मुंबई, 29 डिसेंबर : दारू पिण्याबाबत समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. दारू कशापासून बनवलेली असते इथपासून ते दारू पिणं चांगलं की वाईट इथपर्यंत अनेक गोष्टींबाबत मतमतांतरं आहेत. हिवाळ्यामध्ये दारू पिणं चांगलं, विशेषतः हिवाळ्यात रम प्यावी, मात्र उन्हाळ्यात पिऊ नये असा एक समज आहे. हिवाळ्यात रम प्यायल्यानं शरीरात उष्णता निर्माण होते, असं मद्यप्रेमींना वाटतं.
थंडीच्या ऋतुत शरीराला उष्णता देणारा आहार घेतला जातो. त्याचबरोबर थंडीच्या दिवसात रम प्यायल्यानं उष्णता मिळते, असंही काही जणांना वाटतं. थंडीमध्ये उष्णता देणारी रम उन्हाळ्यात मात्र शरीरासाठी त्रासदायक ठरते असंही काहींचं मत आहे. तज्ज्ञांच्या मते, रम ही थंडीत उष्णता देणारी असली, तरी उन्हाळ्यात त्यानं कोणताही त्रास होत नाही.
हेही वाचा : खरंच कुणी आठवण काढल्यामुळे उचकी लागते का? जाणून घ्या कारण आणि उपाय
भारतात व्हाईट रम आणि डार्क रम अशा दोन प्रकारची रम मिळते. ऊसाच्या मळीपासून किंवा काकवीपासून ही रम तयार केली जाते. ऊसापासून साखर तयार करताना गडद रंगाची जी मळी बाहेर पडते, त्यावर आंबवण्याची प्रक्रिया करून रम तयार होते. ऊसाच्या मळीमध्ये खूप कॅलरीज असतात. डार्क रम तयार करताना त्यात आणखी वेगळी मळी मिसळून रम तयार केली जाते. त्यामुळे त्या रमला गडद रंग व विशिष्ट स्वाद येतो. या डार्क रममध्ये अधिक कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यात ही रम प्यायल्यावर शरीराला ऊब मिळते.
रम उन्हाळ्यात प्यावी की नाही, याबाबतही वाईन व्यवसायातल्या तज्ज्ञांनी मत नोंदवलं आहे. थंडीमध्ये उष्णता देणारी रम उन्हाळ्यात प्यायल्यानं शरीराचं काहीही नुकसान होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कॅरेबियन बेटांमधील वेस्ट इंडिजमध्ये रम पहिल्यांदा तयार करण्यात आली. हा देश उष्ण कटिबंधातला आहे. त्याशिवाय क्यूबा, जमैका, भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये वर्षभर रम प्यायली जाते. याचाच अर्थ उन्हाळा आणि रम यांचा तसा काहीही संबंध नाही.
हेही वाचा : Eggs Side Effects : हिवाळ्यात रोज 4-5 खाता? मग एकदा हे दुष्परिणाम नक्की वाचा
काहींना मात्र रम उष्ण असल्यानं ती उन्हाळ्यात पिऊ नये असं वाटतं. डार्क रम बनवताना त्यात जास्तीची मळी घातली जाते, त्याप्रमाणे व्हाईट रम बनवताना जास्तीची मळी घालत नाहीत. त्यामुळे त्या रमला पाण्यासारखा पारदर्शक रंग असतो. ही रम जगभरात खूप लोकप्रिय आहे. अनेक प्रसिद्ध कॉकटेल्स तयार करण्यासाठी तिचा वापर केला जातो. त्याव्यतिरिक्त काही पदार्थ तयार करण्यासाठीही व्हाईट रम वापरतात. थंडीमध्ये उष्णता मिळत असल्यामुळेच रम आणि हिवाळा असं समीकरण बनलं आहे. तज्ज्ञही त्याला दुजोरा देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.