स्पर्श आणि गळाभेटीचे हे फायदे माहीत आहेत का? मनात होतात हे अद्भुत बदल

स्पर्श आणि गळाभेटीचे हे फायदे माहीत आहेत का? मनात होतात हे अद्भुत बदल

माणसाला स्पर्शाची उब नेहमीच हवीहवीशी असते. या स्पर्शाचे फायदे एका संशोधनातून समोर आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 जानेवारी : तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना (friends) भेटता तेव्हा आवर्जून गळाभेट घेता (hugging) , हातात हात देता. सोबतच ऑफिसमध्येही शेकहॅण्ड (shake hand) करणं कॉमन समजलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, की याचे किती असंख्य फायदे आहेत? Coronavirus च्या साथीमुळे हे असं भेटणं हल्ली मुश्कील झालं आहे खरं. सोशल डिस्टन्सिंगचे नियम आडवे येतात. पण मुळात रिलेशनशिपमध्ये ओलावा निर्माण करण्यात या स्पर्शाचं महत्त्व अनमोल आहे. पण एका संशोधनात तर आरोग्याला फायदेशीर गोष्टीही समोर आल्या आहेत.

एका संशोधनात (research) समोर आलं आहे, की हातात हात घेणं, गळाभेट घेणं यातून रक्तदाबाची पातळी (blood pressure) संतुलित राहते सोबतच हृदयाची (heart) धडधडही नियंत्रणात राहते. यातून हृदयाच्या अनेक समस्या थोड्याबहुत नियंत्रणात येऊ शकतात. असं नाही, की केवळ आपल्या जोडीदारासह, तुम्ही ज्यांना आपल्या जवळचे मानता त्या कुणालाही तुम्ही स्पर्शातून प्रेम देऊ शकता.

यातून तुमचं त्या व्यक्तीसह प्रेम वाढतं असं नाही तर दोन्ही व्यक्तींचं मानसिक स्वास्थ्यही (mental health) नीट राहतं. तुम्ही अस्वस्थ असाल, कुठल्या समस्येनं ग्रस्त असाल, तर तुमचं कुणी जवळचं गळाभेट घेतं तेव्हा तुम्हाला जाणवेल, की तुम्हाला छान वाटतं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्राचे प्राध्यापक रॉबिन डबनर म्हणतात, की गळाभेट घेतल्यानं तणाव कमी होतो. सोबतच मानसिक आरोग्यसुद्धा वेगानं सुधारतं. त्यामुळं तुम्ही कुण्या जवळच्या व्यक्तीला तणावात (stress) असल्याचं पहाल तेव्हा नक्की त्याची गळाभेट घ्या.

हे वाचा - भारतीय महिलांचा Eggs Freezing कडे वाढता कल; नेमकं काय आहे कारण?

याशिवाय तुम्ही गळाभेट घेता तेव्हा नक्कीच तुम्हाला स्ट्रॉंग फील होतं. शिवाय एकटंही वाटत नाही. शास्त्रज्ञही म्हणतात, की निरोगी हृदयासाठी गळाभेट अतिशय गरजेची आहे. अगदी यातून हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. कोविडच्या साथीदरम्यान अनेकांना एकटेपणानं ग्रासलं. जवळचे लोक दूर गेल्यानं त्याला अस्वस्थ वाटतं. मानवी शरीर आणि मनाची संरचनाच अशी आहे, की त्याला एकटं राहणं जन्मापासूनच आवडत नाही.

हे वाचा - तुमच्या तोंडात तर असं काही दिसत नाहीये ना? कोरोनाची नवीन लक्षणं आली समोर

त्यामुळं या प्रभावी युक्तीचा उपयोग सतत करत रहायला विसरू नका!

Published by: News18 Desk
First published: January 26, 2021, 9:59 PM IST

ताज्या बातम्या