ताप, खोकला, सर्दी, चव जाणं, सुगंध न येणं ही कोरोनाव्हायरसची प्रमुख लक्षणं आहेत. NHS च्या यादीत याच लक्षणांचा समावेश आहे, त्यामुळे अशाच रुग्णांना क्वारंटाइन किंवा आयसोलेट केलं जात आहे किंवा त्यांची चाचणी केली जाते आहे. (फोटो सौजन्य - canva)
2/ 5
पण बहुतेक कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाची अशी लक्षणं दिसत नाहीत. पण त्या रुग्णांमध्ये वेगळीच लक्षणं दिसून आली आहे. यामध्ये जिभेवर आणि तोंडात व्रण दिसून येत आहेत. (फोटो सौजन्य - canva)
3/ 5
कोव्हिड टंग (Covid tongues) आणि माऊथ अल्सर (mouth ulcers) हे कोरोनाचं लक्षणं असू शकतं, असं किंग्स कॉलेज लंडनचे प्रोफेसर टिम स्पेक्टर यांनी सांगितलं आहे. (फोटो सौजन्य - canva)
4/ 5
पाचपैकी एका कोरोना रुग्णामध्ये अशी वेगळी लक्षणं दिसून आल्याची माहिती टिम स्पेक्टर यांनी आपल्या ट्विटरवर दिली आहे. (फोटो सौजन्य - canva)
5/ 5
जागतिक आरोग्य संघटना किंवा सेंटर फॉर डिसीजच्या यादीत या लक्षणांचा समावेश नाही. पण तरी अशी लक्षणं असतील आणि डोकेदुखी किंवा थकवा असेल तर घरातच राहावं असा सल्लाही टिम यांनी दिला आहे.