सेक्स व्हायब्रेटर (Sex Vibrator) हे एक असं सेक्स टॉय (Sex Toy) आहे, की ज्याच्या वापरामुळे स्त्रीला शारीरिक संबंध (Physical Relation) न ठेवता परमोच्च आनंद मिळतो. या व्हायब्रेटरच्या वापरातून महिला लैंगिक सुखाचा (Sexual Pleasure) अनुभव घेऊ शकतात. या टॉयचा वापर करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महिलांच्या योनिमार्गाचा (Vagina) विचार करून याची निर्मिती केलेली असते. महिला योनीमार्गात याचा वापर करतात, तेव्हा हे टॉय व्हायब्रेट होते आणि यातून त्यांना लैंगिक सुखाचा अनुभव मिळतो. व्हायब्रेटर कोणत्याही एका विशिष्ट आकारात उपलब्ध नसतो. बाजारात आज व्हायब्रेटर्सचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. हे व्हायब्रेटर महिला योनीमार्गात किंवा योनीमार्गाच्या बाहेरील बाजूस वापरू शकतात. काही व्हायब्रेटर्सचा आकार लहान, तर काहींचा आकार मोठा असतो. सध्या भारतात सेक्स व्हायब्रेटरला मागणी (Demand) वाढली आहे. याचा वापर केल्याने काही लोकांना फायदा होतो, तर काहींना यामुळे त्रासाला सामोरं जावं लागतं; मात्र सेक्स व्हायब्रेटरचा अतिवापर आरोग्यासाठी (Health) अपायकारक ठरतो. जोडीदारासोबत लैंगिक क्रिया करताना जो आनंद मिळतो, तसा आनंद सेक्स व्हायब्रेटरमुळे मिळत नाही. बाजारात सध्या किती प्रकारचे सेक्स व्हायब्रेटर उपलब्ध आहेत आणि त्याचे फायदे-तोटे काय आहेत, हे जाणून घेऊ या… क्लिटॉरिस व्हायब्रेटर क्लिटॉरिसला उत्तेजित करण्यासाठी या व्हायब्रेटरचा वापर केला जातो. याचा वापर प्रामुख्याने महिला आणि समलैंगिक व्यक्ती करतात. क्लिटॉरिस व्हायब्रेटरची रचना अशा प्रकारे केली गेली आहे, की तो केवळ बाह्य उत्तेजनास मदत करू शकतो. एग व्हायब्रेटर (Egg Vibrator) एग व्हायब्रेटरचं डिझाइन महिलांच्या ओव्हरीच्या आकाराप्रमाणे असतं. याचा वापर बाह्य आणि शरीरांतर्गत उत्तेजनासाठी केला जातो. याचा उपयोग योनिमार्ग, अॅनल, क्लिटॉरिस, निपल किंवा शरीराचे अन्य संवेदनशील भाग उत्तेजित करण्यासाठी केला जातो. जी-स्पॉट व्हायब्रेटर जी-स्पॉट व्हायब्रेटर अशा प्रकारे डिझाइन करण्यात आलेला असतो, की तो केवळ जी-स्पॉटला उत्तेजित करतो. या व्हायब्रेटरचा वापर केवळ महिलाच करू शकतात. जोडीदारासह लैंगिक क्रिया करताना किंवा जोडीदार नसतानादेखील महिला जी-स्पॉट व्हायब्रेटरचा वापर उत्तेजनाकरिता करू शकतात. निपल व्हायब्रेटर या व्हायब्रेटरचा वापर महिला निपल अर्थात स्तनाग्रांच्या उत्तेजनासाठी करतात. व्हायब्रेटर वापरण्याचे फायदे - डिप्रेशन किंवा तणाव दूर करण्यासाठी व्हायब्रेटरचा वापर करणं फायदेशीर ठरतं. यामुळे लवकर आनंद मिळतो आणि मूड चांगला होतो. - Orgasm मिळाल्यावर महिलांमध्ये जी तृप्ततेची भावना निर्माण होते, त्यामुळे हॉर्मोन्सचं संतुलन चांगलं राहतं आणि अनेक लैंगिक आजारांना दूर ठेवता येतं. - आपल्या जोडीदारासोबत प्रयत्न करण्याऐवजी महिला व्हायब्रेटरच्या मदतीने सेक्सचे (Sex) नवनवीन प्रकार शिकू शकतात आणि त्यातून जोडीदाराला सरप्राइज देऊ शकतात. - अतिप्रमाणात डोकेदुखी किंवा शारीरिक वेदना असतील तर व्हायब्रेटरच्या वापरातून ऑरगॅझमपर्यंत पोहोचता येतं. अशा वेळी शरीरात इंडोर्फिन हॉर्मोन स्रवतं आणि अशा प्रकारच्या वेदनेतून मुक्ती मिळते. हे ही वाचा- Vagina वरच लावलं विष; नवऱ्याच्या हत्येसाठी बायकोने रचला भयंकर कट पण… तोटे - एकदा व्हायब्रेटर वापरल्यानंतर त्याची सवय लागते आणि ती आरोग्यासाठी घातक असते. - व्हायब्रेटर किंवा कोणत्याही सेक्स टॉयचा सातत्याने वापर केल्यास महिलांना पुरुषांविषयी वाटणारं आकर्षण संपुष्टात येऊ शकतं. - व्हायब्रेटर हे असं उपकरण आहे, की जे न थकता आपलं काम करतं. त्यामुळे महिला जोडीदाराऐवजी व्हायब्रेटरचा वापर प्राधान्याने करू लागतात आणि यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. - बराच काळ व्हायब्रेटरचा वापर केल्यास स्त्रिया जोडीदाराच्या फोअर-प्लेमुळे उत्तेजित होऊ शकत नाहीत. याचा त्यांच्या लैंगिक जीवनावर वाईट परिणाम होतो. - व्हायब्रेटरचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केल्यास जननेंद्रियातल्या नाजूक भागास इजा पोहोचू शकते. - व्हायब्रेटरची निर्मिती करताना ‘पीव्हीसी’सारखं साहित्य वापरलं जातं. त्यामुळे अनेकदा योनिमार्गाची त्वचा लालसर होते आणि त्या ठिकाणी रॅशेस येऊन संसर्गाचा धोका वाढतो. - व्हायब्रेटर शेअर केल्यानं हर्पिस आणि एचआयव्हीसारखे गंभीर आजार होऊ शकतात. - काही जणींना व्हायब्रेटर वापरण्याची इतकी सवय लागते, की त्या महिला नैसर्गिक सेक्सचा (Natural Sex) आनंद घेण्याच्या पद्धती आणि अनुभवदेखील विसरून जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.