नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : हृदय (Heart) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग. या हृदयावरच आपल्या संपूर्ण शरीराची प्रक्रिया अवलंबून आहे. हृदयच बंद पडलं तर माणसाचं आयुष्यही संपलं. पण आता याला आर्टिफिशिअल हार्ट (Artificial Heart) म्हणजे कृत्रिम हृदयाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. शरीरातील नैसर्गिक हृदयात काही बिघाड झाल्यास या कृत्रिम हृदयाचा आधार घ्यावा लागतो. अशाच कृत्रिम हृदयापासून भारतात पहिल्यांदाच एका रुग्णाला मुक्ती मिळाली आहे. त्याचं स्वतःचं हृदय वर्षभऱातच पुन्हा धडधडू लागलं.
56 वर्षांचा इराकी रुग्ण जवाद मोहम्मदचं हार्ट फेल झालं होतं (Jawad Mohammed), दिल्लीच्या नोएडातील फोर्टिस रुग्णालयात (Fortis hospital) त्यांनी आपल्या हृदयाचं ऑपरेशन करून घेतलं. दोन वर्षांपूर्वी त्यांना आर्टिफिशिअल हार्ट लावण्यात आलं होतं. पण ते आता बाहेर काढण्यात आलं आहे. कारण त्यांचं स्वतःचं हृदय आता पुन्हा काम करू लागलं आहे आणि आर्टिफिशिअल हृदयाची गरजच नाही. हार्ट फेल झाल्यानंतर ते पुन्हा इतकं फीट होणं आणि कोणत्याही सपोर्टशिवाय पुन्हा कार्य करणं हे दुर्मिळ आहे.
हे वाचा - लाखमोलाची ढेकर! एका Burp साठी त्याला मोजावे लागले तब्बल 1 लाख रुपये
रिपोर्टनुसार फोर्टिस रुग्णालयातील हृदय रोग तज्ज्ञ डॉ. अजय कौल यांनी सांगितलं, तीन वर्षांपूर्वी हृदयाच्या आजारावर उपचारासाठी जवाद मोहम्मद इराकहून भारतात आले. त्यांचं हार्ट फेल झालं होतं. हृदय स्वतःहून शरीराला रक्तपुरवठा करण्यास सक्षम नव्हतं. त्यामुळे त्याला हार्ट ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला देण्यात आला. पण किती तरी महिने ते प्रतीक्षा यादीत होता. त्यांना कुणी डोनर मिळाला नाही. त्यामुळे 2018 साली त्याला आर्टिफिशिअल हार्ट म्हणजे लेफ्ट वेंट्रिकुलर असिस्टिड डिव्हाइस (LVAD) लावण्यात आलं. ज्यांचं हृदय कमजोर आहे आणि रक्त पंप करण्यास सक्षम नाही त्यांना लावलं जातं. हे हार्ट एका बॅटरीशी जोडलेलं असतं. जे दररोज फोनप्रमाणे चार्ज करावं लागतं.
2019 साली एक वर्षांनी जवाद डॉक्टरांकडे पुन्हा तपासणीसाठी आले तेव्हा त्यांचं हृदय काम करत होतं. त्यानंतर डॉक्टरांनी आर्टिफिशिअल हार्टला थांबवून पाहिलं तर त्याचं हदय हळूहळू काम करत होतं. दोन वर्षांत त्याचं हृदय अधिकच चांगलं काम करू लागलं. त्याचं हृदय आता 50 टक्के क्षमतेने काम करतं आहे. निरोगी रुग्णापेक्षा हे प्र्माण कमी आहे. पण बऱ्यापैकी आहे. त्यामुळे आर्टिफिशिअल हार्ट काढून टाकावं अशी इच्छा रुग्णाची होती.
हे वाचा - धक्कादायक! या सुंदर 'बार्बी सर्जन'वर पडली नजर; इतर महिला झाल्या विद्रुप
माहितीनुसार भारतात आतापर्यंत एकूण 130 आर्टफिशिअल हार्ट लावण्यात आले. काही प्रकरणात आर्टिफिशिअल हार्ट लावल्यानंतर हृदयाची क्षमता पुन्हा येते. कारण सपोर्टमुळे हृदयावर पडणारा ताण कमी होतो आणि हृदय हळूहळू चांगलं होतं. पण कोणत्याही प्रकरणात ते बाहेर काढण्यात आलेलं नाही किंवा खरं हृदय इतकं फिट झालेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.