा एक चांगला पर्याय आहे. हे फॅट- फ्री असतं याशिवाय याचा उपयोग मल्टीग्रेन सॅण्डविच किंवा पराठ्यात करता येऊ शकतो. मोड आलेली कडधान्य- यात भरपूरप्रमाणात प्रोटीन आणि पोषकत्त्व असतात. मधुमेहासाठी फायदेशीर असे काकडी, कांदा, टॉमेटो आणि शिमला मिर्ची घालून वरून लिंबाचा रस घालू शकता. टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. बॉयफ्रेंडने खाऊ घातली पाणीपुरी, नंतर झाले असे काही की…. पाहा हा Viral Video या 5 गोष्टी आपल्या मुलांना योग्य वयात शिकवाच, नाहीतर… दिवाळीत फक्त 5 हजार रुपयांमध्ये फिरा या भन्नाट ठिकाणी Visa Free Destinations: या देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरू शकतात भारतीय! कमी पैशांत दिवाळीची खरेदी करायची असेल तर या 4 वेबसाइटवर नक्की जा!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







