ब्रिटन, 26 जुलै : तुम्हाला लक्षात असेल काही महिन्यांपूर्वी प्लॅस्टिक एग (Egg) म्हणजे प्लॅस्टिकची अंडी चांगलीच चर्चेत होती. आता मात्र महिलेच्या हाती अशी अंडी लागली आहेत, जे पाहून तुम्हाला धक्काच बसेल. सोशल मीडियावर महिलेने आपल्या हाती लागलेल्या विचित्र अंड्यांबाबत माहिती दिली आहे, जे वाचून नेटिझन्स शॉक झाले आहेत.
ब्रिटनच्या लिव्हरपूरमधील क्रिस्टीन हिलने (Christine Hill) 6 अंड्यांचा एक बॉक्स (Box of eggs) आणला. त्यातून तिला असं काही सरप्राइझ मिळेल याचा विचारही तिने केला नव्हता. तिने आपल्या सोशल मीडियावर हा अनुभव मांडला आहे.
6 double yolkers out of one box of 6 eggs @AldiUK - what is the clucking chance of that? @TimHarford #MoreorLess pic.twitter.com/mgUwShcCZy
— Christine Hill (@HomesChristineH) July 24, 2021
सामान्यपणे अंड्यात एक एग योक म्हणजे पिवळा बलक (Double Yolk Eggs) असतो. पण क्रिस्टीन जी अंडी आणली त्यात एक नाही तर दोन पिवळे बलक होते. तिला वाटलं कदाचित एखादं अंडं असं असावं, मग तिने दुसरं अंडं फोडलं तर त्यातही तसंच. त्यानंतर तिसरं, चौथं, पाचवं, सहावं असं करत एकामागोमाग एक अशी सहाही अंडी तिने फोडली. पण सहाही अंड्यात डबल योकच तिला सापडलं.
हे वाचा - गोलगप्पा खाने का स्ट्रगल तुम क्या जानो गे...! नाकात नथ, पाणीपुरीसाठी नवरीची धडपड
क्रिस्टिनने आपला हा विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर करताच त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येऊ लागल्या. अनेकांनी तिला तिच्यासाठी लकी डे असल्याचं सांगितलं. तिला 7 अब्ज लोकांपैकी फक्त एकासोबतच असं काहीतरी होत असल्याचं समजलं. ब्रिटिश एग इन्फॉर्मेशन सर्व्हिसने यावर प्रतिक्रिया देताना दिलेल्या माहितीनुसार, डबल योकर्स अंडी सामान्यपणे कमी वयाच्या कोंबड्या देतात कारण त्यांच्यात हॉर्मोन सिस्टम नैसर्गिकरित्या विकसित होत असते. पण अशी शक्यता 0.1 टक्क्यांपेक्षाही कमी असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.