मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फोटो काढणाऱ्या बापलेकीला पाहून पिसाळला हत्ती; मागून आला आणि... धक्कादायक VIDEO VIRAL

फोटो काढणाऱ्या बापलेकीला पाहून पिसाळला हत्ती; मागून आला आणि... धक्कादायक VIDEO VIRAL

हत्तीसोबत फोटो काढताना तो आपल्या लेकीला घेऊन पोझ देत होता. नंतर पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा ठोकाच चुकेल.

हत्तीसोबत फोटो काढताना तो आपल्या लेकीला घेऊन पोझ देत होता. नंतर पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा ठोकाच चुकेल.

हत्तीसोबत फोटो काढताना तो आपल्या लेकीला घेऊन पोझ देत होता. नंतर पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा ठोकाच चुकेल.

मुंबई, 24 मार्च : नॅशनल पार्क (National park) किंवा प्राणीसंग्रहायलात (Zoo) गेल्यानंतर मोठमोठ्या प्राण्यांसोबत फोटो काढण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. काही लोक तर अशा प्राण्यांच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करतात आणि असाच प्रयत्न त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. हत्तीसोबत फोटो (Photo with elephant) काढायला गेलेल्या बापलेकीच्या मागे पिसाळलेला हत्ती (elephant) धावून आला. हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

ही घटना अमेरिकेच्या सॅन डिएगो झूमधील आहे. एक व्यक्ती आपल्या छोट्या मुलीला घेऊन हत्तीजवळ फोटो काढायला गेला. मुलीला घेऊन हत्तीसोबत फोटो काढताना तो पोझ देत होता. नंतर पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा ठोकाच चुकेल.

व्हिडीओत पाहू शकता. व्यक्ती हत्तींना ज्या भागात ठेवण्यात आलं आहे, त्या भागात जातो. एकटाच नाही तर सोबत आपल्या छोट्या मुलालाही नेतो. तिला घेऊन फोटो काढत असतो. इतक्यात त्यांच्या मागून एक हत्ती धावत येतो. आपल्या परिसरात कुणीतरी दुसरंच घुसल्याने हत्ती अगदी संतप्त झालेला दिसतो. त्याचवेळी व्यक्ती मुलीला घेऊन पळ काढतो. पळता पळता त्याच्या हातातून मुलगी सटकते आणि जमिनीवर पडते. सुदैवाने हत्ती ठरलेल्या जागेच्या पुढे जात नाही. व्यक्ती जमिनीवर पडलेल्या आपल्या मुलीला पुन्हा उचलतो आणि तिथून पळ काढतो.

हे वाचा - माकडाशी पंगा घेणं वाघाला महागात; शिकारीसाठी झाडावर चढताच काय झालं पाहा VIDEO

त्यामुळे तुम्हीदेखील असा काही प्रयत्न करत असाल तर काळजी घ्या. प्राण्यांसोबत असे फोटो काढणे, त्यांच्या अगदी जवळ जाणं धोक्याचं आहे. तुमच्या जीवावरही ते बेतू शकतं.

First published:
top videos

    Tags: Other animal, Social media viral, Video viral, Viral, Wild animal