Home /News /lifestyle /

चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुळस, अन्यथा होतात वाईट परिणाम

चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुळस, अन्यथा होतात वाईट परिणाम

घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो, याला महत्त्व आहे. तुळस ठेवण्याची दिशा आणि जागेला शास्त्रात महत्त्व असून, चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

दिल्ली, 1 डिसेंबर:  ग्रामीण भागात अनेक घरांसमोर अंगणात तुम्हाला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळेल. शहरातही अनेक जण घरात तुळशीचं (Tulsi) रोप आवर्जून लावतात. शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञाच कालबाह्य ठरली आहे. त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते. घरामध्ये तुळस कुठे ठेवावी, यालाही काही शास्त्र (Shastra) आहे. घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो, याला महत्त्व आहे. तुळस ठेवण्याची दिशा आणि जागेला शास्त्रात महत्त्व असून, चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळे तुळस ठेवण्याची योग्य जागा आणि दिशा (Direction) कोणती हे जाणून घेऊ या. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस हे फक्त एक रोपटं नसून, तुळस (Basil) आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुळशीची पानं खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तुळस घरात ठेवणं शुभ असतं. यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण राहतं, असं मानलं जातं. आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते. घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी. तुळशीला दररोज पाणी घालावं. ती सुकली असेल तर लगेचच काढून टाकावी आणि नवं रोपटं लावावं. सुकलेली तुळस घरात ठेवू नये, असं म्हणतात. Beauty Tips: चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरते हरभरा डाळ, फक्त या पद्धतीनं वापरा घरामध्ये किंवा अंगणात तुळशीचं झाड असावं, असं म्हटलं जातं. तुळशीचं झाड घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला (Direction) तुळस ठेवावी. पूर्व दिशेला तुळस ठेवू नये, असं म्हणतात. तसंच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये, असं म्हटलं जातं. घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान व्हायला लागतं. त्यामुळे तुळस योग्य ठिकाणी ठेवावी. सावधान! पोटदुखीसह ‘ही’सुद्धा असू शकतात Heart Attack ची लक्षणं; वेळीच व्हा सावध तुळस घरामधले सगळे दोष दूर करते. तसंच तुळशीमुळे परिवाराचं आरोग्यही चांगलं राहतं. तुळशीचे अनेक फायदे (Importance Of Tulsi) आहेत. कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही तुळस खूप प्रभावी आहे. सर्दी-खोकला पळवण्यासाठीही तुळशीचा वापर केला जातो. कोरोना झाल्यावरही तुळशीची पाने खाण्याचा सल्ला देण्यात आला. याचबरोबर तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचं स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे, हे पाहा आणि चुकीच्या ठिकाणी ठेवली असेल, तर आताच जागा बदला.
First published:

Tags: Home-decor, Vastu

पुढील बातम्या