मुंबई, 27 फेब्रुवारी : डोळे लाल होणं (Red eyes) ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या साध्या अॅलर्जीमुळे देखील असू शकते आणि काचबिंदू किंवा ट्यूमर इत्यादीमुळं देखील असू शकते. किरकोळ बाब असल्यास स्वच्छतेची काळजी घेऊऩ ही समस्या टाळता येते. परंतु, जर तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग लाल झाला आणि ही स्थिती अनेक दिवस कायम राहिली तर, तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. ही समस्या ब्लड शॉट्स आईजची असू शकते. यामध्ये डोळ्याच्या पांढऱ्या भागातील बारीक रक्तवाहिन्या पसरतात आणि त्या सुजतात. डोळ्यात कोणताही कचरा गेल्यानं, कोणत्याही संसर्गामुळं एका किंवा दोन्ही डोळ्यांचा पांढरा भाग लाल होतो. याशिवाय जळजळ, टोचल्यासारखं वाटणं, खाज सुटणं, कोरडेपणा, वेदना इत्यादी समस्या असू शकतात. या समस्येबद्दल अधिक माहिती (Redness of the white part of the eye) जाणून घेऊ. याविषयी टीव्ही 9 ने बातमी दिली आहे. हे असू शकतं संभाव्य कारण अॅलर्जी, डोळ्यांचा थकवा, वायू प्रदूषण, धूळ, माती, रसायनं किंवा सूर्यप्रकाश, कॉन्टॅक्ट लेन्सचा दीर्घकाळ संपर्क, डोळ्यांमध्ये जंतुसंसर्ग होणं उदा., कंजक्टिवाइटिस, ग्लूकोमा, काचबिंदू, डोळ्यांना दुखापत, कॉर्नियल अल्सर, डोळ्यांची शस्त्रक्रिया इ. अशा परिस्थितीत तज्ज्ञांना भेटणं आवश्यक - एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ टिकणारा लालसरपणा - प्रकाशासाठी अतिसंवेदनशीलता किंवा प्रकाश सहन न होणं - एका किंवा दोन्ही डोळ्यांमधून स्त्राव किंवा पाणी येणं - अंधुक दृष्टी - एका किंवा दोन्ही डोळ्यांत तीव्र वेदना हे वाचा - स्वप्नात हे प्राणी दिसलेच तर करिअरमध्ये मिळू शकते मोठी बातमी; पैशांचाही वाढतो ओघ संरक्षणाच्या पद्धती कॉन्टॅक्ट लेन्स जास्त वेळ घालू नका. कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यापूर्वी, त्या पूर्णपणे स्वच्छ करा. रसायने किंवा हानिकारक पदार्थांपासून डोळ्यांचे संरक्षण करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांमध्ये कोणतेही ड्रॉप्स वापरू नका. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी गॉगल वापरा. जर एखाद्याला डोळे लाल होण्याची समस्या असेल तर, त्याच्या संपर्कात आल्यानंतर हात चांगले धुवावेत. हे वाचा - रात्र-रात्रभर झोप येत नाही? ही ट्रिक वापरून 60 सेंकदात व्हाल गुडूप,एकदा करून बघा असे आहेत उपचार डोळे लाल होण्याची समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टर डोळ्यांची तपासणी करून समस्या शोधून काढतात. अॅलर्जीमुळं समस्या असल्यास काही औषधं आणि आय ड्रॉप्स दिले जातात. बॅक्टेरियाच्या संसर्गाच्या बाबतीत तज्ज्ञ प्रतिजैविकांची मदत घेऊ शकतात. जर काचबिंदू किंवा ट्यूमरची स्थिती निर्माण होत असेल, तर तज्ज्ञ त्यावर दीर्घ काळासाठी उपचार करू शकतात. त्यामुळं डोळे लाल होण्याची समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.