नवी दिल्ली, 05 जून : कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये कोरोनाव्हायरसचा एक फायदाही दिसून आला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात जगातील प्रदूषण (Pollution) लक्षणीय प्रमाणात कमी झालं आहे. काही ठिकाणची हवा इतकी प्रदूषित झाली होती की शुद्ध हवेत (Clean Air) श्वास घेणंही अशक्य होतं. बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊनमुळे (Lockdown) हवा श्वास घेण्यालायक झाली आहे. आता अशात शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात शुद्ध आणि स्वच्छ हवेचं ठिकाण शोधलं आहे.
अमेरिकेतल्या कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी आणि ऑस्ट्रेलियातील हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी अशा जागेचा शोध लावला आहे. या ठिकाणी मानवाचं अस्तित्व नसल्याने प्रदूषणाचा एकही कण मिळालेला नाही. कुठे आणि कशी आहे ही जागा पाहुयात.
अंटार्क्टिक महासागर (Antarctic Ocean) किंवा दक्षिण महासागराच्या (Southern Ocean) वर वाहणाऱ्या हवेत एअरोसॉल पार्टिकल्स नाहीत. हा महासागराने अंटार्क्टिकाला (Antarctica) घेरलेलं आहे.
हे वाचा - कोरोनाला उंचीची भीती? समुद्रसपाटीपेक्षा डोंगराळ भागात व्हायरसचा प्रभाव कमी
नैसर्गिकरित्या आणि जास्त करून मानवी प्रक्रियांमुळे असे एअरोसॉल पार्टिकल्स तयार होतात. एयरोसॉलमुळे हे घन, द्रव आणि वायू तिन्ही स्वरूपात असतात जे हवेत तरंगत असतात. पर्यावरण आणि हवामान दोघांवरही याचा परिणाम होतो, त्यांच्यामुळे हवा प्रदूषित होते. एयरोसॉल हे एकाच ठिकाणीच समान प्रमाणात नसतात.
ऑस्ट्रेलियातील हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी हवेतील बॅक्टेरियांमार्फत इथल्या हवेत काय आहे हे माहिती करण्याचा प्रयत्न केला.
शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिकातील सागरी सीमेवरील हवेचे नमुने घेतले. त्यानंतर वातावरणातील सूक्ष्मजीव आणि या हवेतील सूक्ष्मजीवांची तुलना केली. त्यावेळी दिसून आलं की इथल्या हवेत समुद्रातील सूक्ष्मजीव आहेत. इतर खंडातील सूक्ष्मजीव नाहीत. या ठिकाणापासून दूर असलेल्या हवेतील एयरोसॉल या ठिकाणी सापडले नाहीत.
हे वाचा - Unlock 1.0 : तब्बल अडीच महिन्यांनंतर पुणेकरांसाठी खुली झाली ही ठिकाणं, पण..
शास्त्रज्ञांनी जगभरातील समुद्रांवरून वाहणाऱ्या हवेचा अभ्यास केला आहे. मात्र त्यांना एका ठिकाणचे सूक्ष्मजीव दुसऱ्या ठिकाणी सापडलेत. हवेमार्फत ते हजारो मैलापर्यंत पोहोचू शकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर जगातील एका भागातील पार्टिकल्स दूरच्या क्षेत्रातील वातावरणही प्रभावित करू शकतात.
न्यूजवीकच्या रिपोर्टनुसार संशोधनाचे अभ्यासक थॉमस हिल सांगतात, एअरोसॉल्समधील घटकांना नियंत्रणात ठेवणारे दक्षिण महासागरातील ढग महासागराच्या जैविक प्रक्रियेशी जोडलेले आहेत. दक्षिण खंडातील सूक्ष्मजीव आणि न्यूट्रिएंट्सचा अंटार्क्टिकाला स्पर्शही करत नाही.
तज्ज्ञांच्या मते, वायूप्रदूषण एखाद्या महासाथीप्रमाणेच आहे. दरवर्षी 70 लाख लोकं यामुळे आपला जीव गमावतात. वायू प्रदूषणामुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक, फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, शहरात राहणारे 80% पेक्षा जास्त लोक अशुद्ध हवेत श्वास घेतात. जगात सर्वाधिक प्रदूषण असलेल्या 20 शहरांमध्ये भारतातील 13 शहरांचा समावेश आहे.
हे वाचा - कोरोनामुळे बदललं हॉटेल्स-रेस्टॉरंट्सचं रूप, पाहा PHOTO मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.