शाकाहारी लोकांना कोरोनाचा कमी धोका; WHO च्या 'त्या' व्हिडिओमागील काय आहे सत्य?

शाकाहारी लोकांना कोरोनाचा कमी धोका; WHO च्या 'त्या' व्हिडिओमागील काय आहे सत्य?

WHO चे प्रतिनिधी डॉ. गॉडेन गेलिया (Gauden Galea) यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

  • Share this:

मुंबई, 18 मे : गेल्या काही महिन्यात कोरोनाव्हायरस (coronavirus) जितक्या झपाट्याने पसरतो आहे, तितक्याच वेगानं सोशल मीडियावर (social media) अफवाही पसरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शाकाहारी (vegetarians) लोकांना कोरोनाचा धोका कमी आहे, तर मांसाहार (non-vegetarians)  करणाऱ्यांना कोरोनाचा जास्त आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

या पोस्टला जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) संदर्भ देण्यात आला आहे. जोपर्यंत लोकं मीट खात आहे, तोपर्यंत कोरोनाव्हायरसचा धोका कायम आहे, असं म्हणणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. गॉडेन गेलिया यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. अवघ्या 6 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे.

या व्हिडओचा स्क्रिन शॉटही शेअर केला जातो आहे. ज्यामध्ये जगातील कोणतीही शाकाहारी व्यक्ती कोरोनाव्हायरसचा शिकार झालेला नाही, असं नमूद करण्यात आलं आहे.

हे वाचा - या 5 देशात हेल्थकेअर सर्वात भारी; कोरोनासारख्या महाभयंकर आजारावर आणलं नियंत्रण

या व्हिडिओच्या खाली Labanese Vegan असं असल्याचंही दिसत आहे. याच नावानं एक फेसबुक पेडही आहे, ज्यावरून हा व्हिडिओ कित्येक वेळा शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओनंतर ट्विटरवर #NoMeatNoCoronavirus देखील ट्रेंड होऊ लागलं. कित्येक ट्विटसमध्ये म्हणण्यात आलं की भारतात कोरोनाव्हायरस येण्यासाठी मांसाहार जबाबदार आहे. कित्येकांनी मांसाहार सोडण्याचं आवाहनही केलं.

काय आहे सत्य?

द लॉजिकल इंडियन वेबसाइट द्वारे या दाव्याबाबत करण्यात आलेल्या फॅक्ट चेकनुसार ही फेक न्यूज आहे.  डॉ. गेलिया यांनी सांगितलं, की त्यांच्या वक्तव्यासह छेडछाड करण्यात आली आहे. त्यांनी बोलताना कोणताही पदार्थ खा किंवा खाऊ नका याचा उल्लेख केला नव्हता. ते म्हणाले होते. जोपर्यंत लोकं मीट खात राहतील तोपर्यंत व्यावयासिक दृष्टीनं प्राणी पाळणं आणि मीट विक्री सुरू राहिल.

खरंतर त्यांनी हे वक्तव्य त्यावेळी केलं होतं, जेव्हा प्राण्यांमार्फत माणसांमध्ये येणाऱ्या व्हायरसबाबत चर्चा होत होती. जोपर्यंत लोकं मीट खात राहतील तोपर्यंत प्राण्यांचं स्लॉटर होईल आणि यामुळे माणसांमध्ये व्हायरस ट्रान्सफर होण्याचा धोका वाढेल. असं म्हणण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यांनी मांसाहारी लोकांना लक्ष्य केलं नव्हतं.

हे वाचा - बापरे! सावधान...ऑगस्टपर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या जाऊ शकते 10 लाखांवर

खरंतर हा मूळ व्हिडिओ सीएनएन न्यूज चॅनेलचा आहे, जो पूर्ण 3 मिनिटांचा आहे. 22 जानेवारीला चायना कन्फर्म्स वुहान व्हायरस कॅन बी स्प्रेड बाय ह्युमन या शीर्षकाअंतर्गत अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर डॉ. गॉडेन यांच्या वक्तव्यासह छेडछाड केल्याचं समजून येतं.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 18, 2020, 3:54 PM IST

ताज्या बातम्या