मुंबई २९ सप्टेंबर : लग्नानंतर एका बाईच्या आयुष्यात मोठे बदल होतात, कारण ती त्या दिवसानंतर आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करते. परंतू जेव्हा एका बाईला मुल होतं, तेव्हा त्या बाईचा दुसरा जन्म होतो. कारण त्या बाळाच्या जन्मानंतर एक स्त्री ही आई बनते. खरंतर एक स्त्रीसाठी मातृत्व ही खूप मोठी भावना असते, ती शब्दात सांगणं तसं कठीण आहे. पण प्रत्येक स्त्रीला आई व्हावं असं वाटतंच असतं. पण आई होणं तसं सोप नसतं, कारण त्यासाठी एका स्त्रीला जबाबदारी आणि त्याग या दोन गोष्टींचा सामना करावा लागतो, त्यात बहुतांश महिला या करिअर करणाऱ्या असतात, त्यामुळे ते देखील त्यांना सांभाळायचं असतं. मग या सगळ्यामध्ये असा प्रश्न उपस्थीत होतो की आई होण्याचं योग्य वय नक्की कोणतं? लोकांमध्ये असा समज आहे की एका ठराविक वेळेत आई झालेलं चांगलं असतं, ज्यामुळे बहुतांश महिलांच्या मनात याबद्दल नेहमीच संभ्रम असतो. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ वयाची 25 ते 35 वर्ष आई होण्यासाठीचं वय योग्य आहे असं स्त्री रोग तज्ञां सांगतात. मग आता असा प्रश्न उपस्थीत होतो की हेच वय का? यानंतर मुल होऊ शकत नाही का? तर असं नाही, मुल या वयानंतर देखील होतात. परंतू एकदा का महिलेची पस्तीशी उल्टून गेली की, मग तिला शरीराशी संबंधीत अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. हे ही वाचा : गरोदरपणात शारीरिक संबंध ठेवावा का नाही? बाळ झाल्यानंतर किती दिवसांनी ठेवावेत संबंध? वाचा स्त्रीच्या गर्भाशयातील अंडाशयात अंडी तयार होत असतात. तसेच पुरुषांच्या टेस्टीकलमध्ये एकाच वेळेस लाखो स्पर्म तयार होत असतात. तज्ज्ञांच्या मते स्त्रियांच्या वाढत्या वयामुळे गर्भाशयात गुंतागुंत वाढू शकते. अनेकदा गर्भाशयाती अंडाशयातील अंड्यांची संख्या कमी होऊ लागते. ज्यामुळे गर्भधारणेनंतरच्या समस्या आणखी वाढू शकतात. आपण याबद्दल थोडं सविस्तर समजून घेऊ 1. जेव्हा एखाद्या मूलीचा जन्म होतो तेव्हा तिच्या गर्भाशयात 10 लाख अंडी असतात. 2. मुलींची पाळी सुरु झाल्यावर या अंड्याची संख्या कमी होऊन ती 3 लाख इतकी होते. 3. वयाच्या 37 वर्षी हीच संख्या आणखी कमी होऊन 25 हजार इतकी कमी होते. 4. तर वयाच्या 51 वर्षापर्यंत याचंच प्रमाण 1 हजार पेक्षाही खाली येतं. 5. त्यातही फक्त 300 ते 400 अंड्यांमध्ये मूल जन्माला घालण्याची क्षमता असते. ज्यामुळे जास्त वयात आई होणं किंवा हेल्दी बाळाला जन्म देणं एका आईला शक्य नसतं. जसं जसं महिलांचं वय वाढतं, तसं तसं जाते तस तसे त्यांच्या अंडाशयातील अंड्याची संख्या कमी होत जाते. त्यामुळे या अंड्यातील गुणवत्ता आणि दर्जा देखील कमी होतो. हे ही वाचा : Pregnancy tips in marathi : गरोदरपणात महिलांनी मायक्रोवेव्ह वापरणे सुरक्षित आहे का? बाळाला कोणत्या वयात जन्माला घालायचे हा त्या पालकांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र बाळ सुधृढ, आगोग्यदायी असावं हे प्रत्येक पालकाला कायम वाटतं. त्यामुळे मग अशावेळी बाळाला जन्म देण्यासाठी 25 ते 35 वर्ष ही योग्य वेळ आहे असं स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात. (विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.