मुंबई, 14जुलै : जागतिक स्तरावर सर्वाधिक रुग्ण नोंदवले गेलेल्या काही आजारांत हृदय रोगाचा समावेश आहे. आरोग्य तज्ज्ञांनुसार सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका या समस्या झपाट्याने वाढत आहेत. विशेषत: ऑफिसमध्ये दिवसातील 7 ते 8 तास डेस्क जॉब करणाऱ्या लोकांमध्ये ह्रदयरोगाचा धोका अधिक दिसून येत आहे. संशोधकांनी केलेल्या अभ्यासात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांमध्ये स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्याचा धोका इतर लोकांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त असतो. हा धोका लक्षात घेऊन वेळेत त्यावर योग्य ते उपाय करणे गरजेचे आहे. यापासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञांनी कोणते उपाय सुचवले आहेत ते जाणून घेऊया? अभ्यासात काय आढळले? चायनीज अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि पेकिंग युनियन मेडिकल कॉलेजने ऑफिसमध्ये डेस्क जॉब्सवर काम करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढण्याच्या कारणांवर अभ्यास केला. जे लोक दिवसातील आठ ते नऊ तास डेस्कवर बसून काम करतात त्यांच्यात हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकची शक्यता 20% जास्त असते असे या अभ्यासातून आढळून आले. हा अभ्यास 11 वर्षे करण्यात आला. या काळात संशोधकांनी 21 देशांतील 105,677 लोकांच्या नोंदी ठेवल्या. अभ्यासाच्या शेवटी 6,200 हून अधिक लोक मरण पावले होते. त्यापैकी 2,300 लोकांना हृदयविकाराचा झटका, 3,000 लोकांना स्ट्रोक आणि 700 लोकांना हार्ट फेल्यूअरचा त्रास झाला होता.
Pani Puri Causes Typhoid : सावधान! कोरोनाच्या संकटात पसरतोय ‘पाणीपुरी आजार’; आरोग्य विभागाने केलं Alertतज्ज्ञांनी काय उपाय सुचवले? अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या तज्ञांच्या मते झोपेची गुणवत्ता आणि कालावधी यांच्यात सुधारणा करणे आणि दररोज योगा आणि व्यायाम करण्याची सवय लावल्यास हृदयविकाराची प्रकरणे 80 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. जे लोक आपला दिवसाचा बराचसा वेळ बसून घालवतात त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही सलग डेस्कवर बसून काम करत असाल तर थोड्या-थोड्या वेळाने जागेवरून उठून चालत राहा. 2 मिनिटांत प्यायला संपूर्ण बाटलीभर Digestive Medicine; फक्त 100 रुपयांसाठी गमावला लाखमोलाचा जीव विश्रांतीच्या वेळी शरीर स्ट्रेच करण्याची आणि पायऱ्या चढण्या-उतरण्याची सवय लावा. यामुळे समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आहाराचीही विशेष काळजी घ्या. जास्त चरबीयुक्त पदार्थ टाळा. रोज चालण्याची सवय लावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसला जाण्यासाठी लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा.