मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कानाच्या रचनेवरुन समजू शकतं एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व! तुम्हीही प्रयत्न करा

कानाच्या रचनेवरुन समजू शकतं एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व! तुम्हीही प्रयत्न करा

Ears tells all Secret of Personality: प्रत्येकाचे व्यक्तिमत्व हे इतर लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही एखाद्याचे व्यक्तिमत्त्व फक्त त्यांच्या कानाकडे बघून शोधू शकता. कोणत्याही व्यक्तीच्या कानांचा आकार आणि रचना (Shape and Size of Ears) पाहून, त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि वागणुकीबद्दल कळू शकते की तो खरोखर कसा आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 11 मे : प्रत्येक माणसाचं स्वतःचं असं व्यक्तिमत्त्व (Personality) असतं. माणसाच्या व्यक्तिमत्त्वात गुण-दोष असतात. काही माणसांचं व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि सर्वसमावेशक असतं. काही माणसं आत्मकेंद्री (Self Centered) व्यक्तिमत्त्वाची असतात. चेहऱ्याची ठेवण, हावभाव, शरीरयष्टी आदी गोष्टींवरून माणसाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेता येऊ शकतं; पण तुम्ही माणसाच्या कानाच्या (Ear) आकारमानावरूनही त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेऊ शकता. त्याची वागणूक, स्वभाव याविषयीची माहिती कानाचं आकारमान आणि ठेवण यावरून समजू शकते. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

माणसाचा चेहरा, डोळा, कान आणि एकूणच शरीरयष्टीवरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेता येतो. अगदी केवळ कानाच्या आकारामानावरून समोरचा माणूस कसा आहे हे समजू शकतं. रुंद कान (Wide Ears) असलेली माणसं शांत स्वभावाची असतात. काही गोष्टींकडे ती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. ज्या गोष्टींकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज नाही, अशा गोष्टींवर ही माणसं फारसा जोर देत नाहीत. तथापि, अशा वागणुकीमुळे त्यांना कधी तरी कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं; पण यातूनही ती सहजपणे बाहेर पडतात.

गोलाकार कान (Round Ears) असलेली माणसं निष्ठावान आणि संवेदनशील असतात. अशा व्यक्ती खऱ्या मित्रासाठी प्रसंगी जीव धोक्यात घालू शकतात आणि आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून अशाच निष्ठेची अपेक्षादेखील करतात. याचा अर्थ असा की या माणसांना त्यांच्या आजूबाजूला निष्ठावान व्यक्ती हव्या असतात. तथापि, एखादा छोटासा विश्वासघातही त्यांना लोकांपासून दूर नेतो आणि त्यांना लोकांना क्षमा करणं कठीण होऊ शकतं.

Vegan Diet: या सेलेब्रिटीने महिन्याभरात घटवलं वजन; 90 दिवसांत निश्चित दिसतो फरक

ज्या माणसांचे कान खालील बाजूला झुकलेले असतात, अशी माणसं उदार आणि दुसऱ्याला मदतीचा हात देणारी असतात. अशी माणसं नेहमी इतरांच्या समस्या केवळ समजून घेत नाहीत, तर त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्नही करतात. अशी माणसं अंतर्मुख असतात. त्यामुळे ती अनेकदा सामाजिक समारंभांपासून दूर राहणं पसंत करतात. त्यांना मित्रही खूप कमी असतात.

चौकोनी आकाराच्या कानाची (Square Ears) माणसं खूप बुद्धिमान आणि रचनात्मक असतात. 'वुमन वर्किंग'च्या हवाल्यानं मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ज्यांचे कान चौकोनी असतात त्या व्यक्ती अत्यंत संवेदनशील असतात आणि सहानुभूतीचं दर्शन घडवणं त्यांना अचूक माहिती असतं. ही माणसं वेगवेगळ्या व्यक्तींकडून विविध गोष्टी शिकत असतात. ही माणसं मित्रांची निवड फार काळजीपूर्व करतात. या माणसांना त्यांच्या जीवनात अन्य व्यक्तींचा हस्तक्षेप आवडत नाही.

अरुंद कान (Narrow Ears) असलेली माणसं खोल स्वभावाची आणि आत्मपरीक्षण करणारी असतात. त्यामुळे बोलण्यापूर्वी ती प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. ही माणसं अंतर्मुख असतात. त्यामुळे त्यांना लहान गोष्टींमध्ये सहभागी व्हायला आवडत नाही. गंभीर विषयांबाबत त्या सजग असतात. अशी माणसं आयुष्य, प्रेम, करिअर आदी गोष्टींबद्दल तासनतास एकत्र बोलू शकतात.

Numerology : आजचा दिवस यशाचा; जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचं अंकशास्त्र

टोकदार कान (Angled ears) असलेली माणसं कोणत्याही गोष्टीचं सखोल विश्लेषण करतात. त्यांच्या संवेदना सखोल असल्याने त्या अशा माणसांना नेहमीच चांगला मित्र आणि माणूस बनण्यास मदत करतात. अशा माणसांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायची सवय असते. त्यामुळे कोणतंही नातं टिकवणं त्यांच्यासाठी खूप कठीण असतं. या माणसांना प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याची इतकी सवय असते, की बऱ्याचदा सर्वकाही नेहमीच परिपूर्ण नसतं ही गोष्टही ते विसरतात.

चेहऱ्याच्या खालच्या बाजूस कान चिटकलेली माणसं खूप अलिप्त आणि विचित्र असतात; पण तरीदेखील ती खूप सोशल असतात. अशा माणसांना जवळून ओळखणाऱ्या व्यक्तींना ती आपले मित्र बनवतात. तथापि, अशा माणसांचा विचित्रपणा त्यांना कधीकधी अडचणीत आणतो आणि ती एकटी पडतात.

First published:

Tags: Ear