Home /News /astrology /

Numerology : आजचा दिवस यशाचा; जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचं अंकशास्त्र

Numerology : आजचा दिवस यशाचा; जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचं अंकशास्त्र

Numerology 10 May 2022 : अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 10 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजच्या दिवसाची सगळी कामं पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाची भूमिका निभावेल. आरामदायी प्रवास घडेल आणि गंतव्यस्थानी योग्य वेळी पोहोचाल. आज सर्व सुखसोयी उपभोगाल. आज पैसे कमावणं, टार्गेट पूर्ण करणं सोपं ठरेल. कारण तुमचं ज्ञान आणि नेटवर्किंग या गोष्टी जादूसारख्या काम करतील. यश मिळवण्यासाठी सूर्यदेव आणि तुमच्या गुरूचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षकांमुळे यश मिळेल. तुमच्या खेळात आज खास नेत्याशी भेट होईल. लवचिक दृष्टिकोन आणि स्वयंपाक करण्याचं कौशल्य यांच्या साह्याने महिला हृदयं जिंकून घेतील. आत्मविश्वास वाढण्यासाठी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. शुभ रंग : पिवळा आणि नारंगी शुभ दिवस : रविवार, गुरुवार शुभ अंक : 3 दान : सूर्यफुलाचं तेल दान करावं. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि सर्व असाइनमेंट्स स्वीकारा. कारण यशाने तुमचा हात धरला आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्या संतुलनासाठी उत्तम दिवस. आज Manipulations उत्तम रीतीने काम करतील. तुमची मुलं आणि नातेवाईकांसमवेत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस आहे. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत लांब उडी घेण्याचा प्रयत्न करा. लिक्विड्स, शिक्षण, पुस्तकं, फायनान्स, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट, सौर ऊर्जा, कृषी, पेट्रोल, केमिकल्स आदींचे व्यवहार करत असलात, तर नफ्याच्या दृष्टीने खास घोषणा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : निळा आणि नारंगी शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : भिकारी, तसंच गायी-गुरांना पिण्याचं पाणी द्यावं. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं कौशल्य आणि ज्ञान यांचं सार्वजनिक प्रदर्शन करा. कारण सध्याचा काळ प्रसिद्धी मिळण्यासाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाने भरलेला आहे. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल; मात्र तुमच्या मेंटॉरचे आभार मानण्यास विसरू नका. आजचा दिवस तुमच्या पार्टनरला प्रभावित करण्यासाठी उत्तम आहे; मात्र ते केवळ मृदू आणि गोड शब्दांनी करावं. तुमच्या प्रिय व्यक्तीला लग्नाकरिता प्रपोझ करण्यासाठी आदर्श दिवस आहे. खेळाडू जुन्या प्रशिक्षकांच्या मदतीने विजयी होतील. राजकीय क्षेत्रात असलात किंवा सरकारी अधिकारी असलात, तर आज तुम्ही लोकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यापूर्वी किंवा इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी गुरूमंत्राचं पठण करावं. महिलांनी पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ करावेत आणि साऱ्या कुटुंबाला खाऊ घालावेत. त्यामुळे गुरू ग्रहाचं बळ वाढेल. शुभ रंग : नारंगी आणि लाल शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : मंदिरात चंदनाचं खोड दान करावं. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) गोंधळ दूर करण्यासाठी प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. आजचा दिवस उत्तम मॅनेजमेंटमधून पर्फेक्शन मिळवण्याचा आहे. संरक्षण क्षेत्रातल्या व्यक्ती, प्रॉपर्टी डीलर्स, हॉटेलियर्स, मॅन्युफॅक्चरर्स, टेलकॉम बिझनेसमधल्या व्यक्ती, आयटी कर्मचारी आदींना आज सहज लाभ मिळतील. आज गुंतवलेल्या पैशावर चांगला परतावा मिळण्यासाठी काही काळ थांबावं लागेल. बहुतांश वेळ प्लॅनिंगमध्ये व्यतीत केला पाहिजे. स्टॉकचे व्यवहार करत असलात, तर सावध राहा. वरिष्ठांचा सल्ला घ्या. शांत राहण्यासाठी संत्री खा आणि तुमच्या छंदात काही वेळ घालवा. शुभ रंग : ब्राऊन शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : गरिबांना हिरवं धान्य दान करावं. