Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाला उंचीची भीती? समुद्रसपाटीपेक्षा डोंगराळ भागात व्हायरसचा प्रभाव कमी

कोरोनाला उंचीची भीती? समुद्रसपाटीपेक्षा डोंगराळ भागात व्हायरसचा प्रभाव कमी

उंच ठिकाणांवर राहणाऱ्या लोकांना कोरोनाव्हायरसचा धोका कमी आहे, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

    नवी दिल्ली, 04 जून : जगातील कोणताच भागात कोरोनाव्हायरस (coronavirus) पोहोचला नाही असं नाही. जगभरात 65,97,348  लोकं कोरोनाने संक्रमित आहेत. तर 3,88,425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र उंच ठिकाणावर कोरोनाव्हायरस फारसा परिमाण करू शकलेला नाही. समुद्रसपाटीपेक्षा (sea level) उंचावर डोंगराळ भागात (High Altitude) कोरोनाव्हायरसची प्रकरणं, कोरोनाव्हायरस पसरण्याचा वेग आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही कमी आहे, असं नुकतंच एका संशोधनात दिसून आलं आहे. टाइम्‍स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार शास्त्रज्ञांनी तिबेट, बोलिव्हिया, इक्वाडोरमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, समुद्रसपाटीपेक्षा जास्त उंचावर राहणाऱ्या लोकांना कोरोनाव्हायरसचा धोका कमी आहे. समुद्रसपाटीपासून 3000 मीटर किंवा त्यापेक्षा उंच ठिकाणांवर राहणाऱ्या लोकांना यापेक्षा कमी क्षेत्रावर राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत कोरोनाव्हायरसचा धोका कमी आहे. हे वाचा - अधिक गोड तरी शुगर फ्री; डायबेटिज रुग्णांसाठी स्पेशल कलिंगड भारतातही उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त प्रकरणं आहेत. यातही राज्याच्या सपाट क्षेत्रावर बहुतेक प्रकरणं आहेत. उंच ठिकाणावर जी प्रकरणं सापडलीत त्यापैकी बहुतेक लोकं या तळाकडील भागातूनच उंचावर गेलीत. स्थानिक प्रकरणंही परदेशाहून परतलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेलीच आहेत. डोंगराळ भागात कोरोनाव्हायरसची प्रकरणं कमी का? शास्त्रज्ञांच्या मते, डोंगराळ भागातील दिवस आणि रात्रीच्या तापमानात भरपूर फरक असतो. शिवाय हवादेखील कोरडी असतं. यामुळे आजार पसरण्याची शक्यता कमी असते. याशिवाय सूर्यामार्फत येणारी अतिनील किरणं  (UV rays) सपाट भागाच्या तुलनेत जास्त असतात. अल्ट्राव्हायोलेट किरणं नैसर्गिक सॅनिटायझरचं काम करतात. उंच ठिकाणांवरील अल्ट्राव्हायलोट किरणांमुळे व्हायरस निष्क्रिय होत असून पसरत नसावा. तसंच हवेचा दाबही व्हायरसचा प्रभाव कमी करण्यात मदत करत आहे. उंच ठिकाणी ऑक्सिजनची कमी शरीरातील ACE2 रिसेप्टर्सवर परिणाम करत असेल. याच रिसेप्टर्समार्फत कोरोनाव्हायरस शरीरातील पेशींवर हल्ला करतो. हे वाचा - मुलं चिडचिडी आणि रागिष्ट झालीत; असू शकतो मानसिक आजार आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उंच ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हायपॉक्सिया म्हणजे शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होणं याविरोधात लढण्याची क्षमता विकसित होते. उंचावर राहणारी लोकं एक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (श्वसनसंबंधी समस्या) पासून बचाव होतो. हे वाचा - शाळा सुरू करणं या देशाला पडलं महागात; 250 मुलं कोरोनाग्रस्त, 6800 जण क्वारंटाइन या कारणांशिवाय डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांमध्ये व्हायरसचा प्रभाव कमी हा आहे, याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या