मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Planetary Parade: 1,075 वर्षांनी अंतराळात घडणार दुर्मिळ योगायोग, भारतातही पाहता येणार

Planetary Parade: 1,075 वर्षांनी अंतराळात घडणार दुर्मिळ योगायोग, भारतातही पाहता येणार

या म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू हे ग्रह एका रांगेत पाहायला मिळतील. यापूर्वी हे दृश्य इसवी सन 947 मध्ये दिसलं होतं.

या म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू हे ग्रह एका रांगेत पाहायला मिळतील. यापूर्वी हे दृश्य इसवी सन 947 मध्ये दिसलं होतं.

या म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू हे ग्रह एका रांगेत पाहायला मिळतील. यापूर्वी हे दृश्य इसवी सन 947 मध्ये दिसलं होतं.

नवी दिल्ली 27 एप्रिल : अंतराळात (Universe) अनेक खगोलशास्त्रीय घटना घडत असतात. सर्वसामान्य माणसाला त्या माहीत नसतात आणि पाहताही येत नाहीत. परंतु, खगोलशास्त्रज्ञ (Astronomer) त्यावर नजर ठेवून असतात. असाच एक दुर्मिळ योगायोग अवकाशात घडणार आहे. ‘या आठवड्यात एक अत्यंत दुर्मिळ योगायोग अंतराळात घडणार असून तो उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. या म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू हे ग्रह एका रांगेत पाहायला मिळतील. यापूर्वी हे दृश्य इसवी सन 947 मध्ये दिसलं होतं. हा दुर्मिळ योगायोग सूर्योदयाच्या एक तास आधी पूर्वेकडील आकाशात पाहता येईल. याला ‘प्लॅनेट परेड’ही म्हटलं जातं,’ अशी माहिती भुवनेश्वरमधील पठाणी सामंती तारांगणचे सहसंचालक डॉ. एस. पटनाईक (Dr S Pattnaik) यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, “या आठवड्यात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू (Saturn, Mars, Venus, Jupiter) सलग एका रांगेत असतील. यापूर्वी हा दुर्मिळ संयोग इसवी सन 947 मध्ये घडला होता. या दिवशी हे सर्व ग्रह लोकांना उघड्या डोळ्यांनी पाहता येतील. पूर्वेकडील आकाशात सूर्योदयाच्या एक तास आधी हा दुर्मिळ योग सर्वांना दिसेल.” या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय.

Happy Journey : उन्हाळ्यात प्रवास करताना या गोष्टींची काळजी घ्या; हेल्थ खराब नाही होणार

भारतात हा दुर्मिळ संयोग दिसणार का?

उत्तर गोलार्धातील देश म्हणजेच इक्वेटर लाइनच्या वरच्या भागातील देशांना हे सुंदर दृश्य पाहता येणार आहे. भारतातही हा दुर्मिळ संयोग दिसणार असून लोकांना तो सहज पाहायला मिळेल. मात्र, त्यावेळी आकाश प्रदूषणमुक्त असणं गरजेचं आहे. जर आकाशात प्रदूषण नसेल आणि स्वच्छ असेल तर हे दृश्य पाहता येईल. तुम्हाला या दुर्मिळ क्षणाचं साक्षीदार व्हायचं असेल तर सूर्योदयापूर्वी आकाशात (Sky) पूर्वेकडे पहावं लागेल.

पृथ्वी आणि मंगळ यांसारखे ग्रह कसे तयार झाले? नवीन संशोधनात आधीच्या संकल्पनेला छेद

दुर्मिळ योगायोग होताना सर्व ग्रह जवळ येणार का?

अशा प्रकारे ग्रह एका रांगेत येण्याचा अर्थ असा नाही की हे सर्व ग्रह एकमेकांच्या खूप जवळ येणार आहेत. ते अजूनही अंतराळात एकमेकांपासून अब्जावधी किलोमीटर दूर राहतील. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना आपल्या कक्षेत सतत फिरत असते आणि त्यामुळे इतर ग्रहांची स्थिती दर महिन्याला बदलत असते, त्यामुळे ही खगोलशास्त्रीय परिस्थिती उद्भवत आहे, असं जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीनं म्हटलंय.

याच आठवड्यात ही दुर्मिळ घटना घडणार असून सर्वांना पाहता देखील येणार आहे. त्यामुळे ज्यांना अवकाश, अवकाशात घडणाऱ्या दुर्मिळ घटना आणि खगोलशास्त्राची आवड असेल, त्यांनी हा दुर्मिळ क्षण नक्की पाहायला हवा. फक्त त्यावेळी तुमच्या भागात वातावरण स्वच्छ आणि प्रदुषणमुक्त असावं, एवढीच अट आहे.

First published:

Tags: Earth