मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लय भारी! टिकटॉक....टिकटॉक... मॉडेल्सनाही मागे टाकेल असा कावळ्याचा कॅटवॉक

लय भारी! टिकटॉक....टिकटॉक... मॉडेल्सनाही मागे टाकेल असा कावळ्याचा कॅटवॉक

कावळ्याला कधी कॅटवॉक (Crow catwalk video) करताना पाहिलं आहे का?

कावळ्याला कधी कॅटवॉक (Crow catwalk video) करताना पाहिलं आहे का?

कावळ्याला कधी कॅटवॉक (Crow catwalk video) करताना पाहिलं आहे का?

मुंबई, 24 मार्च : कॅटवॉक (Catwalk) म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो फॅशन शो. मॉ़डेल्स एका विशिष्ट पद्धतीने चालतात. कॅटवॉक या शब्दात कॅट आहे. काही ठिकाणी तर मांजरांचेही असे रॅम्प आयोजित करण्यात आले जिथं मांजर कॅटवॉक करताना दिसल्या. पण कधी एखाद्या पक्ष्याला कॅटवॉक करताना पाहिलं आहे. पक्षी म्हटलं की ते उडतातच. उडत नसतील तर एका जागेवर बसतात आणि काही मोजक्याच अंतरापर्यंत चालतात. पण त्यांना कधी तालात चालताना पाहिलं आहे का? नाही ना. सध्या अशाच एका कावळ्याचा व्हिडीओ (Crow video) व्हायरल होतो आहे, जो अगदी तालात चालतो आहे किंबहुना तो कॅटवॉकच करतो आहे.

कॅटवॉक करणाऱ्या कावळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कावळा अगदी छान पद्धतीने कॅटवॉक करताना दिसतो आहे.

व्हिडीओत पाहू शकता एका छोट्या भिंतीवर कावळा चालतो आहे. तिथली जागा मर्यादित आहे. त्यामुळे अशी पावलं टाकतो जेणेकरून तो खाली पडणार नाही. अगदी लयबद्ध पद्धतीने तो आपलं एकेएक पाऊल पुढे टाकतो. त्यावेळी त्याची मागची शेपटीही खूप सुंदर हलते. पुढे येऊन तो थांबतो. जणू काही तो कॅटवॉकच करतच चालत येतो असं वाटतं.

हे वाचा - आईच्या सुरात बाळाचे सूर; मराठी गायिकेचा लेकासह गोड जुगलबंदीचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. बऱ्याच लोकांच्या त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. अशा अॅटिट्युडसह मी लिमिटेड एडिशन आहे, असं मजेशीर कॅप्शन सुशांत नंदा यांनी दिलं आहे.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral videos