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) खासकरून उद्योजक आणि राजकीय नेत्यांच्या बाबतीत सारं काही आलबेल असून, आजही ते तसंच राहील. तुमचे सहकारी आणि ओळखीच्या व्यक्ती यांच्यापासून सावध राहा. तुमची गुपितं त्यांच्याशी शेअर करू नका. मित्र आणि नातेवाईकांच्या बाबतीत प्रॅक्टिकल विचार करा. ग्लॅमर, मीडिया, फॉरीन कमॉडिटीज, स्पोर्ट्स आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींचं स्पेशल अप्रैझल होईल. मीटिंग्जमध्ये Teal रंगाचे कपडे परिधान करणं फायद्याचं ठरेल. आज पार्टीज आणि नॉन-व्हेज खाणं टाळा. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय तुम्हाला अनुकूल ठरतील. खेळात विजय मिळेल. शुभ रंग : हिरवा शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : लहान मुलांना रोपं दान करावीत. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) क्रिएटिव्हिटीशी संबंधित उद्योगाला आज संधी मिळेल. आज तुम्हाला समृद्ध वाटेल. तसंच चांगला जोडीदार दिल्याबद्दल देवाविषयी कृतज्ञता वाटेल. आई-वडिलांना मुलांविषयी अभिमान वाटेल. कुटुंबीय, मित्रमंडळी, सहकारी यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे तुम्हाला भाग्यवान असल्यासारखं वाटेल. जोडीदारासोबत वेळ व्यतीत करण्यासारखा आणि ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देण्याचा दिवस. सरकारी टेंडर्समध्ये जोखीम घेण्याएवढं नशीब अनुकूल आहे. वाहनं, मोबाइल, घर आदी विकत घेण्यासाठी किंवा छोटी ट्रिप आयोजित करण्यासाठी चांगला दिवस. स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट अनुकूल ठरेल. रोमँटिक रिलेशनशिप बहरेल. अभिनय आणि राजकारण यांमध्ये करिअर करू इच्छित असलेल्यांनी ऑफर स्वीकारावी. भविष्यात चांगलं ठरेल. शुभ रंग : निळा आणि पीच शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : पांढरं नाणं दान करावं. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. बिझनेस डील्समध्ये शहाणपण वापरावं लागेल. वैद्यकीय तपासण्या सांगितल्यास संध्याकाळपर्यंत करून घ्याव्यात. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून आलेल्या सूचना स्वीकारण्यासाठी तुमचं मन खुलं करावं. वकिलाचा सल्ला घेणं पैशांच्या बचतीसाठी योग्य ठरेल. सॉफ्टवेअर, राजकीय क्षेत्र आदींशी निगडित बिझनेस डील्स उत्तमरीत्या यशस्वी होतील. लग्नासाठी उत्तमपणे जुळणारं स्थळ येणार आहे. भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन पूजाविधी करणं आणि आशीर्वाद घेणं समृद्धीसाठी आवश्यक आहे. शुभ रंग : पिवळा शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : गरिबांना किंवा मंदिरात धातूचं भांडं दान करावं. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कोणत्याही परिस्थितीत काम करण्यासाठी लवचिक राहा. कारण शेवटी तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. आज जिथे कुठे तुम्हाला सहज सुटका हवी आहे, तिथे तुमचं ज्ञान आणि पैशांच्या शक्तीचा वापर करा. कायदेविषयक प्रकरणं प्रभावी व्यक्ती किंवा पैशांच्या जोरावर सोडवली जातील. आज बिझनेस डील्स यशस्वी होण्यासाठी नेटवर्किंग सर्वांत महत्त्वाचं आहे. संवादाअभावी तुमचा जोडीदार तक्रार करील. स्पर्धेत उतरताना डार्क रंगाचे कपडे परिधान करणं विद्यार्थ्यांनी टाळावं. तुमचे सर्व निर्णय योग्य ठरतील. कारण तुमच्याकडे शहाणपण आहे. खेळाडू खूप कष्टांमुळे सर्वोच्च कामगिरी करतील. प्रवासाचे बेत पुढे ढकलले जातील. आज दानधर्म करणं अत्यावश्यक आहे. शुभ रंग : हिरवा शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : गरजूंना चपला दान कराव्यात. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कोणत्याही क्षेत्रातला कलाकार मोठा निर्णय घेईल. कपल्सना भविष्यासाठी नियोजन करण्याकरिता सुंदर दिवस आहे. सरकारी टेंडर्स आणि डील्स अगदी सहजपणे मिळतील. ग्लॅमर, एअरलाइन्स, सॉफ्टवेअर, ऑकल्ट सायन्स, संगीत, मीडिया, शिक्षण आदी क्षेत्रांतल्या व्यक्तींना लोकप्रियता लाभेल. भविष्यातल्या राजकीय नेत्यांना आज नवी पदं मिळतील. त्यांनी आजचा दिवस पब्लिक स्पीच, इंटरव्ह्यू, स्पर्धा परीक्षा आदींसाठी वापरावा. संगीतकारांच्या आई-वडिलांना आज त्यांच्या मुलांचा अभिमान वाटेल. डॉक्टर्स, सर्जन्सना बक्षिसं मिळतील. ट्रॅव्हल प्लॅन्समध्ये अचीव्हमेंट्स मिळतील. शुभ रंग : लाल शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कोणत्याही स्वरूपात लाल मसूर दान करावेत. 10 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : व्ही. के. सिंग, श्रीमुखी, हृषिता भट्ट, नयनतारा सहगल
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या