हैदराबाद, 13 जुलै : पाणीपुरी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आता पावसाळ्यात तर पाणीपुरी खाण्याची मजा काही औरच… असं म्हणून तुम्हीही पाणीपुरीवर ताव मारत असाल तर सावधान… ही टेस्टी टेस्टी पाणीपुरी तुम्हाला चांगलीच महागात पडेल. कोरोनाच्या संकटात आता पाणीपुरीही एक आजार पसरवत असल्याचं सांगितलं जातं आहे. तेलंगणाच्या आरोग्य विभागाने याबाबत अलर्ट केलं आहे आणि पाणीपुरी न खाण्याचा सल्ला दिला आहे (Pani Puri Causes Typhoid). पावसाळा म्हटलं की बरेच आजार आले. अशाच आजारांपैकी एक आजार पसरवण्यासाठी पाणीपुरी कारणीभूत ठरत असल्याचं तेलंगणाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राज्यात टायफॉईडची प्रकरणं वाढत आहेत याचं कारण पाणीपुरी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मीडिया रिपोर्ट नुसार, राज्यातील आरोग्य अधिकारी डॉ. जी. श्रीनिवास राव यांनी टाइफॉईडला पाणीपुरी आजार म्हणून शकतो, असं म्हटलं आहे. टाइफॉईडच्या वाढत्या प्रकरणाबाबत सांगताना त्यांनी रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पाणीपुरीचा उल्लेख केला. हे वाचा - बापरे! मेंदू कुरतडून कुरतडून घेतो जीव; व्यक्तीच्या डोक्यात घुसला Brain Eating Amoeba ते म्हणाले, “यावर्षी टाइफॉईडची जास्त प्रकरणं समोर येत आहेत. मे महिन्यात 2700 प्रकरणं होती, जूनमध्ये ती 2,752 वर पोहोचली. रस्त्यावरील दुकानांवर बरेच लोक पाणीपुरी खातात. त्यांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो. तुम्हाला 10-15 रुपयांना पाणीपुरी मिळेल. पण उद्या तुम्हाला 5 ते 10 हजार रुपये खर्च करावे लागतील” “विक्रेत्यांनीही स्वच्छतेवर लक्ष द्यावं. चांगल्या पेयजलाचा उपयोग करावा. पावसाळ्यात होणाऱ्यांना आजारांसाठी दूषित अन्नपाणी आणि डास मुख्यत्वे कारणीभूत असतात. त्यामुळे टाइफॉइड आणि पावसाळ्यातील इतर आजारांपासून वाचण्यासाठी त्यांनी पाणी उकळून प्या, स्ट्रिट फूड खाऊ नका, असा सल्ला दिला आहे” अशाप्रकारे होतो टायफॉइडचा प्रसार टायफॉइड (typhoid) ताप हा एक संसर्गजन्य ताप आहे. सेलमोनेला टायफॉइड नावाचा एक जीवाणू आहे जो टायफॉइडला कारणीभूत ठरतो. टायफॉइड कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये होऊ शकतो. इतकंच नाही तर एखाद्या व्यक्तीस टायफॉइडचा संसर्ग झाला असेल तर इतर व्यक्ती त्याच्या संपर्कात येऊन त्यास बळी पडू शकते. हे वाचा - 2 मिनिटांत प्यायला संपूर्ण बाटलीभर Digestive Medicine; फक्त 100 रुपयांसाठी गमावला लाखमोलाचा जीव टायफॉइड ताप हा दूषित पाण्यानं आंघोळ करणं, दूषित पाणी पिणं किंवा त्यापासून शिजवलेलं अन्न खाल्ल्यामुळे होतो. हवामानातील बदलांमुळे देखील टायफॉइड होऊ शकतो. टायफॉइडची लक्षणं myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. अजय मोहन यांच्या मते, टायफॉईडमध्ये रुग्णाला जास्त ताप येतो. हा ताप 103 ते 104 अंशांपर्यंत वाढू शकतो. टायफॉईड ताप सुमारे आठवडाभर राहतो. या रुग्णात तापाबरोबर, पोटदुखी, भूक न लागणे, डोकेदुखी, शरीराच्या अनेक भागात वेदना, अतिसार ही लक्षणे देखील आढळतात. तापात ही लक्षणे दिसल्यास रुग्णास ताबडतोब डॉक्टरांकडे नेले पाहिजे. कधीकधी एखाद्यास टायफॉईडमधून बरे होण्यासाठी 3-4 आठवडे लागू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.