मुंबई, 14 जुलै : कोणतंही नातं म्हणजे एक प्रकारची भावनिक, मानसिक, शारीरिक गुंतवणूक असते. बऱ्याचदा प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या पार्टनरबद्दल सगळी माहिती असावी, असं वाटतं. खरं तर, त्यात चुकीचं असं काही नाही; पण तुमच्या मनातले काही प्रश्न असे असतात, ज्यामुळे तुमचा जोडीदार दुखावला जाऊ शकतो किंवा त्याला वाईट वाटू शकतं. तसंच याचा थेट परिणाम तुमच्या नात्यावर होतो. त्यामुळे शक्यतो आपल्या पार्टनरला काही प्रश्न विचारणं टाळावं. ते प्रश्न कोणते हे जाणून घेऊया पार्टनरला भूतकाळाबद्दल प्रश्न विचारू नये प्रत्येकाचा काही ना काही भूतकाळ (Past) असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याच्या भूतकाळाशी संबंधित प्रश्न विचारणं टाळा. कारण बरेच जण त्यांच्या भूतकाळाबद्दल खूप भावनिक असतात. त्यांच्या भूतकाळातल्या पार्टनरसोबतच्या आठवणीही (Memories) असू शकतात. त्यामुळे तुमच्या प्रश्नाने तुमचा पार्टनर दुखावला जाण्याची शक्यता असते. हे वाचा - नुसतं एकदा बघितलं तरी मनात काय होतं अन् काय नाय! प्रेमात पडलोय हे कसं ओळखायचं माहितीये का? पार्टनरकडून मित्रांचे डिटेल्स मागू नका तुम्ही आणि तुमचा पार्टनर आधी चांगले मित्र असाल आणि नंतर रिलेशनशिपमध्ये आला असलात, तर तुम्हा दोघांचे मित्र कॉमन (Common Friends) असण्याची शक्यता आहे; पण तुम्ही एकमेकांसाठी नवे असाल आणि नवीन नात्याला सुरुवात केली असेल तर तुम्ही एकमेकांच्या मित्रांबद्दल विचारणं टाळायला हवं. दोघंही एकमेकांच्या मर्जीने मित्र-मैत्रिणींबद्दल माहिती शेअर करत असतील तर हरकत नाही; पण जाणीवपूर्वक मित्रांची माहिती मागितल्याने तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. पगार आणि सोशल मीडिया पासवर्ड तुमचं नातं मजबूत होण्यासाठी एकमेकांशी सोशल मीडियाचा पासवर्ड (Social Media Password) शेअर करणं गरजेचं नाही. तुम्ही तुमच्या पार्टनरला सोशल मीडियाचा पासवर्ड विचारला तर त्याला वाईट वाटू शकतं. त्यामुळे पार्टनरला सोशल मीडियाचा पासवर्ड विचारू नका. तसंच आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्टनरला पगाराशी (Salary) संबंधित प्रश्नही विचारू नयेत. बऱ्याच जणांना पगार विचारलेला आवडत नाही. त्यामुळे हे प्रश्न विचारणं टाळावं. हे वाचा - या तीन राशींची लोकं प्रेमात असतात भाग्यवान! तुलनेत मिळतात कमी नकार; हे आहे कारण याशिवाय, एकमेकांच्या वजनाबद्दल बोलणं, कपड्यांवरून बोलणं, सतत कोणत्या ना कोणत्या विषयावर प्रश्न विचारणं किंवा नेहमी स्वतःबद्दलचं प्रेम व्यक्त करायला लावणं, या गोष्टींमुळे तुमचा पार्टनर नाराज होऊ शकतो. तसंच त्याची चिडचिड होऊ शकते. त्यामुळे असे प्रश्न पार्टनरला विचारायचे नाहीत, याची काळजी घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.