कायमचं Work from Home, आणखी एका समस्येला निमंत्रण; सत्या नडेला यांनी व्यक्त केली चिंता

कायमचं Work from Home, आणखी एका समस्येला निमंत्रण; सत्या नडेला यांनी व्यक्त केली चिंता

कायमचं Work from Home म्हणजे एका समस्येतून बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या समस्येला निमंत्रण आहे, असं मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणालेत.

  • Share this:

मुंबई, 18 मे : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावासाठी लॉकडाऊन (lockdown) आहे. अशा परिस्थितीत अनेक कंपन्यांचं वर्क फ्रॉम होम (work form home) सुरू आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर किंवा लॉकडाऊन संपल्यानंतर काही कंपन्या आपलं काम पुन्हा सुरू करतीय. ऑफिसचं रूटीन सुरू होईल. मात्र काही कंपन्यांनी या परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतरही कायमचं वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा कर्मचाऱ्यांना दिली आहे.

ट्विटरनं (twitter) नुकतंच आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीतून बाहेर आल्यानंतरही कायमचं वर्क फ्रॉम होमचा (Permanent work from home) पर्याय दिला आहे. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य धोक्यात आहे, अशी प्रतिक्रिया मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला (Mircosoft CEO Satya Nadela) यांनी दिली आहे.

हे वाचा -  शाकाहारी लोकांना कोरोनाचा कमी धोका; WHO च्या 'त्या' व्हिडिओमागील सत्य काय?

द न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना ते म्हणाले, आपण एका समस्येतून सुटका करून घेण्यासाठी दुसऱ्या समस्येला निमंत्रण देत आहोत.  सामाजिक सुसंवाद आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. इन-पर्सन मीटिंगची जागा व्हर्च्युअल व्हिडिओ कॉलनाही घेऊ शकत नाही.

"जास्त काम किंवा समस्यांचं ओझं कसं असतं? मानसिक आजार कसा असतो? अशात समुदाय आणि संपर्क कसा असतो? मला वाटतं सध्याच्या परिस्थितीत ऑफिसपासून दूर राहून आपण आतापर्यंत जमा केलेली सामाजिक भांडवल गमावत आहोत. आता यासाठी आपल्याकडे काय उपाय आहेत?", ट्विटरच्या निर्णयानंतर नडेला यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचा - या 5 देशात हेल्थकेअर सर्वात भारी; कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर आणलं नियंत्रण

ट्विटरआधी फेसबुक आणि गुगलनं वर्क फ्रॉम होमची घोषणा केली होत. मायक्रोसॉफ्टचे कर्मचारीही वर्क फ्रॉम होम करत आहेत. मायक्रोसॉफ्टची वर्क फ्रॉम होम पॉलिसी ऑक्टोबरपर्यंत आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 18, 2020, 4:58 PM IST

ताज्या बातम्या