मुंबई, 06 ऑक्टोबर : आपण आतापर्यंत हे बऱ्याच वेळा ऐकलं असेल, की चालणं हा सर्वोत्तम व्यायाम (Walking is best exercise) आहे. हा सर्वांना करता येण्यासारखा, सोपा व्यायाम प्रकार आहेच; मात्र वजन कमी करण्यापासून, मधुमेह, पोटाचे विकार, हृदयरोग आणि अन्य कित्येक आजार दूर ठेवण्यासाठी चालण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. अर्थात, हा फायदा तेव्हाच होतो, जेव्हा तुम्ही योग्य (How to walk properly) प्रकारे चालाल. चालण्यासारख्या सोप्या व्यायाम प्रकारातही आपण कित्येक वेळा मोठ्या चुका (Mistakes while waling exercise) करू शकतो, ज्याचा आपल्याला तोटाच होतो. कोणताही व्यायामप्रकार नियम पाळून करणं गरजेचं असतं. चालण्याच्या बाबतीतही हे लागू होतं. तुम्ही योग्य प्रकारे चालला नाहीत, तर त्यामुळे होणारे फायदे (Benefits of Walking) तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळेच व्यायामाच्या दृष्टीने चालताना कोणत्या गोष्टींची खबरदारी बाळगावी हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. यामुळे तुम्ही योग्य प्रकारे व्यायाम (How to walk properly) करू शकाल आणि लवकरात लवकर तुम्हाला अपेक्षित परिणामही दिसून येईल. हे वाचा - आजीच्या वयातल्या ‘तरुणीवर’ भुलतायत विशीतली मुलं ब्रीदिंग, मॉबिलिटी आणि माइंड-बॉडी कोच डॅना सँटास (Dana Santas) सांगतात, की कित्येक जण चालताना आपल्या बॉडी बॅलन्सकडे, म्हणजेच शरीराच्या संतुलनाकडे (Maintain body balance while walking) लक्ष देत नाहीत. यामुळे चालताना त्यांचं बॉडी पोश्चर बिघडतं. अशा प्रकारे चुकीच्या पोश्चरमध्ये व्यायाम करत राहिल्यास, पुढे गुडघे, हिप, कंबर आणि पायाचं दुखणं उद्भवू शकतं. कित्येक जण चालताना एका बाजूला झुकून चालतात. यामध्ये मग बॅग उचलणं, मोबाइल पकडणे किंवा अन्य सामान उचलण्यासाठी जो हात वापरला जातो, त्या हाताच्या बाजूला झुकण्याचं प्रमाण अधिक दिसून येतं. फिटनेस कोचने यामुळेच योग्य प्रकारे चालण्याची पद्धत सांगितली आहे. चालताना आपलं शरीर नेहमी सरळ ठेवण्याचा (Keep body straight while walking) सल्ला ते देतात. तसंच, दोन्ही हातांना शक्य तितकं स्विंग (Keep your hands swinging while walking) करण्यासही ते सांगतात. चालताना हातांची पुढे-मागे हालचाल होत राहिली पाहिजे. या वेळी एक हात पुढे असताना, दुसरा मागे गेला पाहिजे. म्हणजेच, दोन्ही हातांची एकमेकांच्या विरुद्ध दिशेला हालचाल होत राहिली पाहिजे. हे वाचा - वर्षभराने धडधडलं बंद हृदय; Artificial Heart पासून मुक्ती मिळालेला पहिला रुग्ण तुम्ही व्यायाम म्हणून नाही, पण नॉर्मली चालतानाही बऱ्याच गोष्टींची काळजी (Walking tips) घ्यायला हवी. तुम्ही बॅग किंवा अन्य सामान पकडले असेल, तर ते थोड्या-थोड्या वेळाने दुसऱ्या हातात घेतले पाहिजे. यासोबतच, चार-पाच महिन्यांतून आपल्या बुटांचे तळवे तपासायला हवेत. एकाच बाजूला झुकून चालल्यामुळे कित्येक वेळा एका पायातला बूट जास्त घासला गेलेला असतो. तसं झालं असेल, तर त्वरित तुमचे बूट बदलून घ्यावेत. तुमचा बॉडी बॅलन्स सुधारण्यासाठी तज्ज्ञ सिंगल लिंब युनिलॅटरल एक्सरसाइज (Single Limb Unilateral Exercise) करण्याचा सल्ला देतात. या व्यायामामुळे शरीराचं संतुलन सुधारतं, तसंच पायही मजबूत होतात. अशा काही गोष्टींचा अवलंब करून, तुम्ही आपल्या चालण्याच्या पद्धतीत सुधारणा करू शकता. जेणेकरून, तुम्ही केलेल्या व्यायामाचा तुम्हाला पूर्णपणे फायदा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.