लंडन, 04 ऑक्टोबर : आधी मासिक पाळी (Menstrual period) हा विषय महिलांपुरताच मर्यादित ठेवला जायचा. पण आता आपली बायको, बहीण, मुलगी, मैत्रीण यांना त्या दिवसांमध्ये होणारा भयंकर त्रास (Menstrual period problem) अगदी जवळून पाहणारे पुरुषही आता महिलांचा हा त्रास कसा कमी करता येईल यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. असाच पॅडमॅन तर आपणा सर्वांना माहितीच आहेत. बायकोला त्रास झाल्यानंतर महिलांच्या याच समस्येसाठी पुढाकार घेणारा पॅडमॅन तर आपल्याला माहितीच आहे. आता मुलीचा त्रास पाहून तिच्यासाठी लढणारा एक बाप आता चर्चेत आहे (Father fight for daughter's school period leave).
मासिक पाळी म्हटलं की फक्त तो विषय महिलांपुरतीच मर्यादित ठेवला जातो. एखाद्या मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यानंतर तिची आई, आजी, ताई किंवा घरातील महिलाच त्याची माहिती देतात. मुलीलाही काही त्रास झाला तरी ती याच महिलांना सांगते. त्यामुळे सामान्यपणे एखादी मुलगी आपल्या वडीलांसोबत एरवी किती मोकळेपणाने वागत असली तरी मासिक पाळीबाबत मात्र मी त्यांच्याशी कसं बोलू, असाच विचार आजही कितीतरी मुली करतात. आता हळूहळू हा विषय मोकळेपणाने मांडला जाऊ लागला आहे. सोशल मीडियावर याबाबत चर्चा होऊ लागली आहे. काही पुरुषही महिलांना त्यांच्या त्या दिवसात सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात.
हे वाचा - इथं तरुण, अविवाहितांसाठी मोफत घर; पण पूर्ण कराव्या लागतील 'या' अटी
ब्रिटनमधील मार्कस एलेने ज्याला तीन मुलं आहेत. त्याची सर्वात मोठी मुलगी इजी माध्यमिक शाळेत आहे. इजी 13 वर्षांची आहे. ती वयात आली होती. तिला मासिक पाळी येऊ लागली आणि त्यामुळे तिला प्रचंड वेदना होत होत्या. आपल्या मुलीचा त्रास एका बापाला पाहवला नाही. त्याने आपली मुलगी आजारी आहे, तिला पीरियड्स आले आहेत आणि तीव्र वेदना होत आहेत, असं कारण देत त्यांनी शाळेकडे सुट्टी मागितली. पण शाळा प्रशासनाने मात्र सुट्टीसाठी हे वैध कारण नसल्याचं सांगत सुट्टी न देता, तिची अनुपस्थिती लावली. तेव्हा या वडिलांचा पारा चढला.
हे वाचा - 'झोपूही देत नाही, काय करू?', नवऱ्याच्या 'त्या' सवयीला वैतागलेल्या बायकोची व्यथा
प्लायमाऊथ लाइव्हशी बोलताना मार्कर्सने सांगितलं, जर मी माझ्या मुलीला मायग्रेन आहे, असं सांगितलं असतं तर मी कदाचित काहीच बोललो नसतो. पण याबाबतीत मात्र मी काय करू शकतो? विद्यार्थी कल्याण अधिकाऱ्यांशी बैठकीसाठी शाळेशी संपर्क केला. पण आतापर्यंत काही उत्तर आलं नाही. मी माझी बायको आणि मुलींशी बोललो. त्यानंतर पीरियड्सला शाळेतील अनुपस्थितीचं एक वैध कारण बनवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी change.org वर त्याने याचिका दाखल केली आहे. मी एक धाडसी, मजबूत मुलींचा वडील आहे. अनेक महिला माझ्याशी सहमत होतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.