मासिक पाळीबाबत मोठा निर्णय; जगातील एकमेव देशानं रचला इतिहास

मासिक पाळी (mentrual period) ज्याबाबत आजही कित्येक देशांमध्ये मोकळेपणानं बोललंही जात नाही. असं असताना एका देशानं मात्र याबाबत ऐतिहसिक निर्णय घेतला आहे.

मासिक पाळी (mentrual period) ज्याबाबत आजही कित्येक देशांमध्ये मोकळेपणानं बोललंही जात नाही. असं असताना एका देशानं मात्र याबाबत ऐतिहसिक निर्णय घेतला आहे.

  • Share this:
    एडिनबर्ग, 25 नोव्हेंबर : मासिक पाळी (mentrual period) ज्याबाबत आजही कित्येक देशांमध्ये मोकळेपणानं बोललंही जात नाही. असं असताना एका देशानं मात्र याबाबत  ऐतिहसिक निर्णय घेतला आहे. या देशात महिलांना मासिक पाळीच्या काळात आवश्यक असलेली उत्पादनं मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा देश म्हणजे स्कॉलंड (SCOTLAND). ज्यानं इतिहास रचला आहे. स्कॉटलंडच्या संसदेत मंगळवारी महिलांना मासिक पाळीच्या काळात आवश्यक असणारं साहित्य मोफत पुरवण्याची तरतूद असलेल्या ऐतिहासिक विधेयकावर शिक्कामोर्तब झालं आणि असा निर्णय घेणारा हा जगातील पहिला देश ठरला. पीरियड प्रोडक्ट्स बिल (PERIOD PRODUCTS BILL) नावाच्या या विधेयकावर स्कॉटिश संसदेत एकमत झालं आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना सॅनिटरी प्रॉडक्ट्स मोफत उपलब्ध होण्याचा कायदेशीर हक्क प्राप्त झाला. हे विधेयक मांडणाऱ्या संसद सदस्य मोनिका लेनॉन यांनी सांगितलं, मासिक पाळीच्या बाबतीत असा निर्णय घेणारा स्कॉटलंड हा शेवटचा देश असणार नाही, मात्र हा पहिला देश बनण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. स्कॉटलंडमध्ये विद्यार्थिनींना सॅनिटरी प्रोडक्ट्स मोफत उपलब्ध आहेत. मात्र आता या कायद्यामुळे प्रत्येक महिलेला ती उपलब्ध होतील अशी योजना राबवण्याची जबाबदारी मंत्र्यांवर आली आहे" हे वाचा - महायुद्ध, प्लेन क्रॅश, कॅन्सर आणि आता कोविड... सगळ्याला पुरून उरल्या या चिवट आजी "शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये त्यांच्या स्वच्छतागृहांमध्ये सर्व आवश्यक सॅनिटरी प्रोडक्ट्स मोफत उपलब्ध करणं अनिवार्य आहे. लेनॉन म्हणाल्या, हा कायदा जगाला नवी दिशा देणारा असला, तरी शाळांनी विद्यार्थ्यांनींना मासिक पाळीच्या दडपणातून मुक्तता देणारं शिक्षण दिलं पाहिजे", असं त्या म्हणाल्या. स्कॉटलंडचे स्थानिक प्रशासन आणि समाज विभागाचे सचिव अॅलन कॅम्पबेल म्हणाले, "या कायद्यामुळे आम्हाला आमचा देश कसा घडवायचा आहे, याचा संदेश दिला जात आहे" "स्कॉटलंड हा लिंग समानता असणारा देश आहे. इथं कोणालाही मासिक पाळीच्या काळात अयोग्य उत्पादनं वापरून जोखीम घ्यावी लागणार नाही किंवा महागडी उत्पादनं घेण्यासाठी अधिक खर्च करावा लागेल किंवा शिक्षण सोडावं लागेल अशी परिस्थिती येणार नाही", असं त्यांनी सांगितलं. हे वाचा - Period मध्ये शरीर जड झाल्यासारखं वाटतं; खरंच वजन वाढतं का? स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टुर्गोन यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या आगळ्यावेगळ्या कायद्याच्या बाजूनं मतदान केल्याचा अभिमान आहे. यामुळे ज्यांना गरज आहे त्यांना मासिक पाळीच्या काळात आवश्यक असणारं साहित्य मोफत देणारा हा जगातला पहिला देश ठरला आहे. महिला आणि मुलींसाठी हे महत्त्वाचं धोरण आहे, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published: