Home /News /lifestyle /

Chana Dal For Glowing Skin: चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरते हरभरा डाळ, फक्त या पद्धतीनं वापरा

Chana Dal For Glowing Skin: चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरते हरभरा डाळ, फक्त या पद्धतीनं वापरा

Chana Dal For Glowing Skin: या डाळीचा वापर जसा रुचकर पदार्थ बनवण्यासाठी होतो, त्याचप्रमाणे तो चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठीही होतो? चणा डाळीपासून चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात. या डाळीपासून बनवलेला स्क्रब आणि फेस पॅक तुमच्या चेहऱ्याचा रंग सुधारण्यासोबतच त्वचेचा कोरडेपणा आणि डाग दूर करण्यासही मदत करतो.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : आत्तापर्यंत तुम्ही हरभरा डाळ (Chana pulse) चना रोटी, चना हलवा, चना कबाब यांसारखे पदार्थ बनवण्यासाठी वापरली असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, या डाळीचा वापर जसा रुचकर पदार्थ बनवण्यासाठी होतो, त्याचप्रमाणे तो चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठीही होतो? चणा डाळीपासून चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात. या डाळीपासून बनवलेला स्क्रब आणि फेस पॅक तुमच्या चेहऱ्याचा रंग सुधारण्यासोबतच त्वचेचा कोरडेपणा आणि डाग दूर करण्यासही मदत करतो. त्यामुळं त्वचा मऊ आणि चमकदार बनते. त्वचेची छिद्रे उघडून चेहरा आतून स्वच्छ होतो. चला जाणून घेऊया, चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी हरभरा डाळीचा वापर कसा केला (Chana Dal For Glowing Skin) जाऊ शकतो. चना डाळ स्क्रब/फेस पॅक चणा डाळीपासून तुम्ही फेस स्क्रब आणि फेस पॅक तयार करून वापरू शकता. यासाठी सर्वात आधी अर्धा कप कच्चे दूध घ्यावे. त्यात एक मोठा चमचा चणा डाळ घालून रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी डाळ मिक्सरमध्ये दुधासोबत बारीक वाटून त्याची पेस्ट बनवा. नंतर या पेस्टमध्ये एक चतुर्थांश चमचा हळद आणि अर्धा चमचा मध मिसळा आणि सर्व एकत्र फेटा. ही पेस्ट सेट होण्यासाठी दहा मिनिटे ठेवा. हे वाचा - Maruti Suzuki ची मोठी घोषणा, डिझेल Car ची निर्मिती बंद करणार; वाचा काय आहे कारण चना डाळ फेस पॅक वापरण्यापूर्वी, आपला चेहरा पाण्यानं किंवा गुलाब पाण्यानं पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर चांगली लावा. वीस मिनिटे असंच राहू द्या आणि त्यानंतर गोलाकार हालचालीत चेहऱ्याला पाच मिनिटे मसाज करा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. आता मऊ टॉवेलने चेहरा पुसून मॉइश्चरायझर लावा. अशा प्रकारे चणाडाळ आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावता येते. हे वाचा - दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Skin care

    पुढील बातम्या