Period मध्ये शरीर जड झाल्यासारखं वाटतं; खरंच वजन वाढतं का?
मासिक पाळीत (menstrual period) शरीर जड झाल्यामुळे आपलं वजन (weight) तर वाढलं नाही ना अशीच चिंता तुम्हालापण आहे का? तर असं का होतं जाणून घ्या.
|
1/ 6
मासिक पाळीत शरीर जड झाल्यासारखं वाटतं. पोट फुगल्यासारखं आणि ब्रेस्टही वाढल्यासारखे वाटतात. यामुळे आपलं वजन तर वाढलं नाही ना, असाच प्रश्न कित्येक महिला आणि तरुणींच्या मनात निर्माण होतो.
2/ 6
मासिक पाळीच्या आधी, मासिक पाळीच्या कालावधीत शरीराचं वजन वाढल्यासारखं वाटतं. मात्र मासिक पाळीचा कालावधी सुटल्यावर ही समस्या आपोआप दूर झाल्याचंही दिसतं.
3/ 6
फक्त मासिक पाळीत शरीर जड होणं म्हणजे खरंच वजन वाढतं का, का आणि असं असा प्रश्न तुम्हालाही प्रत्येक महिन्याला पडत असेल.
4/ 6
वुमेन हेल्थमध्ये दिलेल्या माहितीनुसार मासिक पाळीत वाढणारं वजन हे प्रत्यक्ष वाढलेलं फॅट नसतं. तर बहुतेक वेळा हे शरारीतील पाण्याचं वाढलेलं प्रमाण असतं.
5/ 6
मासिक पाळीदरम्यान सेक्स हार्मोन एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉनची पातळी बदलते. जेव्हा या हार्मोन्सची पातळी वाढते तेव्हा त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम शरीरातील पाणी टिकून राहण्याची क्षमता वाढते. त्यामुळे काही प्रमाणात वजन वाढतं.
6/ 6
मासिक पाळीत काहीतरी सॉल्टी किंवा स्वीट खाण्याचं मन करतं. असे पदार्थ खाल्ल्यानं वजनावर परिणाम होतो, शिवाय वारंवार तहान लागते आणि जास्त पाणी पिणं होतं, त्यामुळे अप्रत्यक्षरित्याही वजन वाढतं.