मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /एक चिमूट केशर, पुरुषांसाठी ठरू शकतं खूप उपयुक्त; कसं घ्यायचं, कधी खायचं?

एक चिमूट केशर, पुरुषांसाठी ठरू शकतं खूप उपयुक्त; कसं घ्यायचं, कधी खायचं?

केशर नुसतं चाखलं तर त्याची चव किंचित कडू आणि उग्र असते. पण याचा सुगंध वादातीत असतो. बहुगुणी केशराची ही उपयुक्तता जाणून घ्या...

केशर नुसतं चाखलं तर त्याची चव किंचित कडू आणि उग्र असते. पण याचा सुगंध वादातीत असतो. बहुगुणी केशराची ही उपयुक्तता जाणून घ्या...

केशर नुसतं चाखलं तर त्याची चव किंचित कडू आणि उग्र असते. पण याचा सुगंध वादातीत असतो. बहुगुणी केशराची ही उपयुक्तता जाणून घ्या...

  नवी दिल्ली, 24 जून: जगातील सर्वांत महाग मसाल्याचा पदार्थ म्हणून केशर (health benefits of Saffron ) प्रसिद्ध आहे. कुंकुम (Kumkum), जाफरान (Zaafraan) आणि सफ्रॉन (Saffron) अशा विविध नावांनी ते ओळखले जाते. लाल रंगाच्या काड्या स्वरूपात असलेलं केशर पाण्यात घातल्यावर त्याचा रंग पिवळा होतो. याची चव किंचित कडू आणि उग्र असते. याला एक प्रकारचा सुगंध असतो. केशर हे वात, कफ आणि पित्तनाशक मानलं जातं. केशराच्या फुलांमधून केशर मिळवले जाते.

  जगभरात काश्मिरी केशर (Kashmiri kesar) सर्वात उत्तम मानलं जातं. याशिवाय इराण, बुखारा, स्पेन इत्यादी ठिकाणीही दर्जेदार केशराचे उत्पादन होते. केशर हे आरोग्याच्या दृष्टीनंही लाभदायक असते. केशराचे औषधी गुणधर्म अनेक आजार दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. सौंदर्य वृद्धीसाठीही स्त्रिया केशराचा वापर करतात. पुरुषांसाठीही केशर आरोग्यदायी आहे.

  पुरुषांची शारीरिक दुर्बलता दूर करते :

  पुरुषांनी (Man) केशराचे नियमित सेवन केल्यास त्यांची शारीरिक दुर्बलता दूर होण्यास मदत होते. केशर पुरुषांमधील मेल हार्मोनचं प्रमाण चांगलं ठेवते. पुरुषांमधील इरेक्टाईल डिस्फंक्शनचा धोकाही दूर होतो. केशरात व्हिटॅमिन सी आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळं शुक्राणूंची गुणवत्ता वाढते. त्

  तुमच्या कामाची बातमी! मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच

  यामुळं पुरुषांनी शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी केशराचे सेवन करणं आवश्यक आहे.

  महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेदना कमी करते :

  अनेक महिलांना मासिक पाळीपूर्वी (Periods) आणि मासिक पाळीच्या काळात ओटीपोटात वेदना होतात. कंबर दुखी, अंग दुखीचा त्रास होतो. पेटके येतात. यावर केशर गुणकारी ठरते. चिमूटभर केशर दुधात घालून नियमितपणे घेतल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. महिलांमधील सेक्शुअल इंटीमसी वाढवण्यासाठीही केशराचा उपयोग होतो.

  सर्दी-खोकल्यावरही उपयुक्त :

  सर्दी-खोकला झाल्यास केशराचा वापर करणं खूप फायदेशीर ठरू शकतं. केशर उष्ण असतं आणि यातील अँटीऑक्सिडंट्स सर्दी-खोकला बरा होण्यास मदत करतात.

  चेहऱ्याचा रंग उजळतो :

  केशरामध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतात. चेहऱ्याच्या त्वचेसाठी ते खूप फायदेशीर असतात. त्यातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी -इंफ्लेमेटरी गुणधर्म चेहऱ्यावर मुरुम येण्यापासून वाचवतात. चेहऱ्यावरील डागही कमी होतात.

  बायकोच्या ओठाऐवजी भलतीकडेच KISS; कपलचा एक्सरसाइझ VIDEO पाहून हसू आवरणार नाही

  याकरता केशर पाण्यात भिजवून त्यात दोन चमचे हळद घाला आणि त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

  स्मरणशक्ती वाढवते :

  केशराचे नियमित सेवन केल्यानं स्मरणशक्ती (Memory) वाढते. केशर वृद्ध व्यक्तीच्या मेंदूत अ‍ॅमायलोइड बीटा हा घटक तयार होण्यास प्रतिबंध करून अल्झायमर आणि विस्मरण होण्यापासून वाचवते. मुलांचा मेंदू अधिक कार्यक्षम ठेवण्यासाठीही केशर घातलेलं दूध उपयुक्त ठरते.

  दम्यावरही लाभदायी :

  केशरातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म फुफ्फुसावरील सूज, जळजळ कमी करण्यात मदत करतात. त्यामुळं दम्याचा (Asthma) झटका येण्याची शक्यताही कमी होते.

  First published:

  Tags: Food, Home remedies